Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: सर्वेक्षण

Friday, 28 May 2021

सर्वेक्षण

 

B.A.III Paper XVI

 

B.A.III Paper XVI

सर्वेक्षण.   :- भूतकाळातील ऐतिहासिक घटनांची माहिती मिळवण्यासाठी साधनांची संकलन करावी लागते या संकलनात प्रक्रियेत संशोधकाने शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून संदर्भ साधनांचा बारकाईने अभ्यास करून जास्तीत जास्त सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी पुराव्याची आवश्यकता असते पुरावा संदर्भ साधनातून प्राप्त होतो अशा संदर्भ साधनांचा ठिकाणांना संशोधक फिरून भेटी देतो आणि आधुनिक संदर्भ साधने गोळा करतो या सर्व प्रक्रियेत सर्वेक्षण, मुलाखत, प्रश्नावली, पुरातत्वीय साधने, वृत्तपत्रे, इंटरनेट, रेडिओ, दूरदर्शन, लघुचित्रपट यातून आपण माहिती मिळवू शकतो.

सर्वेक्षण.  :- सर्वेक्षण म्हणजे ऐतिहासिक समस्येचे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले निरीक्षण होय. समकालीन इतिहासाची साधने या दृष्टीने सर्वेक्षणाला महत्त्व आहे. म्हणून शास्त्राच्या संशोधनासाठी ही पद्धती उपयोगी आहे. इतिहासाच्या प्रत्येक कालखंडाच्या अभ्यासासाठी सर्वेक्षण पद्धतीचा वापर केला जातो व्यापार वाणिज्य क्षेत्रातील ही पद्धत वापरली जाते. प्राचीन भारतातील शिल्प शिलालेख स्थापत्य याविषयी संशोधन प्रकल्पासाठी संशोधन सर्वेक्षण पद्धती वापरली जाते. जनसामान्यांची मते समजून घेण्यासाठी सर्वेक्षण ही सर्वात चांगली पद्धती आहे. योग्य त्या परीक्षणानंतर त्याचा स्वीकार व्हावा. प्रादेशिक इतिहास लेखनाला साठी सर्वेक्षणाचा अधिक उपयोग होतो संशोधकाला प्रश्नावलीच्या माध्यमातून हवी असणारी माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून  मिळवता येते. पण यासाठी संशोधकाची संशोधक आकडे परिपूर्ण प्रश्नावली, निरीक्षण, सूक्ष्म दृष्टी आकलन शक्ती चांगली असावी लागते.

सर्वेक्षणातील उणीवा मर्यादा.  :-

). सर्वेक्षण हे विविध स्तरावर केले जाते त्यामध्ये सरकारी व्यावसायिक वैयक्तिक पातळीवरही केले जाते वरीलपैकी कोणत्या सर्वेक्षणावर अवलंबून राहावयाचे हे प्रथम इतिहासकराला  ठरवावे लागते.

). वैयक्तिक सामुदायिक स्वरूपाच्या सर्वेक्षणातून माहिती जमा केलेली असते. सर्वेक्षण फार जुने असेल तर ते किती उपयोगी पडेल याचा अंदाज घ्यावा लागतो. सामुदायिक रीत्या व्यक्त केलेली मते वैयक्तिक पातळीवर उपयोगी पडतील असे नाही.

). सर्वेक्षण करताना दर वेळेला समाजातील विविध स्तरातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यावरून आपले मत बनवता येईल इतिहासकराणे इतिहास लेखनात सर्वेक्षणाचा वापर जपून करावा.

 

सर्वेक्षण करताना घ्यावयाची दक्षता /खबरदारी.

) इतिहास संशोधक आणि दुसऱ्याच्या सर्वेक्षणावर आपली मते बनवता स्वतः सर्वेक्षण करावे.

).  संशोधकांनी सर्वेक्षणासाठी केलेली प्रश्नावली अधिकाधिक परिपूर्ण बनवावी.

). एकदा बनवलेल्या प्रश्नावली तील पुन्हा नवे प्रश्न वाढू नयेत असे प्रश्न वाढवणे शास्त्रशुद्ध नसते.

) योग्य अचूक माहिती मिळवण्यासाठी प्रश्न स्पष्ट शब्दात विचारावेत.

). सर्वेक्षणातून मिळणारी अपेक्षित माहिती स्पष्ट शब्दात मांडावी.

).  सर्वेक्षणात संदिग्ध माहिती नसावी.

).  सर्वेक्षणाचे मुद्दे अत्यंत सोपे, साधे सुटसुटीत असावेत.

). सामाजिक आर्थिक राजकीय लोकसंख्या यांचे सर्वेक्षण अत्यंत काळजीपूर्वक करावे.

    योग्य पद्धतीने सर्वेक्षण केल्यास ते महत्त्वाचे संदर्भ साधन ठरू शकते.   

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...