बी. ए. ३ पेपर क्रमांक १५
पर्शियन साधने. मुघल इतिहासकारांनी लिहिलेली मुघल साम्राज्याच्या इतिहासाची साधने बादशहाची चरित्रे, सरदारांची पत्रे, विजापूरच्या आदिलशाही, गोवळकोंड्याची कुत्बशाही, अहमदनगरची निजामशाही या बादशाहीत होत्या त्यांचे बहुतांश लिखाण हे पारशी भाषेत होते या साधनांमधून मराठ्यांच्या बाबतची माहिती आपणास उपलब्ध होते.
१).. मासिरे आलमगिरी. औरंगजेब बादशहाचा हा चरित्रग्रंथ साकी मुस्तैदखान यांनी इसवी सन १७०९ मध्ये लिहिला. लेखक औरंगजेबाच्या दरबारात एक अधिकारी होता. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर सर जदुनाथ सरकार यांनी केले तर मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी केले. औरंगजेब बादशहाच्या राज्यारोहण यापासून च्या अनेक घटना त्याने दिलेले आहेत छत्रपती शिवाजी राजे संभाजी महाराज राजाराम व ताराबाई यांच्या कारकीर्दीतील अनेक घटनांचा उल्लेख यामध्ये आहे.
२)... तारीखे खाफीखान. या ग्रंथाचे नाव लांबलचक आहे मात्र म्हणताना त्याला तारीखे काफीखान असेच म्हणतात. इसवीसन १७३४ साली खाफीखानाने हा ग्रंथ लिहिला. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल यांनी तो प्रसिद्ध केला. सेतुमाधवराव पगडी यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध या नावाने तो प्रसिद्ध केला.
औरंगजेबाच्या सैन्यातील अधिकारी म्हणून या पिकांनी काम केले आहे त्याने स्वतः मराठा मुघल संघर्ष पाहिला होता मराठ्यांनी औरंगजेबाचे केलेली दुर्दशा या ग्रंथामधून आपणास दिसते धनाजी संताजी चा पराक्रम राजाराम ताराबाई ची कामगिरी यातून आपणास समजते.
३). तारीखे दिलकुशा. भीमसेन सक्सेना यांचे हे आत्मचरित्र आहे. औरंगजेबाच्या पदरी काम करणारा भीमसेन सक्सेना बादशहाबरोबर दक्षिणेच्या मोहिमेवर आला त्याने अनेक लढाया पाहिल्या.१७०१ चा पन्हाळा वेड्या वेळी तो स्वतः हजर होता इसवीसन १७०९ मध्ये त्यांनी हे लिखाण पूर्ण केले. बुंदेल्यांचे बखर या नावाने पटवर्धन यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे.
४). फुतूहाते अलगिरी ( अलम गिरा चे विजय). ईश्वरदास नागर यांनी हा ग्रंथ लिहिला तो औरंगजेब बादशहाच्या न्यायाधीशपदी कारकून होता.१७१० ते १७२० दरम्यान त्यांनी हा ग्रंथ लिहिला सेतुमाधवराव पगडी यांनी मुघल मराठा संघर्ष या नावाने त्याचा अनुवाद केला आहे. शाहिस्तेखानाच्या आक्रमणापासून ते सातारच्या किल्ल्याच्या वेड्या पर्यंत सविस्तर माहिती तसेच संभाजी अकबर कवी कलश दुर्गादास राठोड राजाराम संताजी घोरपडे यांच्या बद्दलची माहिती यातून मिळते छत्रपती संभाजी ने बादशाह पुढे मान झुकवली नाही डोळे काढल्यावर अन्नत्याग केला इत्यादी माहिती ईश्वरदास यांनी दिली आहे.
५). खुतुते शिवाजी. ( शिवाजी महाराजांची पत्रे).
या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबरच औरंगजेब शहजादा अकबर झुल्फिकारखान मिर्झा राजे जयसिंग शाहू महाराज यांची सुद्धा पत्रे आहेत सर जदुनाथ सरकार यांनी या पत्रांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केला आहे सेतुमाधवराव पगडी यांनी मुघल मराठा संघर्ष या नावाने तो पुन्हा प्रकाशित केला.
६). हफ्त अंजुमन. मिर्झाराजा जयसिंग यांच्या पत्रांचा संग्रह आहे औरंगजेबास त्यांनी दक्षिण मोहिमेवर असताना लिहिलेली पत्रे यात आहेत सेतुमाधवराव पगडी यांनी मोबाईल मराठा संघर्ष यात त्यांचा अनुवाद केला आहे.
७). लुतफुल्ला खानाची पत्रे लुतफुल्ला खान शहाजहान बादशहाचा वजीर असा मुलगा होता औरंगजेब बादशहाच्या दरबारात काम करत होता त्याच्या धनाजी संताजी बरोबर लढाई झाल्या यातून आपणास विजापूर औरंगाबाद पराड इत्यादी ठिकाणच्या माहिती मिळते त्याच्या 40 पत्रांचा अनुवाद सेतू माधवराव पगडी यांनी मोगल मराठा संघर्ष यात दिला आहे.
८) मातरब खानाची पत्रे मातरब खान गर्ल सरदार होता नाशिकचा ठाणेदार होता बागलाण नाशिक उत्तर कोकण येथे त्यांनी पराक्रम केला होता ही पत्रे मराठ्यांच्या अभ्यासास उपयुक्त आहेत.
९). भुसातीन उस सलातीन. हा विजापूरच्या आदिलशहाचा इतिहास ग्रंथ आहे विजापूरच्या आदिलशाही घराण्याचा इतिहास या नावाने मूड वझे यांनी तो प्रसिद्ध केला खरे आणि बेंद्रे यांनी ही त्याचा अनुवाद केलेला आहे.
१०). अखबरात. बादशहाच्या दरबारात दररोज घटना घडलेल्या घटनांचा वृत्तांत सरकारी अधिकारी लिहून ठेवत असत काळाच्या ओघात यातील बरीच पत्रे नष्ट झाली आहेत मात्र लंडन जयपूर आणि कलकत्ता येथील दप्तर खाण्यात काही अखबार आज उपलब्ध History of Aurangzeb या ग्रंथात सर जदुनाथ सरकार यांनी त्यांचा वापर केला आहे डॉ. खरे आणि सेतुमाधवराव पगडी यांनीअखबरात त्यांचे मराठी भाषांतरही केलेले आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.