बी.ए भाग ३
अभ्यासक्रमपञिका १२
सञ ६
विषय साहित्यविचार
विषय प्राध्यापक -प्रा.बी. के. पाटील.
विभाग १
घटक शब्दशक्ती
३) व्यजना :-
व्यगना शद्बशक्ती शब्दाच्या तसेच अर्थाच्या ठिकाणीही दिसून येते. अनेक वेळा वाक्यात असे होते की ,लक्षणेसाठी आवश्यक असणारा 'मुख्यार्थबाध' होत नाही. त्या वाक्याचा अर्थ जसाच्या तसा सरळ लागतो, पण त्या शब्दाची शक्ती तेथेच न थांबता पुढे आणखी काही अर्थाची प्रतीती करुन देते, मुख्यार्थापेक्षा अधिक अर्थ प्रतीत करुन देणार्या शक्तीला व्यंजना म्हणतात.
व्यंजना म्हणजे सूचना किंवा सुचविणे. या ठिकानी मुख्यार्थाबरोबर अधिक काही सुचविले गेलेले असते. हे सुचविणे सौंदर्यपूर्ण असते.
उदा. 'सूर्य अस्तास गेला' असे म्हटल्याबरोबर सुर्य बुडाल्याची किंवा मावळ्याची जाणीव लगेच होते. पण आपणाला याचा एवढाच अर्थ लागतो असे होत नाही. हे वाक्य आपण कोणाला उद्देशून उच्यारत आहोत,त्यावर त्याची अनेक अर्थवलये उमटत असतात
उदा. जर एक चोर दुसर्या चोराला म्हटला असेल तर त्याचा अर्थ चोरी करण्याच्या तयारीला लागावे असा होतो . हेच वाक्य शेतकर्याने ऐकले असल तर शेतातले काम थांबवावे असा होतो एखाद्या ब्रम्हकर्म करणार्याला म्हटले असेल तर संध्यावंदनाची वेळ झाली असा होईल सूर्य अस्तास गेला हे वाक्य कोणत्या व्यक्तिसाठी उच्यारले त्यावरुन त्या अर्थाच्या वाच्यार्थासह अधिकचे अर्थ प्रतीत होत जातील
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.