Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: शिवकालीन व्यापार

Sunday 30 May 2021

शिवकालीन व्यापार

 (Dr. Dhere V.D.)

शिवकालीन व्यापार

B.A.I Paper II History

शिवकालीन व्यापार.

      आपण शिवकाळाचा विचार करतो. त्या काळातील व्यापार विषयक वस्तूंचा विचार करताना तत्कालीन बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्रीसाठी अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ, फळे, कापड, धातू, प्राणी, चैनीच्या वस्तू, नित्य वापरातील वस्तू यांचा समावेश होत असे.

अन्नधान्य

           यामध्ये गहू, भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, मसूर, उडीद, इत्यादी प्रकारच्या डाळी तेलबिया, दूध, साखर, सुपारी, नारळ  यांचा समावेश असे.

मसाल्याचे पदार्थ

             यामध्ये सुंठ,हळद, मिरची, मोहरी, कांदा, लसूण,मिरी, खोबरे, वेलदोडे, गुळ, खडीसाखर, तूप, सुवासिक तेले यांचा समावेश असे.

फळे

       आंबा, नारळ, काजू, सुपारी, फणस, बदाम, खजूर, कलिंगड, लिंबे इत्यादी फळांचा यात समावेश होता.

कापड

    महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लघुउद्योगांच्या मध्ये कापडनिर्मिती होत असे. याशिवाय गुजरात, बंगाल, उत्तर भारत येथून वेगवेगळ्या प्रकारचे कापड रेशमी, सुती, मलमली, शाली, साड्या ,जाडे-भरडे कापड, चिटाचे कापड, धोतरे, लुगडी, कांबळी, इत्यादीची खरेदी-विक्री होत असे.

धातू

        लोखंड तांबे पितळ सोने

प्राणी

     घोडे, उंट, बैल, म्हशी, मांस उत्पादनाचे प्राणी, लोकर उत्पादनाचे प्राणी

चैनीच्या वस्तू

   हस्तिदंत सौंदर्यवर्धक वस्तू सौंदर्यप्रसाधने 

नित्य वापरातील वस्तू

      स्त्री-पुरुषांच्या नित्य वापराच्या शेती वापराच्या विविध वस्तू पायपोस, इत्यादी


शिवकलीन बाजारपेठा.

    कसबे च्या ठिकाणी बाजार भरत असे अनेक ठिकाणी बाजारासाठी पेठा वसविल्या होत्या. त्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस बाजार भरत असे. यात्रा उत्सव अशा प्रसंगी ही बाजारपेठ भरत असे. सण उत्सव यात्रा याबरोबरच काही लोक गावोगावी फिरून  वस्तू विकत असत.

        शिवकाळात शेटे महाजन यांना नवीन व्यापारी पेठा वसवण्याची कामगिरी सोपवलेली होती. या मोबदल्यात त्यांना सरकारमार्फत जमिनीचे हक्क दिले जात असत. व्यापाराच्या व्यवस्था साठी पेठांच्या व्यवस्था साठी 'बिडवई' नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जात असे. त पिठांच्या संरक्षणासाठी कोतवाल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाई. शेटे - महाजन हे गोत सभेचे सदस्य होते ते सभेच्या निवडा पत्रावर आपली तराजू ही निशाणी उमटवत असत.

किल्ल्यांवरील बाजारपेठा

      शिवाजी महाराजांनी काही प्रमुख किल्ल्यांवर आसपासचे प्रजाजन, सैनिक, अधिकारी यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खास बाजारपेठा बांधल्या. रायगड या राजधानीच्या किल्ल्यावरील बाजारपेठेचा विचार केला तर अत्यंत सुनियोजित अशी रचना आपणास दिसते.

शिवकालीन प्रमुख व्यापारी केंद्रे.

      चौल. 

     मध्ययुगीन कालखंडातील अत्यंत महत्त्वाचे बंदर होय मुंबईपासून दक्षिणेला 56 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या हे रायगड जिल्ह्यातील चौल हे बंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७०  मध्ये जिंकले या बंदरातून रेशमाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. रेशीम, निळ, अफू, मसाल्याचे पदार्थ आणि घोड्यांचा व्यापार येथून चालत असे. युरोपीय वस्तू भारतात चौलमार्गे  येत असत मलबार इथून नारळ, सुपारी, बारा तांबे इत्यादी व औषधांचा माने तसे तर मलबार ला कापड, गहू, तांदूळ, बाजरी, सुती कापड, कलाकुसरीच्या वस्तू निर्यात केल्या जात सुंदर भेटवस्तू व कलाकृतींची निर्मिती येथे होत होती.

दाभोळ

      वशिष्ठी नदीच्या मुखावर दाभोळ बंदर वसली आहे अंजनवेल आधी असाही याचा उल्लेख केला जातो पंधराव्या सोळाव्या शतकात या बाजाराची भरभराट झाली शिवाजी महाराजांची जहाजे दाभोळ - मुंबई या मार्गावर ये-जा करत असत. देशातील अनेक ठिकाणाहून कापड, गहू, बाजरी, डाळी, हा माल निर्यातीसाठी येथे येत असे. अरबस्तान, इराण, मलबार, खंबायत तसेच युरोपियनांचे जहाजे येथे व्यापारी साठी  येत. स्वराज्यातील मालाची निर्यात व परदेशी मालाची आयात यामुळे या शहराचा मोठा विकास झाला.

राजापूर

       रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीवरील हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी देशातील व्यापाऱ्यांनी येथे आपल्या  वखारी निर्माण केल्या. फ्रेंच लोक येथील लोखंड व शिशे यांचा व्यापार करत. राजापूर येथून तांबडा समुद्र व इराण येथे व्यापार चालत होता. सुती कापड, सुती धागा, मसाल्याचे पदार्थ, फळे, इत्यादी चे निर्यात येथून होत होती.

संगमेश्वर

         शास्त्री नदीच्या मुखाशी  २० मैल आत सोनावी नदीच्या संगमावर संगमेश्वर हे व्यापारी केंद्र वसले होते. देशावरून घाट मार्गाने अनेक वस्तू निर्यातीसाठी येथे येत मीठ व चिंच यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती.

वेंगुर्ला

       आंतरराष्ट्रीय फळासाठी प्रसिद्ध असलेले कोकणातील ही महत्वपूर्ण बंदर होय. जपान, सिलोन, इराण, अरबस्थान येथून व्यापारी येथे येत या बंदरातून सुती कापड, रेशमी कापड, धान्य व मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात होत होती येथे डचांची वखार होती.

विजयदुर्ग

             वाघोटण नदच्या मुखाशी बसलेले विजयदुर्ग हे कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. विड्यांच्या पानाच्या वेलीची मळे येथे होते. देश-विदेशात विड्याच्या पानाची निर्यात येथून केली जात होती.

कल्याण- भिवंडी

        शिवकाळात उत्तर कोकणात हे भरभराटीस आलेले बंदर होते. उत्तर भारत, गोवळकोंडा व केरळ या राज्यातून येथे माल येत असे. येथे वस्त्र उद्योगाची भरभराट झाली होती. विणकरांची संख्या लक्षणीय होती. मुंबईचा विणकाम व्यवसाय वाढवण्यासाठी इंग्रजांनी येथील विणकरांना प्रलोभने दाखवली मात्र भिवंडीतील विणकर त्यात बळी पडले नाहीत. येथे जहाज बांधणीचा उद्योग मोठ्या प्रमाणात ऊर्जितावस्थेत आला.


शिवकालीन दळणवळणाची / वाहतुकीची साधने.

  देशाच्या औद्योगिक आर्थिक विकासात दळणवळणाच्या साधनांचा महत्त्वाचे स्थान आहे महाराष्ट्राची भौगोलिक रचना पाहता येथे पाय वाटा व गाडी वाटा मोठ्या प्रमाणात होत्या गावी एकमेकांना रस्त्याने जोडलेली होती मात्र रस्ते कच्चे होते महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांबाबत पुढील प्रमाणे आपण सांगू शकतो.

१). सुरत, धौता, नंदुरबार, बुऱ्हाणपूर रस्ता.

२). सुरत, नवापूर, खानापूर, पिंपळनेर, सटाणा, औरंगाबाद रस्ता.

३). सुरत, बुरहानपुर, धरणगाव, दौलताबाद, हैदराबाद.

४). हैदराबाद, गुलबर्गा, विजापूर, बेळगाव, गोवा.

५). सुरत, नवापूर, खानापूर, पिंपळनेर, औरंगाबाद, अहमदनगर.

६). चोल, कोळवन, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खारेपाटण, मालवण, गोवा.

जलमार्ग..

     समुद्रातून तसेच नदीतून जलमार्गाने ही मालाची ने-आण केली जाईल मिठाची वाहतूक ही बहुतांशी जल मार्गातून देशावर नेले  जाई. कोकणातील  ठाणे, वसई, तेरेखोल, विजयदुर्ग, जयगड, धरमतर इत्यादी खाड्यांमधून तसेच बाणकोट, हर्णे, देवगड, दाभोळ, मालवण, वेंगुर्ला, संगमेश्वर, चौल, कल्याण-भिवंडी या बंदरा मधून जलमार्ग जलमार्गाने वाहतूक होत होती. 

घाट मार्ग

       महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी, सह्याद्री किंवा पश्चिम घाट, व महाराष्ट्र पठार असे प्राकृतिक तीन विभाग आहेत. सह्याद्री पर्वतात तळघाट, बोरघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, खंडाळा घाट, पारघाट इत्यादी अनेक घाट मार्ग आहेत. घाटमार्गे देशावरील वस्तू कोकणात तर कोकणातील मिठ, मासे, मसाल्याचे पदार्थ देशावर आणले जाते या व्यापार संरक्षणासाठी सरकारी चौक्या बसवलेले असत. त्यावर घाटपांडे नावाचा मुख्य अधिकारी काम पाहत असे त्याच्या सहाय्यक म्हणून पत्की पानसरे मेटकरी इत्यादी लोकांची नियुक्ती केली जाई.

टपाल व्यवस्था

        शिवकाळात अत्यंत मर्यादित असाच पत्रव्यवहार होता सरकारी पत्रव्यवहार व खाजगी पत्रव्यवहार करण्यासाठी घोडेस्वार किंवा सांडणीस्वार याचा वापर होई. पत्र व्यवहार पूर्णपणे संरक्षणामध्ये होत असे पत्राची ने-आण  करणाऱ्याला 'हरकारे' असे म्हटले जाई. समुद्रातून मचव्यांच्या  आधारे ही टपालाची ने-आण होत असे. त्यांना बातमीचे मचवे असे म्हणत.

शिवकालीन वाहतुकीची साधने.

               शिवकाळात बैल, उंट, गाढव, रेडा, तट्टू, हत्ती इत्यादी जनावरांचा वापर वाहतूकीसाठी केला जात असे बैलांचा वापर तांदूळ, ज्वारी, बाजरी, गूळ, मीठ इत्यादी वस्तूंच्या गोण्या वाहून नेण्यासाठी केला जाईल 10,000 बैलांचा तांडा वाहतूक करत असे. वाहतुकीसाठी व प्रवासा साठी लागणारी जनावरे फोडण्याचे काम वंजारी लोक करत उपयुक्त युद्धसाहित्याच्या वाहतुकीसाठी वापर होईल प्रसंगी उंटांचा वापर केला जाई.

      कोकणामध्ये  मालवाहतुकीसाठी नावा होड्या,  शिबाडे, जहाजे यांचा वापर केला जाई. नदी वाहतुकीसाठी नौका समुद्रात वाहतुकीसाठी जहाजांचा वापर केला जाई. प्रवासासाठी बैलगाडीचा वापर करत असत श्रीमंत लोक घोडा, घोडा गाडी, रथ,पालखी याचा वापर करत असत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Group Discussion

 (e-content developed by Dr N A Jarandikar) GROUP DISCUSSION ·          Group Discussion: Q. 3 (A) – Marks: 08 ·          Group Discussi...