वस्तू संग्रहालये
B.A.III पेपर १६
ज्या ठिकाणी ऐतिहासिक वस्तूंची मांडणी केलेली असते ज्याद्वारे संशोधन, शिक्षण, राष्ट्रीय उदात्तीकरण व सांस्कृतिक वारसा जपला जोपासला जातो असे ठिकाण म्हणजे वस्तुसंग्रहालय होय.
वस्तू संग्रहालय आणि मध्ये दुर्मिळ वस्तू मिळवणे त्याचे संवर्धन करणे त्यांचे प्रदर्शन करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.
Museum या शब्दाला मराठीत वस्तुसंग्रहालय हा शब्द वापरला जातो Muses म्युझेस ही ग्रीक पुराणातील एक देवता आहे. मुख्य प्रेरणा दैवी प्रेरणा सर्जनशील प्रभाव व उत्तेजन देणारी देवता असा आहे.
वस्तुसंग्रहालयाच्या प्रगतीचे तीन टप्पे पडतात.
१). सुरुवातीच्या काळात वस्तू गोळा करणे संशोधनासाठी काही वेळा प्रसिद्धीसाठी अशा वस्तू एकत्र केल्या जातात.
२). या टप्प्यात वस्तूंची अधिक काळजी घेतली जाते. लोकांना त्या योग्य पद्धतीने दिसाव्यात अशा पद्धतीने त्याची मांडणी केली जाते.
३). प्रदर्शनीय वस्तू जनसामान्यांना आकर्षित करतील आकर्षित करतील अशा पद्धतीने मांडण्यात येतात व यातून प्रदर्शन आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिले जाते.
युनेस्कोने आमचे पुढील कार्य सांगितलेले आहेत.१). प्रदर्शनीय वस्तू गोळा करणे २) त्या वस्तूंचे रक्षण करणे.३). त्या वस्तूंचे प्रदर्शन करणे.४). संशोधनाला सहाय्यभूत वस्तू संशोधनासाठी उपलब्ध करून देणे.५). आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचे महत्त्व ग्रंथ टाकून प्रकट करणे.६). या वस्तूंची विविध ठिकाणी प्रदर्शन करणे.
वस्तुसंग्रहालयांचे प्रकार
१) ग्रामीण संग्रहालय
अ. शेतीविषयक संग्रहालय
ब. स्थानिक लोककला व पुरातत्व संग्रहालय
क. तंत्रज्ञान संग्रहालय
ड. व्यक्तिविशेष संग्रहालय
२). शहरी संग्रहालय
अ. कला व पुरातत्व संग्रहालय
आ. शास्त्र व तंत्रशास्त्र संग्रहालय
इ. मानववंश शास्त्रीय संग्रहालय
ई. व्यक्तिविशेष संग्रहालय
उ. वनस्पती व प्राणी संग्रहालय
ऊ. ग्रंथ संग्रहालय
ए. टपाल तिकिटांचे संग्रहालय
ऐ. संरक्षणविषयक संग्रहालय
ओ. आरोग्यविषयक संग्रहालय
औ. शिशु संग्रहालय
३). आधुनिक वस्तुसंग्रहालय
आधुनिक कालखंडात डिजिटल जमाना सुरू झाला आहे आणि या कालखंडात लागलेल्या नवीन शोध संशोधनाची संग्रहालय उपलब्ध होत आहेत. ज्याला पण डिजिटल लायब्ररी असे म्हणतो.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.