बी. ए. भाग:३
अभ्यासक्रमपञिका :१२
सञ : सहा
पाठ्यपुस्तक :साहित्यविचार
विभाग : २ रसविचार
विषय प्राध्यापक :प्रा बी के पाटील
प्रश्न : योग्य पर्याय निवडा.
१) भरतमुनींच्या'नाट्यशास्ञ' या ग्रंथात.......... या संज्ञेला अनन्य महत्व प्राप्त झाले आहे?
अ) रस
ब) करुण
क) रौद्र
ड) संताप
२) काव्याचा आस्वाद घेतल्यानंतर रसिकाला जी अनुभूती येते ती ........ होय?
अ) रसविमर्श
ब) ग्लानी
क) मोह
ड) रसानुभूती
३) भरताच्याही आधी कोणा.......... नावाच्या पूर्वसुरीने आठ रसांचा उल्लेख केला होता ?
अ) बाण
ब) कुंतक
क) द्रुहिण
ड) वाग्भट
४) डाॅ. के.ना. वाटवे यांनी आपल्या............ या ग्रंथात भरताच्या तेहतीस भावांचे वर्गीकरण केले ?
अ) साहित्यमीमांसा
ब) रसविमर्श
क) भारतीय साहित्यशास्ञ
ड) अभिनव काव्यप्रकाश
५) ........... हा 'सत्व' या शब्दाचे स्पष्टीकरण आहे?
अ) उत्साह
ब) हास
क) विस्मय
ड) सत्व
६)विभावानुभावव्यभिचारिसंयगाद्रसनिष्पत्ति हे.......... प्रसिध्द रससूञ आहे ?
अ) कुंतकाचे
ब) भरताचे
क) वाग्भटाचे
ड) क्षेंमेंद्राचे
७) रससूञात प्रत्यक्षात न आलेला शब्द म्हणजे......... हा होय ?
अ) सात्विक भाव
ब) स्थायी भाव
क) व्यभीचारी भाव
ड) ग्लानि
८) विभावांचे....... भेद मानले आहेत?
अ) एक
ब) तीन
क) चार
ड) दोन
९) विभाव हे रसांचे कारण, निमित्त अथवा.......... असतात ?
अ) हेतू
ब) कारण
क) बाजू
ड) दिशा
१०) चिञातील वा मनातील भावना (प्रकट) करणारे नायक- नायिकांच्या शरीरावर ठळकपणे दिसून येणारे जे बदल हे ........होत ?
अ) विभाव
ब) अनुभाव
क) व्यभिचरी
ड) संयोग
उत्तरे...................
१) अ) रस
२) ड) रसानुभूती
३) क) द्रुहिण
४) ब) रसविमर्श
५) ड) सत्व
६) ड) क्षेमेंद्राचे
७) ब) स्थायीभाव
८) ड) दोन
९) अ) हेतू
१०) ब) अनुभाव
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.