बी. ए.1 सेमिस्टर 2
समाजशास्त्र पेपर - 2
उपयोजित समाजशास्त्र
प्रकरण -
2 समाज आणि जनसंपर्क माध्यम
२. आधुनिक माध्यमे (Modern Media
आधुनिक माध्यमांना आजच्या काळात अधिक महत्त्व निर्माण
झाले आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगती ही आज
विकसित झालेल्या विज्ञान
व तंत्रज्ञानाच्या जोरावर झाली आहे. आजच्या समाजात वाढलेली जीवनाची विविध क्षेत्रे. त्या
विविध क्षेत्रांचा वाढलेला व्याप, कार्ये, उपक्रम, कार्यक्रम, योजना, यंत्रणा, कंपन्या
इ. कितीतरी प्रकारच्या माणसांच्या जीवन व्यवहारामुळे
मानवी संपर्काचे, संवादाचे स्वरूप हे केवळ दोन व्यक्तमधील संबंधांपुरते मर्यादित
नाही तर वेगवेगळ्या संस्थांचा व्यक्तींशी, व्यक्तींचा संस्थांशी, यंत्राचा
माणसाशी, माणसाचा यंत्राशी, तसेच
वेगवेगळ्या स्वरूपातील गटांशी, समूहाशी, मानवी
संपर्क येत असतो. त्यानुसार वेगवेगळ्या स्वरूपातील भूमिकांशी संबंध येतो.
आजचे युग हे तंत्रज्ञानावर आधारित आहे. इलेक्ट्रॉनिक्स व संगणक यांनी तर आज सारे विश्व
एखाद्या गावासारखे छोटे करून सोडले आहे. जगभर
विणलेल्या संदेशाच्या जाळ्यामुळे आज चोवीस तास अव्याहत आपल्या घरातील छोट्या
पडद्यावर आपण कितीतरी प्रकारचे कार्यक्रम बघू शकतो. जगात कुठेही, कोणीही, कुणाशीही
क्षणार्धात साधन असले की संपर्क साधू शकतो. याकरिता
लागणारा कालावधी हा आज माणसाने नियंत्रित केला आहे. आज
संपूर्ण विश्व संगणकीय संवाद साधनांनी जोडले गेले आहे.
मोबाईल फोन, सॅटेलाईट फोन, व्हीडिओ
कॉन्फरसिंग, व्हीडिओ फोन, फॅक्स, नेटवर्क, पेजरच्या
जगात कुठूनही कुठेही संपर्क, संवाद
तत्काळ प्रस्थापित करता येतात. एकाचवेळी
अनेक व्यक्तींशी संपर्क साधता येतो; माहिती, ज्ञान, संदेश
काही क्षणात पोहोचवले जाऊ शकते. इंटरनेट
व मल्टीमीडियाच्या युगाने आज नव्या विश्वसंस्कृतीचा व नव्या विश्वनागरिकत्वाचा पाया रचला गेला आहे.
मुद्रित माध्यमांचा प्रभाव या आधीपासूनच समाजावर
खोलवर रुजलेला आहे. वर्तमानपत्र, नियतकालिके, पुस्तके
ही आधुनिक माध्यमे तर मानवाला सहज उपलब्ध होणारी व अत्यल्प खर्चाची असल्याने यांचा
प्रभाव नक्कीच मानवी समाजावर अतिशय तीव्र गतीने होत आहे.
अर्थात, आधुनिक काळात संदेशवहनाची स्वनवीन तंत्रज्ञान, विज्ञान
व कलेची सातत्याने भरच पडत आहे.
• आधुनिक
माध्यमांचे दोन भागांत
वर्गीकरण करता येईल. मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे या दोन्ही आधुनिक
माध्यमांतर्गत असणान्या विविध प्रकारांचा अभ्यास करणेदेखील आवश्यक आहे.
(अ)
मुद्रित माध्यमे (Print Media)
मुद्रित म्हणजे लिखित, छापील माध्यमे होय. सर्वसाधारपणे लेखन व छपाई क वापर ज्या माध्यमांमध्ये केला जातो त्याला मुद्रित
माध्यमे म्हणता येईल. उदा. वर्तमान पत्र, नियतकालिक, पुस्तके, टपाल ही मुद्रित माध्यमे आहेत यांचे सविस्तर
अध्ययन करणेही आवश्यक आहे.
१. वृत्तपत्र / वर्तमानपत्र : जनसंज्ञापन माध्यमांपैकी मुद्रित माध्यम म्हणून वृत्तपत्रे पहिले आधुनिक
माध्यम आहे. त्याचे श्रेय मुद्रण विद्येच्या शोधाकडे जाते. गुटेनबर्ग ह मुद्रणक्रांतीचा प्रणेता मानला जातो. गुठेनबर्गच्या आधी माहितीचा
प्रसार करण्याची साधने फारच मर्यादित होती. छपाईच्या तंत्रज्ञानामुळे प्रथम पुस्तके आणि अठराव्या शतकापासून नियतकालिके
आणि दैनिके यांचा उदय झाला. त्यांच्या रूपाने पहिले प्रसारमाध्यम अस्तित्वात आले.
डी-फुगर्स या जर्मन व्यक्तीने १६०९ मध्ये जगात सर्वप्रथम या प्रकारचे वृत्तपत्र प्रसिद्ध केले. जेम्स ऑगस्टस हीली यांनी १७८० मध्ये भारतात सर्वप्रथम इंग्रजी वृत्तपत्र 'बेंगॉल गॅझेट' या नावाने प्रसिद्ध केले. तर महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी, १८३२ मध्ये 'दर्पण' नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर 'संवाद कौमुदी (बंगाली), दर्पण (हिंदी) तसेच बॉम्बे समाचार, दि इंडियन मिरर यांसारखी भारतीय भाषा व इंग्रजी भाषांतील वृत्तपत्रे प्रसिद्ध
होऊ लागली. तसेच लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही दैनिके सुरू केली. टाइम्स ऑफ इंडिया हे सर्वाधिक खपाचे दैनिक आहे.
रोजच्या घडामोडींसाठी वृत्तपत्र हेच एक माध्यम लोकांनी स्वीकारले आहे. आजच्या वृत्तपत्रात दैनंदिन
घडामोडींची माहिती, करमणुकीची माहिती, उपयुक्त जाहिराती, येथपासून ते क्रीडा, व्यापार, राजकीय तत्त्वाची, आध्यात्मिक मीमांसा इथपर्यंत सर्व काही मिळते. शिवाय वृत्तपत्रांची
किंमतदेखील अतिशय वाजवी आहे. त्यामुळे गरीब व सामान्यांसाठी संज्ञापनाचे अत्यंत उपयुक्त साधन म्हणून
वृत्तपत्र हे अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे.
जीवनाच्या विविधांगातील वर्तमान स्थिती व समाजाच्या विविध समस्याविषयी माहिती
पुरविणारी वृत्तपत्रे ही आज लोकांची दैनंदिन गरज आहे. लोकांना वृत्तपत्रां विविध क्षेत्रांशी संपर्क ठेवणे शक्य झाले आले. शिवाय वृत्तपत्रे सामाजिक दुष्कृत्यासंबंधीची आणीव निर्माण करतात आणि विशेष
म्हणजे चांगले वृत्तपत्र लोकांमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद निर्माण करू शकते. अशा रीतीने वृत्तपत्रे खऱ्या अर्थाने जनसंज्ञापनाचे पहिले आधुनिक जनसंपर्क
माध्यम आहे.
वर्तमानपत्रांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून आता तर इलेक्ट्रॉनिक न्यूजपेपर (ई-पेपर) कडे वाटचाल होत आहे. हे एक प्रकारचे डिस्प्ले तंत्रज्ञान आहे. यातून छापलेले चित्र व शब्द बदलता येऊ शकतात. भारतात दररोज सुमारे पंधरा
कोटींपेक्षा अधिक वर्तमानपत्रांचे वितरण होते..
२. नियतकालिके : अनेक वर्षांपासून बहुसंख्य नियतकालिके ही सामान्य अभिरुचीची म्हणून प्रसिद्ध
आहेत. अशा नियतकालिकांतून गृहिणी, बालके, कामगार, शेतकरी, व्यावसायिक लोक, विज्ञान, धर्म, कला इ. विविध विषयांवर लिखाण झाले आहे. त्यामुळे सर्व घरांतील वाचक वर्ग निर्माण झाले. नियतकालिकांचे कालानुसार साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक असे प्रकार पडतात. नियतकालिके विशिष्ट विषयाशी संबंधित अशीच प्रकाशने असतात. उदा. चित्रपटाविषयी फिल्मफेअर, स्क्रीन, क्रीडाक्षेत्राविषयी स्पोर्टस् विकली, तर व्यापाविषयक कॉमर्स, इकॉनॉमिक रिव्ह्यू, योजना, शेतीविषयक बळीराजा वगैरे विविध विषयांवरील मासिके, नियतकालिके निघाली आहेत. थोडक्यात, वृत्तपत्राप्रमाणेच जनसंज्ञापनाचे वृत्तपत्रानंतर लोकप्रिय माध्यम म्हणून नियतकालिकांचा उल्लेख करता येईल. आज भारतात सुमारे २० हजार साप्ताहिके, ६ हजार पाक्षिके, १७ हजार मासिके, ४ हजार त्रैमासिके व ६०० वार्षिके प्रकाशित होत आहे.
३. पुस्तके : पुस्तक हे लिखित छापलेल्या वा कोऱ्या कागदापासून वा चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही
साहित्यापासून बनवलेल्या पानांचे एकत्र संकलन असते. साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या पुस्तकास ई-पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यापासून वेगळे करण्यासाठी मोनोग्राफ म्हणण्यात येते. पुस्तकांच्या माध्यमातून
मानवाला हवी ती माहिती केव्हाही वाचता येते. पुस्तकांच्या माध्यमातून समाजातील विविध गोष्टींबाबतचे चित्रण समाजापर्यंत
सहजासहजी पोहोचते. ग्रंथालयांच्या माध्यमातून पुस्तकांचे संकलन केले जाते. भारतात पहिले 'पुस्तकांचे गाव' म्हणून महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळील 'भिलार' हे गाव नोंदले गेले आहे. इथे अनेक विषयांची, विविध लेखकांची पुस्तके पाहायला मिळतात. वाचनानंदाबरोबरच विविध विषयांचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचत आहे. पुस्तक हे महत्त्वाचे मुद्रित माध्यम आहे.
४. इतर मुद्रित साहित्य : मुद्रित साहित्य म्हणून इतर अनेक प्रकारची आधुनिक माध्यमे आज वापरली जातात. वेगवेगळ्या प्रकारची माहिती, संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मुद्रित साहित्य निर्माण झाले आहे.
(अ)
बुकलेट (माहिती
पुस्तिका) : एका विशिष्ट विषयावरची वा मुद्द्यावरची सविस्तर माहिती
देण्याकरिता या माध्यमाचा उपयोग होतो. यामध्ये एखादी
वस्तू कशी वापरावी याच्या सविस्तर सचित्र सूचना
असू शकतात किंवा
नव्याने बांधलेल्या विक्रीसाठी तयार झालेल्या वास्तूचे नकाशे
मोजमापासह विवरण
असू शकते.
(ब)
ब्रोशर व लीफलेट : ब्रोशर व लीफलेट
यामध्ये फक्त आकारात
फरक असतो. मोजकीच
माहिती दिली जाते. एक किंवा पाठपोठ
दोन पानांचे असते. एका पानावर एक किंवा
दोनच मुद्दे असतात. आकृतीसह मोजक्याच पण नेमक्या शब्दात
मांडण्यात येतात. त्याला ब्रोशर
असे म्हणतात.
याशिवाय पुढील आयुधांचा वापरदेखील मुद्रित माध्यम म्हणून केला जातो. ● स्टिकर्स, पोस्टर्स, लेबल, कॅलेंडर्स-विशिष्ट गोष्टी स्मरण करून देतात.
● रॅक्स, डबे यातून उत्पादनांचे प्रदर्शन - हे सौंदर्यपूर्ण प्रदर्शनार्थ असते.
• दैनंदिनी, घड्याळे, कागदावर ठेवण्याची वजने (पेपर वेट), पेन स्टैंड
इ. शुभेच्छादर्शक माध्यमे आहेत.
● पत्राचाराद्वारे माहिती देणे हे संपर्काचे प्रभावी साधन आहे.
डाक तार विभाग
किंवा खाजगी
पत्रवितरण व्यवस्था (कुरिअर सर्व्हिस) यांच्या माध्यमातून देशभरात विखुरलेल्या सर्व जनतेला विविध
प्रकारचा मजकूर
थेट पत्रांच्या माध्यमातून पाठविण्यात येतो.
(क)
भित्तिपत्रिका : भित्तिपत्रक किंवा Wall Paper प्रत्येक विभागाची स्वतंत्र किंवा संपूर्ण संस्थेची मिळून
एक भित्तिपत्रिका ही एका ठरावीक
भिंतीवर निश्चित जागी लावण्यात येते. संक्षिप्तपणे ठळक अक्षरात असते, सहजासहजी वाचणे शक्य होते. भित्तिपत्रक हे बाह्य
प्रसार माध्यम
आहे.
(ड)
सूचना फलक
: आकर्षक स्वरूपातील फलकावर लावलेल्या सूचना वाचणे
आनंददायी क्रिया
असू शकते. यामध्ये आजचा सुविचार, आजचे व्यवस्थापन शास्त्रातील तत्त्व, सुरक्षित, स्वच्छ
कार्यकुशल कार्यपद्धती, कर्मचारी कल्याण
कार्यक्रम, व्यवस्थापकीय मंडळाचे नवे धोरण, आजचा विनोद इ.
सर्व विषय हाताळता येतात. यातून
कर्मचारी कामगार
वर्गाला कार्यकुशल होण्यास उद्युक्त करता येते. तसेच उत्पादनक्षमता वाढवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, विकासात्मक दृष्टिकोण आत्मसात करणे, व्यसनमुक्ती इ.
मुद्द्यांवर भर देता येतो.
५. जाहिरात : जनसंपर्काचे एक अतिशय प्रभावी साधन म्हणून जाहिरातीकडे
पाहिले जाते. जाहिरातीच्या माध्यमातून
अंतर्गत व बाह्य जनांना आपण संदेश देत असतो. जाहिरातीचा मुख्य हेतू हा औद्योगिक संस्थेची लोकसेवा करणे हा असतो. यातून अनुकूल जनमत तयार होते. त्याचबरोबर सामाजिक हिताचा संदेश प्रसारित करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या जाहिरातींना 'जनहितार्थ प्रसारित' जाहिराती म्हणतात. उदा. वीज वाचवा, पाणी, पेट्रोल इत्यादींचा अपव्यय टाळा, झाडे लावा झाडे जगवा, कन्या वाचवा, लिंगभेद करू नका, आगीपासून बचाव, आरोग्य प्रदूषण इ. त्याचबरोबर आणखी काही इतरही बाह्य प्रसार माध्यमे आहेत. सिनेमाच्या दरम्यान
दाखविण्यात येणाऱ्या स्लाइडस्, संगणकीकृत, रेखाचित्र चलचित्र, देखावा, छोटी माहिती केंद्रे, बस थांब्यावरील छप्पर यातूनही समाजापर्यंत मुद्रित माहिती पोहोचू शकते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.