Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: मुलाखत

Friday, 28 May 2021

मुलाखत

 (Dhere V. D.)

B.A . III History paper XVI

  मुलाखत:- 

   इतिहासातील अभ्यासक संशोधकाला मुलाखत हा पर्याय सगळ्यात चांगला पर्याय आहे. अभ्यास विषयाची व्याप्ती पाहिल्यानंतर आपण कोणा कोणाची मुलाखत घेतली पाहिजे याचा विचार संशोधकाने करणे क्रमप्राप्त आहे? मुलाखत किती लोकांची घेणे आवश्यक आहे? मुलाखतीचे स्वरूप कसे कोणती असावी? याचा अगोदर विचार करावा मुलाखत म्हणजे तोंडी पद्धती होय. संशोधक आपले विचार मुलाखतीतून मांडतो लोकांना त्याबद्दल काय वाटते?  त्यांना कोणता प्रमाणबद्ध प्रतिसादाची अपेक्षा नसते.

     मुलाखत घेणारा मुलाखतकारा समोर मुलाखती चा विषय मांडतो. मुलाखतीमधील त्याचा हेतू स्पष्ट करून निवेदक मोकळेपणाने बोलण्याची मुभा देतो. प्रश्न व उत्तरे दोन्ही पूर्वनियोजित नसल्यामुळे मुलाखतीचे स्वरूप निश्चित राहते. व मुलाखतकराच्या गरजेप्रमाणे- सोयी प्रमाणे त्यास मूळ विषयाला अनुसरून इतर संबंधित प्रश्न विचारता येतात. या प्रकारच्या तंत्रामुळे निवेदकाला व मुलाखत काराला स्वातंत्र्य मिळते. या प्रकारांमध्ये मुलाखतकाराकडे प्रश्न विचारण्याचे अधिक कौशल्य लागते. मुलाखतकार कोणताही प्रश्न विचारू शकतो. निवेदक विषय सोडून दुसरी माहिती सांगत असेल तर त्याला विषयाची आठवण करून देतो त्यामुळे संपूर्ण चर्चा संबंधित विषयावर होते.

मुलाखत कशी घ्यावी? व त्यातील प्रश्नांचे स्वरूप कसे असावे?

१). संशोधकांनी मुलाखत घेत असताना कोणाची मुलाखत घेतली असता आपल्या कार्याला अधिक मदत होईल याचा अंदाज घ्यावा.

२). मुलाखत केव्हा घ्यावी याचा पूर्ण विचार करून मुलाखत घ्यावी.

३). ज्यांच्या मुलाखती घ्यावयाचे आहेत त्यांची प्रथम यादी तयार करावी.

४). प्रश्न सरळ, निसंदिग्ध, मुद्देसूद व सुटसुटीत असावेत म्हणजे मुलाखत कराचा गोंधळ होत नाही.

५). प्रश्न मुद्देसूद असतील तरच उत्तरे मुद्देसूद मिळतात.

६). मुलाखत घाईगडबडीत घेऊ नये ज्या व्यक्तीकडून मुलाखत घ्यायची आहे ती व्यक्ती बौद्धिक दृष्ट्या सक्षम असावी.

७). मुलाखत त्या व्यक्तीच्या सोयीच्या ठिकाणी घ्यावी म्हणजे तो उत्तरेही उत्साहाने देतो.

८). प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असावेत व्यक्तिनिष्ठ असतील तर मुलाखतकार मोकळेपणाने माहिती देणार नाही.


      मुलाखतीचे फायदे (गुण)

      १). उत्तम प्रतिसाद:- संशोधक स्वतः संशोधन क्षेत्रात जाऊन निवेदकाशी प्रथम संबंध प्रस्थापित करतो त्याच्याकडून माहिती संकलन करतो त्यामुळे निवेदकाचा प्रतिसाद उत्तम असतो.

      २). प्रश्नाची योग्य उत्तरे मिळतात:- निवेदकाच्या मनात प्रश्नाविषयी गोंधळ निर्माण झाला तर ते एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात असल्याने शंकाचे निरसन होते व सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित रित्या मिळतात.

      ३). सखोल अभ्यास होतो:- मुलाखत कार व मुलाखत देणारा या दोघांमध्ये एखाद्या घटनेविषयी व्यापक चर्चा होऊन अत्यंत बारीक सारीक माहिती संकलित होते त्यामुळे अभ्यास  सखोल होतो.

      ४).  पात्र लोकांकडून माहिती मिळण्यास उपयुक्त:-  निरक्षर लोकांकडून लहान मुलांकडून एखाद्या विषयाची माहिती संशोधकाला मिळवायचे असेल तर मुलाखत तंत्र हेच प्रभावी तंत्र आहे.

      ५). नाखूष लोकांकडून विश्‍वसनीय माहिती संकलित करण्यासाठी उपयुक्त तंत्र:- समाजात असे काही लोक असतात की कोणत्याही बाबी संबंधी विचारलेल्या प्रश्नांना काही कारणाने उत्तर देण्याची त्यांची इच्छा नसते असे नाखूष लोक सुद्धा मुलाखतीच्या माध्यमातून जेव्हा इतिहास काळापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्याकडून ही विश्वसनीय माहिती मिळू शकते.

      ६). मुलाखतीच्या सहाय्याने भावना  जाणता येतात:-. निवेदका कडून एखाद्या प्रश्नाविषयी माहिती घेत असताना तो भावनिक होऊ शकतो. काही वेळेला त्याच्या मनात असलेल्या अनामिक भीती मुळे तो उत्तर देण्याची टाळाटाळ करतो अशा वेळेला मुलाखतकार व निवेदक समोरासमोर असल्याने निवेदकाच्या मनातील भीती दूर करून त्यांच्या भावनांना आवर घालून आपणास योग्य माहिती संशोधक मिळवू शकतो.

      ७). माहितीची विश्वसनीयता:-. मुलाखतकार स्वतः निवेदकाची मुलाखत घेत असल्यामुळे व मिळालेल्या माहितीची नोंद करत असल्याने माहिती विश्वसनीय असते.

      ८). खरे-खोटे ची तपासणी करणे शक्य:-. मुलाखत घेणारी व्यक्ती प्रशिक्षित असेल तर निवेदकाला बोलते करून त्यांनी सांगितलेली माहिती खरी की खोटी याची शहानिशा करताना निवेदकाचे हावभाव बोलण्यातील चढ-उतार स्वतः पाहिल्यामुळे सत्यासत्यता पडताळून शकतो.

        त्याची मुलाखत घ्यायची आहे त्याची  स्मरण शक्ती समजते मौखिक इतिहास समजण्यास मुलाखत महत्त्वाचे साधन आहे मुलाखत घेताना संशोधकाने पुढील बाबींचा विचार करावा.

मुलाखतीचे स्वरूप

  १). प्रत्यक्षात संपर्क:-. मुलाखत देणारा व घेणारा यांच्यात प्रत्यक्ष सरळ संबंध प्रस्थापित होत असल्यामुळे कोणताही निवेदक खुल्या मनाने संशोधकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतो त्यामुळे मुलाखत यशस्वी होते.

  २). मुलाखत ही पूर्वनियोजित असते:- मुलाखत तंत्र कौशल्याने हाताळल


Dhere Sir, [18.05.21 12:22]

े लागते मुलाखतीतून योग्य व आवश्यक माहिती मिळवण्यासाठी मुलाखतीची पूर्वतयारी करणे आवश्यक असते. संशोधकाला सर्वप्रथम संशोधनासाठी निवडलेल्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करावा लागतो. मुलाखतकाराने योग्य प्रश्न विचारण्याचे कौशल्य वापरावे मुलाखतकार कोणताही प्रश्न केव्हाही विचारू विचारू शकतो. निवेदक विषय सोडून दुसरेच माहिती सांगत असेल तर त्याला विषयाची आठवण करून द्यावी लागते.

  ३). मुलाखत म्हणजे  हेतूपूर्वक संवाद:-. संशोधक व निवेदक यांच्यामध्ये मुलाखतीदरम्यान होणारा संवाद आहे. उपयोग होत असतो निवेदिका कडून मिळालेली माहिती सत्य आहे की नाही हे तपासता येते विविध मुलाखतीमधून येणारे निष्कर्ष आपण काढू शकतो.

  ४). विश्वसनीय माहिती संकलित करण्याचा हेतू:-. संशोधक निवेदक आखडून संशोधन विषयासंबंधी विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी मुलाखत तंत्र वापरतो मुलाखती संरचीत असो की  संरचीत, औपचारिक /अनौपचारिक व्यक्तिगत असो की समूह त्या  मागील हेतू हा विश्वसनीय माहिती मिळवणे हाच असतो.

  ५). मुलाखत एक परिणामकारक संवाद:-. मुलाखतीमध्ये फक्त संशोधक निवेदकाला प्रश्न विचारतो व निवेदक त्याची उत्तरे देतो, असे नसून निवेदक ही त्याच्या मनात निर्माण होणारे शंका संशोधका समोर मांडतो व त्यांचे निराकरण करून घेतो. त्यामुळे मुलाखत ही दुहेरी पातळीवर चालणारे विचार व भावना यांची देवाणघेवाण असते.

मुलाखतीचे प्रकार

१). संरचित किंवा आकारिक मुलाखत:- मुलाखत तंत्रात पूर्वनियोजित साचेबंद प्रश्न विचारले जातात त्यामध्ये मिळणारी उत्तरे ही साचेबंद असतात काही वेळा उत्तर सुद्धा होय नाही अशा पर्यायी स्वरूपाची असतात िवेदकाला त्याच्या प्रश्‍नांच्या बाहेर जाता येत नाही म्हणून या मुलाखतीला आकारिक किंवा संरचीत मुलाखत म्हणतात.

२). खुली किंवा मुक्त मुलाखत:-. या मुलाखत प्रकारात पूर्वनियोजनाशिवाय प्रश्न विचारले जातात. या प्रकारात मुलाखत करायला आपल्याला कोणते उत्तर मिळेल हे सांगता येत नाही.

A. मुलाखतीत लवचिकता साधंता येते:- मुलाखतीत एखादा प्रश्न निवेदकाला समजला नसेल तर वेगळ्या पद्धतीने त्याची रचना करून निवेदका कडून योग्य माहिती संकलित करता येते. निवेदकाची नेमकी मानसीकता कशी आहे याचा अंदाज घेऊन योग्य वेळी योग्य प्रश्न विचारून माहिती मिळवता येते.

B. अज्ञात घटनांचा अभ्यास शक्य होतो:-. मुलाखत हे असे तंत्र आहे की ज्या द्वारे निवेदकाशी स्वतः संपर्क साधून त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून बोलते करून त्यांच्याकडून अद्याप अज्ञात असलेल्या घटनांचा ही अभ्यास करता येतो.

C. मुलाखतीत कल्पनांचे आदान-प्रदान होते:- मुलाखत तंत्रात संशोधक व निवेदक हे परस्परांच्या विचार कल्पनांचे आदान-प्रदान करतात अशी सुविधा इतर माहिती संकलन तंत्रात उपलब्ध होत नाही त्यामुळे मुलाखतीचा हा मोठा फायदा आहे.


     मुलाखतीचे दोष

१). खर्चिक व वेळ खाणारी पद्धत:- मुलाखत साठी श्रम वेळ व पैसा खर्च होतो प्राथमिक स्वरूपातील संशोधक जेव्हा अभ्यास क्षेत्रात गेल्यानंतर मुलाखत येणाऱ्यांची भेट होतेच असे नाही. अशावेळी संशोधकाला प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागतो. पुन्हा पुन्हा संवाद साधावा लागतो त्यामुळे ही पद्धत खर्चिक आहे.

२). मुलाखतीमुळे बऱ्याच वेळेला अनावश्यक माहिती गोळा होते.

३). मुलाखतीत वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या अर्थात बदल होण्याची शक्यता असते.

४).  मुलाखत करायला काही वेळेला अपमान सहन करावा लागतो.

५). मुलाखत घेणारा व देणारा यांच्यातील ही अंतर क्रिया पूर्णपणे परस्पर विश्वासावर आधारित असते.

६). मुलाखत करामती प्रचंड सहनशील तसेच आवश्यक असते.

७). मुलाखत घेण्याची वैयक्तिक कौशल्य सर्वांनी आत्मसात करणे आवश्यक असते.

८). मुलाखत जर एखाद्या धंदेवाईक राजकारणी व्यक्तीची असेल तर तो मुद्दाम मुलाखत करायची दिशाभूल करण्याची शक्यता असते.

९). मुलाखत जर वयस्कर व्यक्तीची असेल तर तो बऱ्याच वेळेला विचारलेल्या प्रश्नापासून दूर जातो. व स्वप्नरंजनात गुंतून पडतो. त्यामुळे मुलाखतीचा हेतूच नष्ट होण्याची शक्यता असते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

On His Blindness

  Introduction "On His Blindness" is a well-known sonnet written by John Milton.  John Milton is  a famous English poet. The poem...