(Dr Dhere V. D.)
मराठे कालीन अर्थव्यवस्था
B.A.I. Sem. II History Paper No II
मराठे कालीन अर्थव्यवस्था ( कृषी)
शिवकाळाचा अभ्यास करताना आपणास तत्कालीन अर्थव्यवस्था जाणून घेणे महत्वाचे आहे. त्या काळात अर्थव्यवस्थेचा भर बहुतांश शेतीवरच होता त्यामुळे शेती योग्य ठिकाणी गावचे वसाहत आणि शेतीचे उत्पन्न या बाबत आपणास विचार करावा लागतो. शिवकाळात लोक वस्ती करून ज्या घट्ट जमिनीवर घरे बांधून राहत त्यास पांढर किंवा गाव पांढरी असे म्हणत त्या लोकांची गुजराण ज्या शेतीवर होत असे त्या शेतीला काळी आई असे म्हणत असत. शेतीचे दोन प्रकार होते त्यास लागवडीखालील जमीन व वाजट जमीन असे म्हणत असत. शिव काळात एकूण तीन वेळा जमिनीची मोजणी करण्यात आली होती. मोजणीसाठी शिवशाही काठी हे साधन वापरले जात होते. जमिनीची प्रत व प्रतवारी करताना अवल सिम धूम व वाजत किंवा चारून असे चार प्रकार केलेले होते.
शिवकालीन कृषी व्यवस्था
शेतकरी
शिव काळात शेती हाच जीवनाचा प्रमुख अर्थ प्राप्तीचा मार्ग होता तसेच जमीन महसूल हा राज्यातही मुख्य स्त्रोत होता बहुतांश कृषी व्यवस्था रयतेच्या हिताची होण्यासाठी शिवाजी महाराजांनी जमीनदारांचे जमीनदारी चे हक्क काढून घेतले जहागीर पद्धत बंद केली जमिनदारी ऐवजी रयतवारी पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे सामान्य शेतकरी व राजा यांचा प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला जमीन मोजणी नंतर त्याचे धारे म्हणजे प्रत्यक्ष खाते उतारे तयार करण्यात आले. त्यामुळे जमिनीचा किती वापर केला जातो? कोण करतो? कशासाठी करतो? येणारी पिके कोणती? याबाबतची सविस्तर माहिती लेखी माहिती उपलब्ध झाली. शेतकऱ्यांना दुष्काळ काळात किंवा नवीन शेती लागवडी खाली आणण्यासाठी तगाई हे शासकीय कर्ज देण्याची पद्धत सुरू केली. तगाई जनावरे अवजारे बी-बियाणे यासाठी अत्यल्प व्याजदराने तगाई हे कर्ज शेतकर्यांना दिले जात होते.
मिरासदार
गावातील पूर्वापार रहिवासी ज्यांच्या मालकीची शेतजमीन आहे आणि जे ठराविक शेत्सरा सरकारला भारतात अशांना मिरासदार असे म्हटले जाईल मिरासदार जमिनीचे मालक असल्याने त्यांचा सन्मान गावात केला जाईल सभा व्यवस्था इत्यादी ते भाग घेत त्यांना काही ठिकाणी स्थळकरी असेही म्हटले जाई.
उपरे
गावचे रहिवाशी मात्र ज्यांना स्वतःची जमीन नाही ते दुसर्याची जमीन खंडाने भागाने अथवा मोलमजुरी करतात किंवा बाहेरून बाहेरील गावातून येऊन या गावातील जमीन कसतात या लोकांना उपरे असे संबोधले जाई.
जमिनीला भुमाता असे समजले जाईल जे उपजाऊ केल्याने शेतकरी हा उत्पादक घटक असे. कागदपत्रात शेतकऱ्यांचा उल्लेख कुणबी,रयत असा केला जाई.
बलुतेदार व अलुतेदार (कारू/ नारू)
शेतीच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अवजारांची व विविध लोकांची मदत होत असे त्यापैकी करू किंवा बलुतेदार म्हणजे शेतीसाठी आवश्यक सेवा पुरवणारे लोक होय यांना त्यांच्याकडून घेतलेल्या वर्षभरातील सेवेचा वार्षिक मोबदला म्हणून बलूते दिले जाई. कारागिरा प्रमाणेच अन्य सेवा ही गावात आवश्यक असत मिळत त्या सर्वांना आलुतेदार असे म्हटले जाई. बलूत्याच्या प्रमाणात आलुते हे अत्यल्प असे मात्र ते दिले जात असे. बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार असत.
जमीन धरणीच्या प्रमुख तीन पद्धती होत्या त्यामध्ये
पहिली पद्धत मिराशी किंवा तालवाहिका
मिराशी शेतकऱ्याला जोपर्यंत तो सरकारी शेतसारा करतो तोपर्यंत त्यास जमिनी पासून वंचित करता येत नसे त्याच्याकडून जमीन काढून घेतली जात नसे.
दुसरी पद्धत उपरी
खंडाने किंवा तात्पुरती कसण्यासाठी जमीन घेऊन ते कसणारे बसण्याची पद्धत म्हणजे उपरी उपरी ला हा अधिकार होता मात्र जमिनीची मालकी नव्हती.
तिसरी हे वतन जमीन धारणा पद्धती होती.
ग्राम अधिकारी व कारागीर यांना वतन जमीन मिळत असे.
मराठी कलिन कृषी तंत्र
तत्कालीन शेतीचा विचार करता बैलजोडी शेतीची अवजारे बी-बियाणे खते व साधने याद्वारेच शेती फसवणूक केली जात असे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत होता प्रामुख्याने शेती ही पावसावर अवलंबून होती काही शेती पटस्थळ किंवा मोठस्थळ म्हणजे बागायती देखील होती.
मनुष्यबळ
शेतीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती शेतकरी आपल्या शेतात सहकुटुंब कसवणूक करत असे. काहीवेळा त्यासाठी इतरांची मदत घेतली जात असे त्याला पैरा असे म्हणतात.
बैल जोडी
पशुधन हे शेतीसाठी आवश्यक होते बैलजोडी द्वारे नांगरणी व इतर शेतीची कामे केली जात असत युद्धजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांची जनावरे पळवून नेले जात असे शेती मोडकळीस येत असे थोडक्यात गाई-बैल याद्वारे शेती होते हे लक्षात घेऊन शिवरायांनी त्यांच्या रक्षणाकडे विशेष लक्ष दिले.
अवजारे
शेती व्यवसायासाठी अवजारांची गरज होती त्यासाठी बलुतेदारांची मदत घेतली जात असे नांगरणीसाठी नांगर, कुळव, तिफण, कोळपा, निलंगा, पाटे इत्यादी लोहार सुतार बनवत असत तर त्यासाठीची चर्म साहित्य हे चांभारा कडून घेतले जाई. पाभर वगैरे कुंभाराकडून घेतली जाई.
बी-बियाणे/ बेवळा
शेतकरी आपल्या उत्पादीत धान्य मधूनच बी-
Dhere Sir, [26.05.21 10:55]
बियाणे बेवडा चांगल्या प्रकारे काढून वेगळे काढून ठेवत असे ते काळजीपूर्वक जपले जाईल एकमेकास बी-बियाणे देताना ते दीड च्या दराने दिले जाईल बियाण्यांसाठी गरजू शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत म्हणजेच तगाई दिली जाई.
खते
शेती उत्पन्न चांगले येण्यासाठी शेतकरी शेणखताचा वापर करत असे. त्यासाठी त्याचे स्वतःचे जित्राब म्हणजे गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, गाढव इत्यादी या पशुधनाच्या मलमूत्र पासून खत तयार करून ते शेतात टाकले जाई.
बहुतांशी शेती ही पावसावर अवलंबून होती त्यामुळे मोसमी पाऊस सुरू होण्या अगोदर जमीन तयार करून ती पेरणीयोग्य करून त्याची पेरणी केली जाई. रोहिणी नक्षत्रातच पेरणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असे.
शेत जमिनीचे प्रकार
शेत जमीनीचे एकूण चार प्रकार केले होते ज्यामध्ये
अव्वल,
सिम,
दुम
आणि चारहुम किंवा वाजट
अव्वल
ज्या जमिनीतून हमखास दरवर्षी चांगले उत्पादन येईल अशा जमिनीस अव्वल जमीन असे म्हटले जाई. यात पुन्हा दोन उपप्रकार होते.१) बागायती २) जिरायती.
१.१ बागायती जमिनी चे पुन्हा दोन उपप्रकार पडतात. पटस्थळ. -- डोंगर उंचवट्यावर पाणी पाटाने अथवा तलाव, कालवा यातील पाटाने पाणी आणून जी जमीन सिंचित किंवा बागायत केली जात असे त्या जमिनीचा पाटस्थल असे म्हणतात
१.२. मोटस्थळ.-- जे शेतकरी स्वतःची विहीर काढून त्या विहिरीला मोट जोडून त्याद्वारे शेती सिंचित बागायती करत असत अशा जमिनीस मोटस्थल जमीन असे म्हणत.
सिम
ज्या जमिनीत सलग प्रत्येक वर्षी पीक न येता एखादे वर्ष पडीक केल्यानंतर किंवा वेगळे पीक घेतल्यानंतर उत्पादन येते अशी जमीन म्हणजे सिम जमीन होय.
दुम
जी जमीन एकदा कसं पीक घेतल्यानंतर पुन्हा एक, दोन, किंवा तीन वर्षे पडीक टाकावी लागते त्यानंतरच पीक उत्पादन घेता येते अशा जमिनीस दुम जमीन असे म्हणतात.
चारहुम किंवा वाजट
ही जमीन खडकाळ आहे ज्यात गवतात शिवाय काही उत्पादित होत नाही अशा जमिनीस वाजट किंवा चारहुम जमीन असे म्हणतात.
जिरायत जमिनीत शक्यतो सर्वसाधारण पिके घेतली जात तर बागायती जमिनीत ऊस, हळद, कापूस, भाजीपाला इत्यादी नगदी पिके घेतली जात.
कृषी उत्पादने
दैनंदिन वापरासाठी लागणारे सर्व उत्पादने शेतकरी आपल्या शेतीच्या मगदुराप्रमाणे उत्पादित करत असे. ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, राळे, बार्गा,गहू, जवस, तेलबिया. कडधान्य ज्यामध्ये मूग, मसूर, तूर, उडीद, मटकी, हुलगा इत्यादी डाळ वर्गीय पिके.
विविध प्रकारची फळे महाराष्ट्रात उत्पादित होत असतात त्यामध्ये कोकणात आंबा, फणस,कोकम तर देशावर चिंच, बोर, लिंबू, केळी इत्यादी.
नगदी पिके /व्यापारी पिके
शेतकऱ्याला रोख पैसा किंवा नगर मिळवून देणारी पिके हीसुद्धा आवश्यक होते व त्यानुसार आपल्या शेतीच्या मगदुरानुसार शेतकरी ही व्यापारी पिके घेत असे.
ज्यामध्ये कापूस, ऊस, खाऊची पाने, मसाल्याचे पदार्थ तेलबिया, भुईमूग शेंग, करडई, सुंठ, मिरची, कांदा, लसूण, खोबरे, वेलदोडे, गुळ, खडीसाखर, तूप, मध, मोहरी, आणि इतर पिके. तंबाखू, हळद, नारळ-सुपारी इत्यादी घेत असे.
सरकार गावातील काही जमिनी या इनाम जमिनी देतसे ज्यामध्ये खालील कामांचा समावेश होता.
सनदी इनाम/ दीवान निसबत इनाम.
शासकीय कामासाठी ज्या लोकांची नेमणूक केली जाईल त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हे सनदी ईनाम दिली जात असे ही जमीन शेतसाऱ्यात सवलत असणार होती.
देवस्थान इनाम
साधुसंत फकीर मठ मंदिरे मशिदी इत्यादींना दिलेले उत्पादन योग्य जमीन इनाम जमीन.
अग्रहार ईनाम
ब्रह्म वृदास अथवा एखाद्या ब्राह्मणास शिक्षण हेतूने दिलेले ईनाम म्हणजे अग्रहारी ईनाम होय.
बलुतेदारांना दिलेली इनाम जमीन
पाटील कुलकर्णी देशमुख शेटे महाजन देशपांडे इत्यादींना अक्कल आजबे यांचा विचार करता इनाम जमिनी दिली जात असे.महाराना हाडकी हाडोळा व म्हारकी इनाम जमीन दिली जात असे. सुतार की भटकी सोनार की परीट की या नावाने उल्लेख आढळणारे जमिनी या त्या त्या व्यवसायिकांना इनाम दिलेली असत.
इतर इनाम जमिनी
राजा आपल्या लेकिस दूध-भात किंवा साडी-चोळी इनाम देत असे सैनिकांच्या आईला किंव्हा बायकोस राजाकडून सोळकर चोळखण इनाम दिले जाई. युद्धामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांनाही इनामी जमीन दिली जात असे.
जमीन मोजणी
शिवशाही काठी या द्वारे शिवकाळात जमिनीची मोजणी केली गेली. ही काठी पाच हात पाच मुठीआणि तीन तांसु इतक्या लांबीची होती. वीस चौरस काठ्याचा एक पांड तयार केला जाई. 20 पांडाचा मिळून एक बीघा तयार होईल 20 चौरस बिघे यांचा एक चावर निर्माण होई. जमीन मोजणी साठी सरकारी अधिकारी व गावातील महार या वतनदारांची मदत होत असे.
सारा आकारणी..
शिवकाळात सरकारने प्रतवारीनुसार सारा आकारणी केली होती. जमिनीचे चार प्रकार केले होते. त्यानुसार सारा आकारणी केली जात असे त्यास धारा आकारणी असेही म्हटले जात असे.इ.स.१६३६ मध्ये पहिल्यांदा पुणे जहागिरीची जमीन मोजणी दादोजी कोंडदेव ने केली.इ.स.१६४८ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी पुन्हा मोजणी केली तर
Dhere Sir, [26.05.21 10:55]
इसवी सन१६७८ मध्ये अण्णाजी दत्तो यांनी तिसऱ्यांदा मोजणी केली.
सारा करण्याचे प्रमाण हे जरी प्रतवारीनुसार असले तरी येणाऱ्या उत्पन्नातून दोन प्रकारे शेतसारा शेतकरी भरू शकत असे.
१) नक्त २) बटाई
येणाऱ्या उत्पन्नाचे पाच भाग करून तीन भाग शेतकऱ्याला तर दोन भाग सरकारात ( २/५)शेतसारा म्हणून जमा करावे लागत असत. तत्कालीन कागदपत्रांत `राजभाग पाचदुई` असा उल्लेख आढळतो.
१) नक्त = नक्त म्हणजे रोख स्वरूपात पैशाच्या स्वरूपात शेतसारा भरणे.
ऊस, फळे, आले, हळद, कापूस इ. नगदी पिकांवर नक्त सारा आकारला जाई.
२) बटाई = बटाई म्हणजे उत्पादित धान्याचा हिस्सा वाटणी प्रमाणे शेतसारा म्हणून भरणे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या शेतीविषयक सुधारणा
रयत हाच केंद्रबिंदू मानून शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली ज्यामुळे त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक बाबींकडे विशेष लक्ष दिले. ज्यामध्ये रयतेला त्रास किंवा आजार वाढतो ती इनामदारी जागीरदार पद्धत त्यांनी पहिल्यांदा बंद केली. त्याऐवजी शासकीय नोकर म्हणून सर्व कार्यवाही सुरू केली ज्यामुळे कालपर्यंत जो इनामदार पाटील होता. तो आता गाव कामगार पाटील झाला.
१). गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी चे काम पाटलास दिले गेले.
२). नवीन नवीन जमीन लागवडीखाली आनील त्यास शेत साऱ्यातून माफी देण्यात आली. पहिल्या वर्षी इस्तवा म्हणजे करमुक्त जमीन दिली. तर इथून पुढे सलग आठ वर्ष काही प्रमाणात कर वाढवत आठ वर्षानंतर पूर्ण कर घेण्याची मुभा पाटलास दिली.
३). ज्या रयते कडे जमीन कसण्याची कुवत आहे. मनुष्यबळ आहे पण जमीन नाही. अथवा बैलजोडी नाही अथवा बियाने नाही त्यांना सरकारकडून नवीन जमीन आणि तगाइ हे कर्ज दिले गेले.
४). एखादा शेतकरी कष्टाने जमीन करतो आहे मात्र अपेक्षित उत्पन्न न आल्याने त्याची आर्थिक पत ढासळली आहे तो तरी फेडू शकत नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली गेली.
५). नदी, नाले, ओढे यावर बंधारे बांधून बागायती शेती साठी प्रोत्साहन दिले गेले.
६). नवनवीन बाजारपेठा उसवून शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळेल तो विक्री करू शकेल व स्वतःचे उत्पन्न वाढवू शकेल यासाठी प्रयत्न केले गेले.
७). शेती व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नव्हते. ज्यांना सैनिकी व्यवसायात आवड आहे अशा सर्वांसाठी सैनिक भरती केली ज्यामुळे चार महिने शेती आणि आठ महिने सैनिकी नोकरीतून उत्पन्न वाढवून स्वतःची प्रगती करणे शेतकऱ्याला शक्य झाले.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.