Skip to main content

समाज आणि जनसंपर्क माध्यम

 

B.A.I SEMESTER 2

SOCIOLOGY PAPER 2

उपयोजित समाजशास्त्र

प्रकरण - 2

समाज आणि जनसंपर्क माध्यम

() इलेक्ट्रॉनिक माध्यम

इलेक्ट्रॉनिक म्हणजे अणुविद्युत माध्यमे होय. ऊर्जेवर चालणारी उदा. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, टेलिफोन, संगणक ही अणुविद्युत माध्यमे आहेत.

जनसंज्ञापनाचे आधुनिक जनसंपर्क माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना आजच्या काळात अतिशय महत्त्व निर्माण झाले आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रकाराचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे.

. आकाशवाणी (Radio) : रेडिओ हे एक श्राव्य माध्यम आहे. म्हणजे केवळ ऐकण्याचे माध्यम होय. मानवी आवाज विश्वभरात पोहोचवणारे रेडिओ हे एक जादुई माध्यम आहे. रेडिओ हे एक व्यक्तिगत माध्यम असल्याने ते गर्दीमध्येसुद्धा ऐकणाच्या व्यक्तीस ऐकवत राहते. आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये रेडिओचा प्रभाव खूप व्यापक असा आहे. विशेषतः कृषीविषयक कार्यक्रमांचा अधिक संख्येने अंतर्भाव केल्यामुळे रेडिओ शेतकऱ्यांचे उपयुक्त साधन बनले आहे.

इटालियन शोधकर्ता आणि इंजीनिअर ग्विलियेल्यो मार्कोनी यांनी १८९६ मध्ये रेडिओचा शोध लावला. १९२३ मध्ये 'रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे' ने पहिला आकाशवाणी कार्यक्रम प्रसारित केला. 'इंडियन ब्रॉडकास्टिंग' या नावाने १९२७ मध्ये मुंबई व कोलकता येथून प्रायोगिक तत्त्वावर प्रसारण सुरू झाले. आकाशवाणी सेवा या १९३० मध्ये शासनाच्या नियंत्रणाखाली आल्या व १९३६ मध्ये या सेवा (All India Radio) 'ऑल इंडिया रेडिओ' या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. १९९७ मध्ये लोकसभेने 'प्रसारभारती' (Prasarbharati) ही कायदेशीर व्यवस्था प्रस्थापित केली व त्यात आकाशवाणी व दूरचित्रवाणीच्या सेवा समाविष्ट करण्यात आल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रेडिओच्या सेवा अनेक भागांत विस्तारण्यात आल्या. रेडिओच्या कार्यक्रमाचे प्रसारण आज २४ भाषा व १४६ बोलीभाषांमधून हो आहे. १९९८ मध्ये News Online ही सेवा सुरू करण्यात आली. १९५७ साठी रेडिओचे 'आकाशवाणी' असे भारतीय नामकरणही करण्यात आले. रेडिओ या माध्यमातून बातम्या, गाणी, कविता, व्याख्याने, मुलाखती, खेळ, नाटक, आरोग्य, कृषी तसेच ते विद्यार्थी, स्त्रिया, कामगार, शेतकर, व्यापारी, उद्योगपती या सर्वांसाठी उपयुक्त कार्यक्रम प्रसारित केले जातात. रेडिओची तीन महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे प्रक्षेपणालाही दूरवर तारांचे जाळे पसरविण्याची आवश्यकता नाही. दुसरे म्हणजे रेडिओ हे ध्वनीलहरीच्या माध्यमातून प्रक्षेपण करत असल्याने अशिक्षित लोकांनादेखील उपयुक्त आहे. तिसरे म्हणजे एकाच व्यक्तीचा, गटाचा व संस्थेचा आवाज, संदेश, विचार जगभर पोहोचविण्याची क्षमता रेडिओमध्ये आहे. जनसंज्ञापनाचे रेडिओ हे एक आधुनिक तंत्रज्ञान सर्वांना भुरळ पाडणारे ठरले आहे. मनोरंजनातून लोकशिक्षण देणारे रेडिओ हे अत्यंत प्रभावी जनसंपर्क माध्यम आहे.

१९६७ साली विविध भारती ही आकाशवाणीची व्यापारी शाखा सुरू करण्यात आली. त्यातून जाहिरात प्रसारणही सुरू झाले. जनसंपर्काचे आकाशवाणी हे एक उत्कृष्ट. साधन असून मनोरंजनाबरोबरच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांत यामुळे जनजागृती होत आहे.

. दूरचित्रवाणी (Television) : दूरचित्रवाणी हे दृक-श्राव्य माध्यम आहे. म्हणजेच दूरचित्रवाणीच्या पडद्यावर प्रसंग चालू असताना ते ऐकण्याबरोबर पाहण्याचीही संधी मनुष्याला मिळते. दूरचित्रवाणीचा शोध १९२६ मध्ये जे. एल. बेअर्ड यांनी लावला. हे माध्यम बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी, अनेक नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि मनोरंजनासाठी उपयुक्त आहे. जनसंज्ञापनाच्या क्षेत्रात टी. व्ही. माइलस्टोन ठरला आहे. भारतात दूरचित्रवाणीचे पर्दापण १५ सप्टेंबर, १९५९ रोजी दिल्ली आकाशवाणी भवनमधून केलेल्या प्रायोगिक प्रक्षेपणाद्वारे झाले. त्यानंतर मुंबई व मद्रास (१९७२) या शहारांपासून सुरू झालेला प्रवास केबल क्रांतीमुळे देशभर पसरला. केबल क्रांतीने जनसंज्ञापनासाठी देशभर जाळे विणले. Television म्हणजे दुरून वा खूप अंतरावरून मिळालेले शहाणपण होय.

१९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धा दरम्यान (एशियाड) दूरदर्शनने भारतात रंगीत .प्रसारण सेवेची सुरुवात केली. तसेच प्रत्येक राज्याच्या राजधानीत दूरदर्शन केंद्राची स्थापना केली. संपूर्ण देशाला प्रसारण केंद्राद्वारे जोडण्यासाठी राष्ट्रीय नेटवर्क निर्माण करण्यात आले, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक अशा तीन पातळ्यांवरून दूरदर्शन सेवेचे प्रसारण केले जाते. लोकांच्या आवडीची शेकडो चॅनल्स आज अहोरात्र दूरदर्शनवर कार्यरत आहेत. लोक घरबसल्या जगातील कोणतीही घटना दूरचित्रवाणीवर पाहू शकतात. बातम्या, मनोरंजन, शैक्षणिक कार्यक्रम, संवाद, चर्चा, मुलाखती, व्याख्याने, गाणी, नृत्य, संगीत, क्रीडाविषय, आरोग्य अशा विविध प्रकारच्या गोष्टी दूरचित्रवाणीवरून पाहू व ऐकू शकतात. टी.व्ही. मुळे आधुनिक माहिती, विचार, मते, संस्कृती, मूल्ये लोकांच्या मनावर अत्यंत प्रभावीपणे बिंबविता येतात. तसेच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे, लोकांच्या मनात वैज्ञानिक वृत्ती वाढविणे, संस्कृतीचा वारसा जतन करणे अशी प्रमुख उद्दिष्टे बाळगली जातात. थोडक्यात, दूरचित्रवाणी ज्ञान व मनोरंजनाचे अतिशय लोकप्रिय संपर्क माध्यम आहे.

. चित्रपट (Movies) : चित्रपटसुद्धा लोकप्रिय दृक-श्राव्य (Audio Visual) माध्यम असून ते समाज परिणामासाठी व्यापक सामर्थ्य पुरविते. म्हणून चित्रपट हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे असे म्हणता येईल. भारतात सर्वप्रथम फ्रान्सचे सुमारे ब्रदर्स यांनी ७ जुलै, १८९६ रोजी एक चित्रपट प्रदर्शित केला. तथापि, खऱ्या अर्थाने भारतातील पहिले चलचित्र १९१३ मध्ये प्रदर्शित झाले. श्री. धनराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी पहिल्यांदा भारतीय मूक चित्रपट तयार केला. 'राजा हरिश्चंद्र' असे त्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाने भारतातील चित्रपट उद्योगाला जन्म दिला. १९२८ मध्ये बोलपट अस्तित्वात आले. प्रत्येक चित्रपट हा लोकांवर प्रभाव टाकण्यास व त्यांना तणावातून मुक्त करण्यास सक्षम असतो. उदा. विनोदी चित्रपट, सामाजिक व शोकांतिक चित्रपटामुळे चित्रपट पाहणाऱ्यांच्या भावना मोकळ्या होतात. चित्रपट लोकांना संप्रदायवाद, भ्रष्टाचार, विश्वास, लोभ, राजकारण, दारिद्र्य, लैंगिक हिंसाचार अशा व्यापक आणि संवेदनशील प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडतात. चित्रपटांनी भारतीयांना खूप आकर्षित केलेले आहे. तुलनात्मकदृष्ट्या चित्रपट हे मनोरंजन, शिक्षण व लोकजाणिवेचे स्वस्त व लोकप्रिय साधन आहे. चित्रपट हे जनसंज्ञापनाचे अत्यंत परिणामकारी व प्रभावी माध्यम आहे. वर्णनात्मक, नाट्यमय, वास्तव, समस्याप्रधान, कृतिशील, उत्तेजनात्मक, प्रचारात्मक, शैक्षणिक, ऐतिहासिक, घटनात्मक, शासकीय माहितीपर व्यवसाय मार्गदर्शनात्मक, मनोरंजनात्मक, कथनात्मक असे अनेक चित्रपटांचे प्रकार आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरांचा परिचयही यातून होतो.

. संगणक (Computer) : संगणक हे अत्याधुनिक जनसंज्ञापन माध्यम आहे. वास्तविक संगणक हे इलेक्ट्रॉनिक यंत्र असून, ते त्याला दिलेल्या सूचनेनुसार, आज्ञेनुसार (Comand) जलद माहिती पुरवीत असते. एखाद्या गोष्टीची गणना करणे वा एखादी गोष्ट मोजणे यासाठी वापरले जाणारे यंत्र म्हणजे संगणक असा अर्थ आहे. चार्ल्स बॅबेज हा संगणकविषयक मूळ संकल्पना मांडणारा पहिला शास्त्रज्ञ, होय आणि म्हणूनच त्यांना संगणक संकल्पनेचे जनक (Father of the Concept of Computer) असे मानले जाते. परंतु खन्या अर्थाने १५ फेब्रुवारी, १९४६ रोजी अमेरिकेतील हॉवर्ड युनिव्हर्सिटीने इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करून निर्माण केलेला संगणक हा पहिला संगणक आहे. त्याला इलेक्ट्रॉनिक न्युमरिकल इंटिग्रेटर अॅन्ड कॅलक्युलेटर (ENIAC) असे संबोधले जाते.

मोठ्या प्रमाणात माहितीचे वितरण करण्यासाठी संगणक हा आधुनिक माहिती व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. हे एक इलेक्ट्रॉनिक डिजिटल मशीन असते. माहिती क्षेत्रातील हा एक क्रांतिकारी बदल आहे. सुपर ते मायक्रो कॉम्प्युटर असे याचे स्वरूप आहे. त्याला क्रियाशील बनविण्यासाठी त्यातील सॉफ्टवेअर हे महत्त्वाचे असते.

संगणक एक संज्ञापन माध्यम म्हणून त्याची उपयुक्तता व त्याचे परिणाम विचारात घेता आज शैक्षणिक क्षेत्रात संगणकाला अत्यंत महत्त्व आले आहे. अभियांत्रिकी व अन्य महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान (IT), संगणकशास्त्र इ. विद्याशाखा सुरू करण्यात आल्या आहेत. भारतासारख्या देशात संगणक शिक्षण सक्तीचे असण्याची गरज बील गेटस् यांनी वीस वर्षांपूर्वीच सांगितली होती. संगणकीय ज्ञानामुळे कामगारांची उत्पादनक्षमता वाढत 'आहे. आज संगणक मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संगणक हे विश्वव्याप्त जनसंज्ञापन माध्यम आहे.

. इंटरनेट : इंटरनेट हे संज्ञापनाचे प्रभावी माध्यम असून अनेक घटकांच्या बाबतीत माहिती पुरविणारा प्रमुख स्रोत आहे. इंटरनेट म्हणजे दूरध्वनी जोडणी, तंतूदूक्साधन (fibre) optics), सॅटेलाइट लिंक्स व इतर माध्यमांना जोडलेल्या संगणकांचा संच होय. इंटरनेट माहितीचे स्रोत असून ते सतत वृद्धिंगत व परिवर्तित होत आहे. तांत्रिक भाषेत सांगावयाचे तर 'इंटरनेट म्हणजे संगणक जोडण्यांमधील सहकार्याधिष्ठित आंतरसंबंधाने आकारित झालेले जाळे होय. ज्ञान मिळविण्याच्या दृष्टीने आज कोणत्याही देशातील कोणत्याही व्यक्ती वा संघटनेशी इंटरनेटद्वारा संपर्क साधणे शक्य झाले आहे. इंटरनेट सेवेमुळे प्रत्येक व्यक्तीला जग हे जवळ आले आहे असे वाटते. त्यामुळे वैश्विक खेडे (Global Village ) ही संकल्पना विकसित झाली. Internet हे जगातील सर्वांत मोठे संगणकीय महाजाल आहे. माहितीचे हे कधीही न संपणारे अथांग भांडार आहे. सध्या Internet वर कोट्यवधी साईटस् उपलब्ध आहेत. सर्वव्यापी व सर्वस्पर्शी असे याचे स्वरूप आहे. माहितीचे आदानप्रदान करणारी ही व्यवस्था आहे.

आज स्मार्ट फोन, मोबाईल यांच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉटसअप्, व्हीडिओकॉल, ट्वीटर, यू-ट्यूब, -मेल अशा आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून हवी ती माहिती व संदेश अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...