पुराभिलेखागार
B.A.III paper XVI History Module I
पुराभिलेखागार
प्रस्तावना
प्राचीन काळी हाताने लिहिलेले लिखित मजकूर म्हणजे पुराभिलेख. आणि हे लेख लिहिलेल्या हस्तलिखितांचे दस्तावेज व पुरातन लेख जतन करून ठेवण्याची ठिकाण म्हणजे पुराभिलेखागार. पुरा म्हणजे प्राचीन किंवा पुरातन किंवा जुने आणि अभिलेख म्हणजे दस्तावेज किंवा कागदपत्र यांचे आगार म्हणजे पुराभिलेखागार. ऐतिहासिक कागदपत्रे ऐतिहासिक वस्तू जिथे एकत्रित संग्रह करून ठेवलेले असतात अशा शास्त्रीय पुराभिलेखागार असे म्हणतात याला इंग्रजी भाषेत archives असे म्हणतात.
यातील बहुतांश कागदपत्रे ही इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात कारण ही कागदपत्रे व प्रकाशित असून अस्सल व अव्वल स्वरूपाचे असतात. ही संदर्भ साधने प्राथमिक असल्याने इतिहासावर नव्याने प्रकाश टाकू शकतात. पुराभिलेखागार मध्ये खाजगी, वैयक्तिक दस्तावेज, सरकारी कागदपत्रे व इतिहासाची साधने काळजीपूर्वक व्यवस्थित जतन करुन ठेवलेली असतात. पुराभिलेखागार मधील अस्सल कागदपत्रांच्या आधारे राजकीय आर्थिक सामाजिक व धार्मिक इतिहासाची वास्तव मांडणी करता येते.
दप्तर खान्याची निर्मिती
युरोपात प्राचीन काळी ग्रीक व रोमन कळपासून कागदपत्रांची काळजी घेऊन ती जपून ठेवली जात होती इंग्लंडमध्ये इसवीसन अकराशे 19 मध्ये सरकारी कागदपत्रे व दप्तरे जपून ठेवण्यासाठी सरकारी दप्तर खान्यांची स्थापना करण्यात आली.
प्राचीन व मध्ययुगीन काळातील पुराभिलेखागार
जेव्हा कागदाचा शोध लागला नव्हता तेव्हा शालवृक्षाच्या सालीपासून केलेले किंवा ताडपत्र किंवा ताल पत्र लेखनासाठी वापरले जात होते. ताडपत्र तयार करणे अत्यंत कष्टाचे व जिकिरीचे काम होते ताडपत्रावरील हस्तलिखित पुढची पिढी किंवा पूर्वजांचा वारसा म्हणून श्रद्धापूर्वक जपून ठेवत याशिवाय भूर्जपत्रे चर्मपत्रे ताम्रपत्रे शिलालेख तयार करून प्राचीन काळी लेखन करीत असत.
कागदाच्या व छापण्याच्या शोधानंतर पूर्वी ठराविक लोकांसाठी दिला जाणारा ज्ञानाचा वारसा हा व्यापक झाला सर्वत्र प्रचार सुरू झाला यूरोपमध्ये पंधराव्या व सोळाव्या शतकात ज्ञानाचे सार्वत्रिकरण झाले भारतात एकोणिसाव्या शतकात या सार्वत्रीकरण सुरुवात झाली.
भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात हस्तलिखित दस्तावेज मिळाली आहेत. प्राचीन काळी वेद, उपनिषद, आरण्यके, ब्राह्मन्ये दीपवंश, महावंश, श्री चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र, सातवाहनाची गाथा सप्तशती, कौटिल्याचे अर्थशास्त्र हे प्राचीन काळातील पुराभिलेख आहेत. याशिवाय शेव, वैष्णव, शक्ती पंत, शाक्त, नाथ, महानुभाव, जैन, बौद्ध धर्मग्रंथ, बनभट्टाचे हर्ष चरित्र, विशाखा दत्ताचे बुद्धचरित, परमानंदाचे शिवभारत, बाबरनामा, बखरीतील लेखन, युरोपीय प्रवाशांचा प्रवास वृत्तांत, प्राचीन व मध्ययुगीन नाटके, चिनी प्रवाशांची प्रवास वृत्त, धार्मिक वांडमय दस्तावेज पुराभिलेख घरामध्ये जपून ठेवली जातात. इंग्लंडमध्ये इसवीसन १८८३ मध्ये द पब्लिक रेकॉर्ड कायदा अस्तित्वात आला. इंग्लंडने आपल्या वसाहती असलेल्या देशांमध्येसुद्धा दप्तरखाने सुरू केले युरोपीय राष्ट्रे प्रमाणे पुराभिलेखागार सुरू केल्याने या देशांचा इतिहास लिहण्यात महत्त्वाची मदत झाली.
भारतातील पुराभिलेखागार
ब्रिटिश कालखंडात भारतात पुराभिलेखागार चळवळीचा उगम झाला यापूर्वी राजे विविध रोजगार आणि त्यांची सरकारी कागदपत्रे जपून ठेवत असत 1919 मध्ये भारतीय ऐतिहासिक पुरविले कागार आयोग स्थापन करण्यात आला 1929 पासून सर्व अभिलेखागार ही सर्व भारतीयांच्या साठी खुली झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या दत्त खाण्याची जतन व देखभाल याकडे भारताने विशेष लक्ष पुरवले व शासकीय अंदाजपत्रकात त्यासाठी खर्चाची तरतूद केली राष्ट्रीय अभिलेखागार ही सर्वात मोठी संस्था नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आली.
मुंबई येथील शासकीय अभिलेखागार (१८२५)
पुण्याचे शासकीय अभिलेखागार (पेशवे दप्तर)
भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे
डेक्कन कॉलेज पुराभिलेखागार
वि का राजवाडे अभिलेखागार
कोल्हापूर अभिलेखागार
विदर्भ अभिलेखागार
औंध जिल्हा सातारा येथील अभिलेखागार
नागपूरचे अभिलेखागार
औरंगाबाद येथील अभिलेखागार
नवी वानगीदाखल देता येतील
पुराभिलेखागारची वैशिष्ट्य
यात मूळ लिखित पुरावे दस्तावेज व कागदपत्र जतन करून ठेवली जातात.
येथील कागदपत्र मुळे मानवी संस्कृती वारसा व परंपरेचे जतन होते.
येथील कागदपत्रांचा ऊपयोग संशोधना शिवाय सरकारी अधिकाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरतात.
सरकार विविध खात्यातील महत्त्वाची कागदपत्रे येथे जतन करून ठेवते.
येथील कागदपत्रांवरून मानवाच्या झालेल्या सर्वांगीण प्रगती विकास परिवर्तनाचा इतिहास समजतो.
म्हणून पुराभिलेखागार हा प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा समजला जाते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.