*मराठी विभाग*
बी.ए.भाग- 3 सत्र-6 पेपर क्रमांक- 13 ( *भाषाविज्ञान आणि मराठी भाषा)*
प्रा.डॉ.विश्वास पाटील
*मराठीचा उगम काळ*
६) विवेक सिंधू मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ इस अकराशे 88 मधील आहे उपनिषदातील विचार सर्वसामान्य मराठी जनतेला सांगण्यासाठी मुकुंदराजांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे जया नाही शास्त्रीप्रतीती Iनेणती तर्क मुद्रेची स्थितीI तेया लागी मराठ्या युक्तीI केली ग्रंथरचना अस आपल्या ग्रंथरचनाचा हेतू मुकुंदराज सांगतात. विवेक्सिंधू ची ओवी साडेतीन चरणांची आहे इथे दिलेल्या ओवीत शास्त्र, प्रतीती, तर्क, मुद्रा, स्थिती, मराठी, युक्ती, ग्रंथरचना असे शब्द येतात.
७) लीळाचरित्र -मराठीतील पहिला गद्य ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या लीळा म्हणजे आठवणी त्यांच्या शिष्याने म्हणजेच माहीम भटाने संकलित करून चरित्र रूपाने या ग्रंथात मांडलेल्या आहेत. या ग्रंथाचे एकाक,पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे तीन विभाग असून एकूण १५०९ लीळा आहेत चरित्राची रचना १२८३ मध्ये झालेली असावी. यादव काळात संस्कृत भाषेबरोबरच मराठी भाषा बोलली जात होती याचा उत्तम पुरावा म्हणजे हा चरित्रग्रंथ होय.
या ग्रंथातील काही शब्दरूपे पुढीलप्रमाणे- सौंदर (सुंदर),पुरूषू (पुरूष),पुसणे(विचारणे),सांघणे( सांगणे),एथ(येथे),सरण(शरण),परिसाळ(पाठशाळा),हाट(बाजार)इत्यादी.
८) ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९० मध्ये लिहिला आहे. ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानेश्वराने आपला ग्रंथास दिलेले नाही. केले ज्ञानदेवे गीतेI देशीकार लेणेI एवढेच त्यांनी लिहिलेले आहे. नामदेवानी ज्ञानेश्वरी असा उल्लेख केला. गीतेच्या अठराव्या अध्यायातील सातशे लोकांवर मूळ अध्याय व क्रम न बदलता सुमारे ९५०० ओव्यांचे हे भाष्य त्यांनी लिहिलेले आहे.
ज्ञानेश्वरीतही ऊ काराचे प्राबल्य आढळते. गणेशु, प्रकाशु, निवृत्तीदासू, तर्कु, अंकुशु वेदांतू ,मोदक, सिद्धू, केवळ, घेतू अशी शब्दरूपे आढळतात.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.