(J. D. Ingawale)
बीए
भाग ३ सेमि - ६
पेपर १३
अर्थशास्त्रातील संशोधन पध्दतीशास्र्
१ नमुना निवड
नमुना निवडीची व्याख्या (Definition of Sampling)
नमुना पद्धती म्हणजे संपूर्ण राशीऐवजी त्या राशीतील काही निवडक घटकांवरून व घटकाबाबत माहिती जमा करणे होय. ज्या
घटकातून माहिती जमा केली असेल त्या घटकाच्या समूहाला नमुना (Sample) म्हणतात. जसे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांची पाहणी करावयाची असेल तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील काही ग्रामीण शाळांतील प्राथमिक शिक्षक आणि शहरातील काही शाळांतील प्राथमिक शिक्षक यांची निवड करून त्या नमुन्यातील शिक्षकांकडून माहिती जमा करणे. व्यवहारात अशी असंख्य उदाहरणे आहेत जी अशिक्षित माणसेही वापरत असतात. उदा. शितावरून भाताची परीक्षा, धान्याच्या राशीतील मूठभर धान्यावरून सर्व धान्यांची परीक्षा इत्यादी पुढील काही महत्त्वाच्या व्याख्यांवरून नमुना निवडीचा अर्थ अधिक स्पष्ट होईल.
१. डॉ. गुड व हॅट : 'नावाप्रमाणे नमुना म्हणजे एका मोठ्या समूहाचा लहान प्रतिनिधी होय.' '
२. मॅनहीम : 'नमुना म्हणजे राशीचा भाग असतो ज्यामध्ये पूर्ण राशीविषयी अनुमान काढण्याविषयी अभ्यास केला जातो.’
५. बोगार्डस् : 'एका पूर्वनिर्धारित योजनेप्रमाणे बाबींच्या (एककाच्या) समूहातून एक निश्चित प्रतिशत निवडणे म्हणजे नमुना निवड होय.
वरील व्याख्यावरून निश्चित नमुना निवडीचा अर्थ अधिक स्पष्ट होईल.
निवडीचे स्वरूप (Nature of Sampling)
नमुना आपण नमुना निवडीच्या व्याख्यांचा अभ्यास केला. त्यावरून नमुना निवडीचे योग्य स्वरूप स्पष्ट होते. म्हणजे नमुना निवडीच्या स्वरूपात सामग्रीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही एककांचा समावेश असतो. नमुना निवडीचे हे संशोधनाचे विशिष्ट असे तंत्र असते. ज्यामध्ये संशोधन विषयाच्या अंतर्गत समाविष्ट संपूर्ण सामग्रीतून काळजीपूर्वक संपूर्ण वैशिष्ट्यांचे योग्य प्रतिनिधित्व करणाऱ्या एककांची निवड केली जाते. शास्त्रीय संशोधनातच नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात देखील अगदी अशिक्षित माणूसही याचा उपयोग करतो. दैनंदिन जीवनात कळत नकळत आपण नमुना निवडीच्या स्वरूपावरून काही निष्कर्ष मांडत असतो.
नमुना निवडीच्या स्वरूपात योग्य प्रातिनिधिक एककाची निवड करून त्यावरून सर्व सामग्रीवरून योग्य निष्कर्ष काढता येतात. यामुळे वेळ, श्रम, पैसा
यांची बचत होते. काढलेले निष्कर्ष क्वचितच चुकीचे ठरतात. नमुना निवड स्वरूपावरून अनेक बाबींविषयक योग्य अंदाजा बांधता येतो. ते श्रेष्ठ व प्रयोगाकरिता सोईचे असते. उदा. भारतातील तांदळाचे उत्पादन मोजतांना तांदळाचा प्रत्येक कण मोजण्याची गरज नाही. दर एकरी उत्पादनाने संपूर्ण देशातील तांदळाचे उत्पादन मोजता येते. या पद्धतीने सत्य व विश्वसनीय माहिती उपलब्ध होऊ शकते. आधुनिक नियोजित अर्थव्यवस्थेत आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी व आर्थिक धोरण निर्धारित करण्यासाठी नमुना निवडीचे स्वरूप उपयुक्त असते.
नमुन्याची वैशिष्ट्ये (Characteristics of Sample)
वरील व्याख्यान व अर्थावरून नमुन्याची पुढील वैशिष्ट्ये महत्त्वाची असतात. १. नमुना हा संपूर्ण राशीचा एक अंश किंवा प्रातिनिधिक भाग असतो.
२. नमुन्याचे आकारमान राशीच्या तुलनेने खूपच लहान असते.
३. नमुन्याची निवड वैज्ञानिक पद्धतीने केली जाते म्हणून तो पूर्वग्रहदूषितता व पक्षपात यापासून स्वतंत्र असतो.
४. नमुन्यात निश्चितता अगर शुद्धता अधिक प्रमाणात असते. ५. नमुना हा अध्ययन विषयाला अनुकूल असतो.
६. नमुना असा असतो की, पूर्वग्रह पद्धतशीरपणे चांगल्या प्रकारे नियंत्रित केला जातो.
नमुना निवडीचे गुण अथवा फायदे
१. वेळ, पैसे
व श्रमाची बचत: आधुनिक समाजजीवन हे गतिशील व परिवर्तनशील झाले आहे. सर्व
प्रकारची संशोधन कार्ये ही दीर्घकाळ चालत असतात. पण नमुना पद्धतीत शीतील एका लहानशा भागाची तपासणी व परीक्षण केले जाते. त्यामुळे वेळेची खूपच बचत होते. त्याचप्रमाणे तथ्यांचे संकलन करणे, त्यांचे संपादन करणे व विश्लेषण करणे यासाठी खूप से खर्च करावे लागतात. परंतु नमुना निवडीने या बाबी छोट्या प्रमाणात घेऊन त्यावर सर्व क्रिया केली जात असल्याने पैसे व श्रमाचीही बचत होते. कारण
या पद्धतीत काही निवडक टकांचाच अभ्यास केला जातो.
२. शुध्दपरिणाम पद्धतीत संपूर्ण राशीतून काही नमुन्याची अभ्यासासाठी अधिक शुद्ध याचा अभ्यास काळजीपूर्वक व सखोल केला जातो. त्यामुळे येणारे परिणाम
३. सखोल अभ्यास- या पद्धतीत संपूर्ण राशीतील काही प्रातिनिधिक घटकाची केली जाते. त्यामुळे अभ्यासाचे क्षेत्र मर्यादित झाल्याने त्याचा सखोल अभ्यास करणे शक्य होते. आधुनिक काळातील विशेषतः सामाजिक घटना अत्यंत जटिल असतात. पण नमुना पद्धतीने त्याचा सखोल अभ्यास करणे शक्य होते. ही बाब जटिल अमर्यादित राशीच्या बाबतीत शक्य होत नाही.
४. लवचीकता - नमुना पद्धतीत लवचीकता शक्य असते कारण येथे संशोधन हे संपूर्ण राशीतून पर्याप्त ठरेल एवढ्या एककांवर केले जाते. अर्थात, नमुन्याची संख्या ही राशीच्या प्रकृतीवर व संशोधनाच्या स्वरूपावर अवलंबून असते. संशोधकास गरजेनुसार नमुन्याची संख्या ..सहजपणे कमी-जास्त करता येते. इतर
अन्य पद्धती विशेषतः जनगणना पद्धतीशी तुलना करता नमुना पद्धतीत लवचीकता अधिक असते.
५. अनुभवजन्य तथ्ये - संशोधनाचे यश बऱ्याच प्रमाणात काल्पनिक तथ्याऐवजी अनुभवजन्य तथ्यावर अधिक अवलंबून असते. नमुना चाचणीत मर्यादित घटक असतात. संशोधकाला त्यातील प्रत्येक घटकाशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करता येतो. अभ्यास पूर्ण करताना सुसंवाद साधता येतो. सारांश, निवड पद्धतीने अनुभवजन्य तथ्ये मिळविणे शक्य असल्याने संशोधन यशस्वी होते.
६. निष्कर्ष विश्वसनीय : नमुना चाचणी ही अधिक काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने केल्यास प्राप्त होणारे परिणाम (निष्कर्ष) हे अधिक विश्वसनीय व अचूक असतात. प्रो. मॅरीस हँवर्गच्या मते, नमुना पाहणीत ती काळजीपूर्वक केली जात असल्याने ती अधिक खरी असते. कारण
नमुना चाचणी अधिक परिणामकारक व नियंत्रित असते, याची
कारणे (अ) तथ्य संकलनासाठी उच्च गुणवत्ता व प्रशिक्षित लोक नेमले जातात (ब) चौकशी व अन्वेषणासाठी पुरेसे प्रशिक्षण दिले जाते (क) चांगले पर्यवेक्षण असते (ड) अधिक संख्याशास्त्रीय साधने वापरली जातात. सारांश, अधिक विश्वासनीय तथ्यावरील निष्कर्षही विश्वसनीय असतात.
७. सुलभ प्रशासन : कोणत्याही संशोधनात प्रचंड प्रशासनाचा समावेश असतो. पण नमुना पाहणीत तुलनात्मकदृष्ट्या प्रशासन सोपे असते. यासाठी लागणारा कर्मचारी कमी असल्याने त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवून कार्यक्षमरित्या काम करून घेणे शक्य असते. गरजेनुसार प्रशिक्षण देऊन समर्थ प्रशासकीय यंत्रणा उभारता येते. संशोधनातील सर्व घटकांवर व साधनसामग्रीवर नियंत्रण ठेवून त्यांची हाताळणी योग्य प्रकारे करता येते.
८. अनेक समस्यांचा एकाच वेळी अभ्यास : सध्या समाजात विविध समस्या असतात. उदा. बेकारी, गुन्हेगारी इत्यादी. तर नैसर्गिक आपत्तीने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उदा. भूकंप, महापूर, दुष्काळ इत्यादी. समाजाच्या दृष्टीने या सर्व समस्यांचीअसते. अशा वेळी नमुना निवड पद्धतीने निवडक घटकाच्या अभ्यासाने अनेक समस्यांचे निराकरण करता येते. त्याचा अभ्यास एकाच वेळी करता येणे शक्य असते.
९. अधिक शास्त्रीय प्रो. आर. ए. फिशरच्या मते, नमुना पद्धत शास्त्रीय असते.कारण
ही पद्धत गणितीय पद्धतीवर आधारित असते मर्यादित अनुमानावर निष्कर्ष काढणे सोपेअसते. त्यामुळे अपूर्णता व बिनचूकता मर्यादित राहतात. हिचा
वापर करणे सोपे असते.
१०. काही बाबतीत अत्यावश्यक: जर अन्वेषणाची व्याप्ती अनंत असेल, खूप
प्रचंड असेल, मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर पसरली असेल तर तथ्य संकलन करणे अशक्य असते. अशा
वेळी नमुना चाचणी हाच पर्याय असतो. उदा. सर्व समुद्राच्या पाण्यातील माशाच्या जाती, सवयी
शोधणे अगर जंगलातील रानटी पशूचा अभ्यास करणे शक्य नसते. अशा
वेळी नमुना चाचणी हा एकमेव पर्याय असतो. तर अनेक वेळा राशीतील गुणधर्मांचा लोप होतो. कालांतराने त्याच्या अभ्यासास नमुना चाचणीच अत्यावश्यक ठरते.
नमुना निवडीचे दोष अगर तोटे (Demerits of Disadvantage of Sampling)
१. पूर्वग्रहाची शक्यता नमुना निवड पद्धतीतील घटकांची नमुन्यासाठी निवड करताना पूर्वग्रह टाळणे कठीण आहे. कारण
घटक निवडणारा मानव हा प्रवृत्ती अहंकार, विशिष्ट कल यांपासून मुक्त असू शकत नाही. मानवी स्वभावानुसार नमुना निवडताना त्याच्या हातून पक्षपातीपणा होण्याची शक्यता असते. पूर्वग्रहदूषितेमुळे राशीचे योग्य प्रतिनिधित्व न करणाऱ्या घटकांची निवड केली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकीच्या घटक निवडीने येणारे निष्कर्षही चुकीचे असतात.
२. प्रातिनिधिकतेचा अभाव : नमुना चाचणीत प्रातिनिधिक नमुना निवडणे अतिशय कठीण असते. आधुनिक युगात कोणतीही घटना ही साधी, स्वच्छ असू शकत नाही. कोणत्याही राशीत प्रचंड गुंतागुंत असते व तीमध्ये अनेक असमान घटक असतात. एखादी घटना हुबेहूब दुसरीप्रमाणे आढळणे कठीण असते. त्यामध्ये विविध भिन्नता असते. विसंगतीतून सर्व राशींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटकांची निवड करणे अतिशय कठीण असते.
३. विशेष ज्ञानाची गरज : अभ्यास वा संशोधनासाठी नमुना निवडीचा वापर करणे सोपे नसते. कारण
यासाठी संशोधकाकडे विशेष ज्ञान, कौशल्य, अनुभव, योग्य दृष्टी, अभ्यास इत्यादी बाबींची आवश्यकता असते. नमुना निवडीतील घटक मर्यादित असतात व त्यातील प्रत्येक घटकाकडे दक्षतापूर्वक लक्ष देण्याची गरज असते. यातील छोटीशी चूकही फार मोठे नुकसान करू शकते. सारांश, नमुना निवडताना विशेष ज्ञानाची गरज वा अभ्यास असल्याविन योग्य नमुना निवडता येत नाही.
४. संख्याशास्त्रीय मर्यादा : नमुना चाचणीत नमुना घटक महत्त्वाचे असतात. ते अधिक प्रातिनिधिक असावेत यासाठी संशोधक संख्याशास्त्रीय पद्धतीची मदत घेतो. पण ही पद्ध गुंतागुंतीची असते, तिचा
परिपूर्ण अभ्यास करणारे अल्प असतात. तसेच
नमुना निवडीचा पायाकमकुवत असल्यास नमुना निवड समर्थनीय ठरत नाही. या सर्व दोषामुळे या पद्धतीवर मर्यादा येतात.
५. नमुना अवलंबित्व कठीण : नमुना पद्धतीत आपण ज्या एककाची निवड करतो त्याचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक असतो. पण व्यावहारिकदृष्ट्या हे अशक्य असते. एककांवर अनेक बाबींचा परिणाम होत असतो. वेळेच्या बंधनाने नमुन्यावर फारसे अवलंबून राहता येत नाही. बदलत्या परिस्थितीनुसार नमुना निवडीतही बदल करावा लागतो. त्यामुळे नमुन्यावर अवलंबून राहणे कठीण असते.
६. नमुना निवड कठीण : नमुना चाचणीतून नमुना निवड अत्यंत कठीण असते. कोणतेही दोन घटक सारखे नसतात. व्यक्ती-व्यक्तींमध्ये प्रकृती, स्वभाव, सवयी, दृष्टिकोण, अभिवृत्ती यांमध्ये खूपच तफावत असते. यामुळे सर्व घटकांमध्ये जोडणारा दुवा शोधणे कठीण असते. अशा
विषम घटकांतून राशीचे प्रतिनिधित्व करणारा नमुना निवडणे खूपच कठीण असते. उदा. लोकसंख्येतील मोठ्या आकारातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो.
७. कमी अचूकता : जेव्हा संशोधनात उच्च दर्जाची अचूकता हवी असते तेव्हा नमुना निवडीचा उपयोग होत नाही. यात
अचूकता फारशी नसते.
८. इतर काही दोष : जेव्हा राशीचे स्वरूप एकजिनसी नसते तेव्हा ही पद्धत उपयोगी नसते. नमुना घेण्याचे योग्य ज्ञान हवे. काही
परिस्थितीत ही पद्धत वापरता येत नाही. ही पद्धत गुंतागुंतीची व खर्चीक असते. नमुना निवडीत विश्वसनीयता कमी असते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.