Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: साखर उद्योग (प्रवरा साखर कारखाना)

Monday, 21 June 2021

साखर उद्योग (प्रवरा साखर कारखाना)

 Dhere Sir, [09.06.21 11:51]

B.A.II History Paper IV (भाग १)

साखर उद्योग (प्रवरा साखर कारखाना)

          महाराष्ट्र भारतामधील एक महत्त्वाचे औद्योगिक राज्य आहे. मुंबईला भारताची औद्योगिक राजधानी असे म्हटले जाते. महाराष्ट्रात पुढील चार प्रकारचे उद्योगधंदे आहेत.१). कृषी उत्पन्नावर आधारित उद्योग---कापड व साखर उद्योग, तेलगिरण्या, तंबाखू प्रक्रिया उद्योग इ.२). खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग--- लोह उद्योग, पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण, यंत्रोद्योग.इ.३). वन उत्पादनांवर आधारित उद्योग---- लाकूड कापण्याच्या गिरण्या कागद कारखाने यांचे कारखाने औषधे खेळांचे साहित्य फर्निचर निर्मिती उद्योग इ.४). प्राणी उत्पादनांवर आधारित उद्योग----कातडी कमावण्याचा उद्योग, लोकरी कापडाच्या उद्योग, कापड गिरण्यांच्या उद्योग, रेशीम उद्योग, दुधापासून उपपदार्थ बनवण्याचे उद्योग इ.

          प्रस्तुत अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून आपण साखर उद्योगाच्या संदर्भात "प्रवरा सहकारी साखर कारखाना" व दूध उद्योगाच्या संदर्भात "आरे दूध डेअरी" या दोन उद्योगांचा अभ्यास करणार आहोत.


            प्रवरा सहकारी साखर कारखाना

 साखर उद्योगाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधलेला आहे याच बरोबर इतर उद्योगही त्यामुळे अवस्थेत आलेले आपणास दिसतात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची आर्थिक शैक्षणिक सामाजिक स्थित्यंतर करणारा हा उद्योग व समाज निर्मितीचे नवे दालन उघडनारा ठरला आहे . ब्रिटिश सरकारने 1919 सली महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील दरेगाव येथे पहिला साखर कारखाना सुरु केला. सहकारी तत्त्वावर आपण साखर कारखाना उभा करू अशी कल्पना आर. एन. हिरेमठ आणि जी.एन. सहस्रबुद्धे यांनी डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या समोर मांडली.  त्यानुसार 1950 आली सहकार महर्षी विठ्ठलराव विखे- पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या ठिकाणी 'प्रवरा सहकारी साखर कारखाना' सुरु केला. पागोटे वाल्यांना साखर कारखाना चालवता येणार नाही अशी अनेकांनी टीका केली.  त्यानंतर पद्मभूषण, स्वातंत्र्यसैनिक, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगली येथे दुसरा 'शेतकरी सहकारी साखर कारखाना' सुरू केला या नंतर महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या उद्योगाला चालना मिळाली. 31 मार्च 2009 च्या गणनेनुसार महाराष्ट्रात 201 साखर कारखाने आहेत त्यापैकी सहकारी साखर कारखाने 165 आहेत. न्यायाची मुहूर्तमेढ विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याने रोवली .

          डॉ. विठ्ठलराव एकनाथराव विखे-पाटील 

                  (१२ ऑगस्ट १८९७ ते २७ एप्रिल १९८०)

 विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील लोणी बुद्रुक या खेड्यात झाला लोणी खुर्द शाळेत त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. सावकारीच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी १९२३ मध्ये त्यांनी "लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी" ची स्थापना करून सार्वजनिक कार्याची सुरुवात केली. खेडेगावातील पाथरवट, वडार, मजूर गोरगरिबांना एकत्र करून "मजूर सहकारी सोसायटीची" स्थापना केली. इंग्रजांच्या तुकडे जोड तुकडे बंदी विधेयकाविरोधात इस्लामपूर येथील मोर्चा साठी अहमदनगर येथून शेतकऱ्यांना घेऊन येऊन तेथे भाषण करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. याच प्रश्नासाठी त्यांनी पुण्याच्या कौन्सिल हॉल ला एक लाख शेतकर्‍यांसह वेढा घातला. शेतकर्‍यांनी संघटित होऊन व्यक्तिगत व सामुदायिक विकास करावा असे आवाहन त्यांनी केले. बचतीचे महत्त्व पटवून देऊन 23 जानेवारी 1923 रोजी त्यांनी सहकारी पतपेढी रजिस्टर चाली त्यांनी 'सावकार मुक्ती अभियान' पारनेर, नेवासे, जामखेड, शेवगाव आणि संगमनेर तालुक्यात सुरू केले. १९४१ साली त्यांनी वाचनालय सुरु केले.१९४३ साली शेतकऱ्यांना शेती पूरक अवजारे मिळावीत यासाठी वर्कशॉप सुरू केले. सामाजिक व शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. १९५३-५६  अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे ते अध्यक्ष होते. प्रवरा शिक्षण उत्तेजक सहकारी पतपेढीचे ते संस्थापक अध्यक्ष होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे तेआद्य प्रवर्तक होते. अहमदनगर कामगार हॉस्पिटल चे अध्यक्ष होते. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक (१९५८) व अध्यक्ष (१९६८) होते. रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष होते. प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे त्यांनी (१९७४)स्थापना केली. 

       डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांना सहकार कृषी औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने 1961 मध्ये पद्मश्री हा किताब दिला. पुणे विद्यापीठाने 1978 डी. लिट व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1979 सली 'डॉक्टर ऑफ सायन्स' या पदव्या दिल्या.  1980 साली त्यांचे निधन झाले.

       

         प्रवरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना.

गुळ उत्पादनासाठी सावकार नाममात्र भाड्याने शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गूळ नीचांकी भावाने खरेदी कर


Dhere Sir, [09.06.21 11:51]

त. मुळे शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात अडकला होता. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना तयार केला पाहिजे ही कल्पना अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी मांडली.१९४५ मध्ये बेलापूर रोड श्रीरामपूर येथे पार पडलेल्या "दि डेक्कन कॅनॉल बागायतदार" परिषदेत विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ यांनी सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला. परिषदेचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी मुख्य प्रवर्तक म्हणून विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावरच जबाबदारी सोपविली. संपूर्ण परिसरात फिरून त्यांनी कारखान्यासाठी भाग भांडवल गोळा केले. यावेळी अनेकांनी कुचेष्टा केली मात्र अत्यंत हिमतीने स्वतःच्या घरून स्वतःचे अन्न घेऊन परिसरात फिरून त्यांनी भाग भांडवल गोळा केले. झेकोस्लाव्हिया येथे तयार झालेली स्कोडा कंपनीचे अद्यावत साखर निर्मिती ची मशनरी लोणी बुद्रुक प्रवरानगर च्या माळावर त्यांनी आणली. तत्कालीन मुंबई इलाख्याचे उद्योग व मजूर मंत्री ना.मालोजीराजे निंबाळकर यांच्या हस्ते 17 जून 1950 रोजी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचा कोनशिला समारंभ लोणी बुद्रुक येथे झाला. साखर कारखाना स्थापन करण्याच्या उद्देशाने विठ्ठलराव आणि "दि बागायतदार को ऑपरेटिव्ह शुगर प्रोडूसर सोसायटी लिमिटेड लोणी बुद्रुक." संस्था स्थापन केली तिची पहिली सर्वसाधारण सभा 13 मार्च 1949 रोजी झाली. कारखान्याचे पहिले संचालक मंडळ पुढील प्रमाणे--

 प्रोफेसर धनंजय राव रामचंद्र गाडगीळ     अध्यक्ष  

 विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील      उपाध्यक्ष

   केवळ लोकाग्रहास्तव मी अध्यक्षपद स्वीकारले आहे असे धनंजयराव गाडगीळ यांनी जाहीर केले.

        30 डिसेंबर 1950 रोजी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरू झाले. या कारखान्याचे उद्घाटन पं जवाहरलाल नेहरू यांनी करावे ही विखे पाटील व शेतकऱ्यांची इच्छा होती. कार्यबाहुल्यामुळे 1960-61 या दशकपूर्ती च्या वर्षी पं जवाहरलाल नेहरू यांनी प्रवरानगर येथे येऊन कारखान्याचे औपचारिक उद्घाटन केले. 31 मार्च 1990 या दिवशी या कारखान्याच्या संस्थापकाच्या स्मृती जतन करण्यासाठी सर्वसाधारण सभेने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना असे कारखान्याचे नामांतर केले.

        या कारखान्याच्या निर्मितीमुळे येथे अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांची निर्मिती झाली त्या पुढीलप्रमाणे.

       १). मळीपासून (मोलॅसिस)अल्कोहोल बनवण्याचा कारखाना.

         २).अल्कोहोल पासून इथेनॉल तयार करण्याचा कारखाना.

  ३).  कचऱ्यापासून बायोगॅस तयार करणारे कारखाने.

 ४).   बायोगॅसपासून वीजनिर्मिती तयार करणारा कारखाना.

 ५).  ॲसिटाल्डीहाईड रासायनिक प्लांट.

 ६). कागद निर्मिती कारखाना. (१९७४)

 ७). मद्यार्क निर्मिती कारखाना ( डिस्टिलरी).

    अ. प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या शेती विकास योजना.

    १). सिंचन प्रकल्प... परिसरातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी 65 पाझर तलाव, तीन बंधारे, ४३ पाणी उपसा योजना 74000 विहिरी यांची निर्मिती या माध्यमातून करण्यात आली याशिवाय 22 उपसा योजना नवरा कालवा व प्रवरा नदीवर सुरू करण्यात आल्या.

.२). माती परीक्षण प्रयोगशाळा... शेती उत्पन्न वाढवण्यासाठी मातीचे परीक्षण करून मातीच्या गरजेनुसार पिकांना खत करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली व प्रत्येक वर्षी २००० मातीचे नमुने तपासले जातात.

३). बी-बियाणे निर्मिती प्रकल्प... ऊस व इतर उत्पादन वाढीसाठी चांगले बियाणे हा महत्त्वाचा घटक आहे. उच्च प्रतीचे बियाणे व पुरुष प्रजनन साठी प्रसिद्ध असलेल्या कोईमतूर, पाडेगाव, लखनऊ येथून चांगल्या बियाण्यांची आयात करून ते शेतकऱ्यांना पुरवली जाते.

४). ऊस संशोधन केंद्र.... ऊस उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन बियाण्यांचे वापर करून त्यावर विविध पद्धतीने संशोधन करून पाणी व्यवस्थापन रूप प्रजनान विविध खतांचा वापर यावर प्रयोग व संशोधन येथे केले जाते.

५). नव-तंत्रज्ञानाची शेती.... शेतीसाठी चे नवे तंत्रज्ञान यांत्रिक अवजारे यासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो ट्रॅक्टर्स बुलडोजर नवनवीन प्रयोगातून उपयोगातील तंत्रज्ञान शेतीसाठी येथून पुरवली जाते.

ब. समाज उपयोगी योजना.

१). प्रवरा सहकारी बँक लिमिटेड (शेड्युल बँक).

   शेतकरी, ग्रामीण कारागीर, विद्यार्थी, व्यापारी व उद्योजक यांना येथून कर्जपुरवठा केला जातो ट्रक, ट्रॅक्टर वाहन खरेदी स्वयंरोजगारासाठी अल्पदराने कर्ज दिले जाते.

२). प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था.(ISO 9001-2000)

    स्थापना 1964 त्यामार्फत प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर कन्या विद्यामंदिर, ग्रामीण भागात सात हायस्कूल, पद्मश्री विखे पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, टेक्नोलॉजी एंड इंजीनियरिंग कॉलेज, पॉलीटेक्निक, मेडिकल कॉलेज, नर्सिंग स्कूल, पं. जवाहरलाल नेहरू ललित अकादमी इ. 

३). ग्रामीण वैद्यकीय सुविधा केंद्र.

     प्रवरा रुरल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, डीम्ड विद्यापीठ, मल्टी


Dhere Sir, [09.06.21 11:51]

स्पेशलिटी हॉस्पिटल, इमर्जन्सी अंड केअर वर्ल्ड, कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, ग्रामीण रुग्णालय अंड रेहाबिलिटेशन, केअर युनिटइ.

४). दुग्ध व पशुधन विकास केंद्र.

     जर्सी व इतर मिश्र प्रजातीची कृत्रीम गर्भधारणे तुं गाईंची निर्मिती गाई म्हशी शेळी मेंढीपालन वाढीसाठी प्रयत्न.

५). गृहनिर्माण व इतर कल्याणकारी योजना.

      "पद्मश्री डॉ विखे पाटील ग्रामीण सहकारी गृह तारण संस्था."मार्फत 2500 घरांची बांधकाम विविध उत्पन्न गटासाठी पक्की घरे "सामुदायिक विवाह"मार्फत नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य भेट,गरीब विद्यार्थ्यांना मदत फंड, अवर्षण विभागातील गुरांच्या शिबिराची उभारणी, शेती कामगार गुरे यांचा विमा, स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय शिबिर, मुलांसाठी शाळा व कल्याणकारी योजना.

   प्रवरा सहकारी साखर कारखाना चा महाराष्ट्रावरील प्रभाव.

   १). महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाला नवी दिशा....

   २). महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत....

   ३). विविध उद्योग व उपक्रमांची सुरुवात...

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...