Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: वाहरू सोनवणे

Wednesday, 2 June 2021

वाहरू सोनवणे

 राधानगरी महाविद्यालय

 मराठी आवश्यक              बी.ए.भाग-1 

विषय शिक्षक: प्रा.डॉ.विश्वास पाटील 

वाहरू सोनवणे जन्म इ.स. 19 50

    नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श्री खेड येथे जन्म. आदिवासी साहित्य प्रवाहातील महत्त्वाचे समकालीन कवी व चळवळीतील कार्यकर्ते. आदिवासींच्या मूलभूत  प्रश्नांसाठी अविरत लढा त्यांनी दिलेला आहे. गोधड,रोडाली हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. गोधड कविता संग्रहाचा पहाड जीने लगा या नावाने हिंदी अनुवाद झालेला आहे. वाहरू सोनवणे यांच्या निवडक कविता प्रकाशित आहेत कोल्हापूर येथे 2000 साली झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पाचवे आदिवासी साहित्य संमेलन पालघर, परिवर्तन साहित्य संमेलन साकोली, दुसरे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन शहादा या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर त्यांनी लेखन केले आहे. गोधड या काव्यसंग्रहाचा अर्थ सांगताना कवी म्हणतो गोधड या काव्यसंग्रहाचा जाणकार चुकीचा अर्थ लावतात. ही गोधड आदिवासींच्या वेदना, व्यथांची नसून सडलेल्या फाटलेल्या समाजव्यवस्थेची ही गोधड आहे. ती बदलण्याची ही वेळ आलेली आहे. आदिवासींची परिस्थितीही फाटक्या मळलेल्या गोदडी प्रमाणे झालेली आहे. त्यामध्ये काही सुधारणा नाही, वर्तमान परिस्थितीत ते गुदमरून गेले आहेत.  पिढ्यान पिढ्या अज्ञान, दारिद्र्यामुळे त्यांचे शोषण होत आहे. गेल्या कित्येक पिढ्यामध्ये ही व्यवस्था तशीच आहे. आता या व्यवस्थेत जीव गुदमरून जातोय. कारण ही व्यवस्था जीर्ण आणि मळकट झाली आहे. तिचा कुबट आंबट वास येत आहे. ती आता बदलायला हवी. फाटकी गोधडी, आंबट वास या प्रतिमा ही खूप बोलक्या आहेत. भारतीय समाजातील शोषित उपेक्षित घटकांची व्यथा-वेदना या कवितेतून व्यक्त होतांना आपल्याला दिसते.

    चळवळ म्हणजे या कवितेतून मानवी समाजाला गतिमान करणाऱ्या कृतिशील प्रवाहाचे चित्रण आलेले आहे. कवीला परिवर्तनाची आस आहे. तो स्वतः चळवळीतील कार्यकर्ता असल्याने आपल्या न्याय हक्कासाठी चळवळ उभी करतो. मात्र ही चळवळ म्हणजे जत्रा किंवा नदीला आलेला पूर नाही. सतत विकसित होत जाणारा हा प्रवाह आहे. चळवळ ही माणुसकीची मूलभूत गाभाभूत घटक आहे. मानवतेच्या प्रस्थापनेसाठी अखंड कार्यरत असणाऱ्या चळवळींना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोध करणारे त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून अडथळे आणणारे अनेक घटक असतात. तरी याविषयी व्यवस्थे मधून चळवळ विशाल महासागरा कडे वाट काढत असते. परिवर्तनवादी चळवळीच्या केंद्रस्थानी माणूस असायला हवा. हे कवी  विशेषत्वाने इथे नोंद करतात.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...