Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: अबुल फजलचे इतिहास लेखन: अकबर नामा

Friday, 25 June 2021

अबुल फजलचे इतिहास लेखन: अकबर नामा

 BA---- 3 

मध्ययुगीन भारताचा इतिहास पेपर नंबर--- 14 

अबुल फजलचे इतिहास लेखन: अकबर नामा 

अकबरनामाचे मूल्यमापन---- करताना अबुल फजल ने या ग्रंथात अनेक महत्त्वपूर्ण विधान केली आहेत. अकबराच्या चरणी आपले वर्चस्व अर्पण केल्याने जो अकबराचा विरुद्ध जाईल त्यास त्याच्या कर्माचे फळ मिळेल. अशी तो भविष्यवाणी करत होता. अकबर व कट्टर इस्लाम धर्मिय यांच्यातील संघर्षात मोठ्या निर्धाराने अबुल फजल ने अकबराची पाठराखण केली. 

मुघल कालखंडामध्ये इतिहास लेखन म्हणजे हिंदू-मुस्लीम यांच्यातील संघर्ष नसून मुघल राज्य हे महत्वपूर्ण भारतीय राज्य होते व त्यास पाठिंबा होता असे अब फजल आपल्या लिखाणामध्ये म्हणतो. त्याचा लिखाणामध्ये कोठेही धार्मिक कट्टरता दिसून येत नाही.यावरून त्याच्यावर सम्राट अकबराच्या धर्म संस्थेच्या धोरणाचा प्रभाव दिसून येतो. अबुल फजल ने वस्त् स्थितीला धरुन  काम केले आहे असे म्हणता येणार नाही . 

कारण धार्मिकता नष्ट करण्यास सम्राटा ने  सर्वतोपरी प्रयत्न केला एवढेच नव्हे तर मुघलांची सत्ता खंडित करून अफगांनी सत्ता दिल्लीत  स्थापन करणाऱ्या शेरशहाच्या सर्व कामगिरीची तो निरभृच्छना करतो. अकबराच्या विजयास त्याचे सौभाग्य कारणीभूत होते असे फजल म्हणतो. युद्धा मधील विजय केवळ सहभाग यावर अवलंबून नसून त्यासाठी कष्ट परिश्रम डावपेच लष्करी तयारी या गोष्टीची आवश्यकता असते, याची अफजलला भूल पडली असावी म्हणून  फजल म्हणतो अकबराचे गुणगान करतो अबुल फजल च्या ग्रंथामध्ये अनेक दोष असले तरी तत्कालीन परिस्थितीत मुघल कालखंडाचा इतिहास शब्दबद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आहे अकबरनामा ग्रंथ त्यामुळे इतिहास काराना मार्गदर्शक ठरत आहे. अनेक इतिहासकारांनी अबुल फजल च्या कामगिरी ची प्रशंसा केली .म्हणून फजल यास मोगल कालखंडातील अव्वल दर्जाचा इतिहासकार मानला जातो.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...