Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: अष्टप्रधान मंडळ

Friday, 25 June 2021

अष्टप्रधान मंडळ

 (Dr. Dhere V. D.)

अष्टप्रधान मंडळ

B .A .I History Sem.II Paper II (भाग २)

          

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या स्वराज्याची सुव्यवस्था लावण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केलेली होती. प्रधान मंडळाची कल्पना ही खूप पूर्वीपासून भारतात असलेली आपणास दिसते. मौर्य कालखंडात राजाला सल्ला देण्यासाठी 'रत्निन' नावाचं मंडळ होतं. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राजाच्या प्रधान मंडळाचा उल्लेख आहे.  चाणक्यनिती, कानकनिती या ग्रंथांमधून आपणास हे उल्लेख आढळतात.त्यात राजाला सल्ला देण्यासाठी व राजाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रधान मंडळाची गरज व्यक्त केलेली आहे. राष्ट्र हा  राष्ट्रपुरुष  समजून या राष्ट्रपुरूषाचे मस्तक म्हणजे राजा व इतर अवयव म्हणजे प्रधानमंडळ अशा प्रकारचे उल्लेख आढळतात.

        आपण शिवकाळाचा विचार केला तर तत्कालीन भारतात अस्तित्वात असणाऱ्या शाह्या व मुघल सत्ता यांच्याकडेही प्रधान मंडळे होती. या सर्व प्रधानाना जहागिरी/मनसबी  दिलेल्या असत. पण शिवाजी महाराजांनी आपले जे प्रधान मंडळ नियुक्त केले त्यांना वतन न देता वेतन दिले. त्यांच्याकडे जाहागिरी सैन्य न देता राष्ट्रीय सैन्य दिले /स्वराज्याचे सैन्य दिले.

           अष्टप्रधान मंडळाची निर्मिती :.              

       शिवरायांच्या जन्माच्या वेळी दुष्काळ आणि युद्धाच्या धामधूमीत मुळे शांतता, सुव्यवस्था नष्ट झाली होती. लष्करी अत्याचाराला जनता कंटाळली होती. वतनदार छळ करत होते. या असुरक्षित, अस्थिर आर्थिक विवंचनेच्या काळात शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वराज्याची, राज्यकारभाराची सुराज्याची, व्यवस्थेची सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ एकाच वेळी तयार केलेले नाही.१९४२ सलिल जिजाबाई व बाल-शिवाजी बेंगलोर हून पुण्याकडे येत असताना शहाजी महाराजांनी त्यांच्यासोबत चार प्रधान दिले होते. पेशवा, मुजुमदार, डबीर आणि सुरनिस यानंतर शिवरायांनी सेनापती हे पद निर्माण केले. ते तुकोजी चोर, माणकोजी दहातोंडे नंतर नेताजी पालकर यांना दिले. मिर्झाराजा जयसिंग च्या मोहिमेवर त्यांनी रघुनाथ पंडित यांना पंडितराव हा किताब पद देऊ च्या सुमारास त्यांनी न्यायाधीशाचे पद निर्माण केले व निराजी रावजी यांना दिले. १६७४ ला राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या कडे आठ प्रधान होते त्यामुळे या प्रधानमंडळाला अष्टप्रधानमंडळ असेच नाव होते. ते पुढील प्रमाणे---

       अष्टप्रधान मंडळाची कामे.....

१). मुख्यप्रधान (पेशवा) 

            प्रधान मंडळाचा प्रमुख. लष्करी व मुलकी खात्यांवर देखरेख करणे. स्वराज्याची व्यवस्था रक्षण व विस्तार यासाठीच्या उपाययोजना राजाला सांगणे. शेजारील देशांतील घडामोडींवर लक्ष ठेवणे. छत्रपती स्वराज्यात हजर नसताना सर्व कारभार चोख व निस्वार्थी पणे पाहणे. मुलगी प्रदेशाचा कारभार पाहणे प्रसंगी युद्धात भाग घेणे.

२). अमात्य (मुजुमदार)

           सध्याच्या अर्थमंत्र्यांची भूमिका ही अमात्याची होती. राज्याचे अंदाजपत्रक तयार करणे जमाखर्चाच्या बाबीची राजाला माहिती देणे. उत्पन्न वाढीचे उपाय सुचवणे. महत्वाची हिशोब पत्रके आज्ञापत्रे यावर आपली मुद्रा उमटवून छत्रपतींना समोर ठेवणे. प्रदेशाचा कारभार करणे व प्रसंगी युद्ध मोहिमांत भाग घेणे.

३). सेनापती (सरलष्कर)

            संपूर्ण सैन्याचे नेतृत्व करणे. सैन्याची शिस्त राखणे.सचोटीचे सैन्य भरती करणे. त्यांचे प्रशिक्षण,शस्त्रास्त्र, दारुगोळा, रसद, आवश्यक गरजांची पूर्तता करणे. सेनेची नेमणूक करणे. युद्ध मोहिमांचे नियोजन करणे. शत्रू सैन्याची बित्तंबातमी राखणे. त्यांच्या कमजोर ठिकाणी युद्ध करून जिंकण्याचे नियोजन करणे. जिंकलेल्या प्रदेशाचे संरक्षण करणे. युद्धात पराक्रम गाजविणारा यांचा गौरव करणे, पराक्रमी उद्याची छत्रपतींकडे शिफारस करून त्यांना बढती देणे. फितुरांना पकडून शासन करणे.युद्धातील लूट, चौथाई यांचा हिशोब छत्रपतींना सादर करणे.  प्रदेशाचा कारभार करणे युद्ध मोहिमांमध्ये सहभागी होणे.

४). सचिव (सुरनीस) 

        राज्याचा व छत्रपतींचा पत्रव्यवहार पहाणे सर्व दप्तरावर देखरेख करणे.स्वराज्यातील विविध प्रांतातील अधिकारी लष्करी अंमलदार किल्लेदार यांच्याकडून येणारी पत्रे खालीते पाहणे अशय तपासून घेणे. इनामपत्रे, दानपत्रे,सनदा, हवालापत्रे,आवश्यक सरकारी कामकाजाची पत्रे यांच्यातील दोष दुरुस्ती करणे. छत्रपतींचे व राज्याचे खलिते लिहिणे,पाठविणे. स्वराज्याच्या हिशोबावर तपासणी करून संमती दर्शक सही करणे. प्रदेशाचा कारभार करणे प्रसंगी युद्ध मोहिमांत सहभागी होणे. 

५). मंत्री (वाकेनवीस) 

            छत्रपतींचा खाजगी चिटणीस म्हणून यांना ओळखले जाते. छत्रपतींचा खाजगी पत्रव्यवहार, दैनंदिन कार्य, दररोजच्या घडामोडी यावर देखरेख ठेवून नोंदी ठेवणे. छत्रपतींचे भोजन तपासणी करणे, राज संरक्षक दल व गुप्तहेर खात्यावर नियंत्रण ठेवणे, आलेल्या पाहुण्यांवर देखरेख ठेवणे त्यांची व्यवस्था करणे. प्रदेशाचा कारभार करणे व


Dhere Sir, [22.06.21 20:09]

[Forwarded from Dhere Sir]

युद्ध मोहिमांत सहभागी होणे. 

६). सुमंत (डबीर)

           परराष्ट्र मंत्री चे कार्य सुमंत करत असे. परराज्यांशी पत्रव्यवहार करणे व सलोख्याचे संबंध ठेवणे. परराज्यात घडणाऱ्या घडामोडी, हालचाली, अंतर्गत संघर्ष, परराज्यातील वकील यांच्याकडे लक्ष देणे, राजशिष्टाचार पाळणे, शत्रू प्रदेशातील लष्कर व इतर हालचालींची बित्तंबातमी काढून स्वराज्य विस्तारासाठीची उपाययोजना छत्रपतींसमोर ठेवणे. भविष्यकालीन डावपेचांची आखणी करणे. प्रदेशाचा कारभार पाहणे व युद्ध मोहिमांत सहभागी होणे.

७). पंडितराव (दानाध्यक्ष)

               संपूर्ण धर्म विषयक अधिकार पंडितराव कडे होते. छत्रपतींना पूजा-अर्चा,विधी,दानधर्म विषयक मार्गदर्शन करणे. संतमहंत विद्वान यांचा यथोचित सन्मान करणे. धर्मविषयक खटल्यांचे निराकरण करणे. 

८). न्यायाधीश.

            संपूर्ण राज्याच्या न्यायदानाची जबाबदारी त्यांच्याकडे असे. गोतसभा,ग्राम पातळीपासून सरसुभ्यापर्यंत  शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या न्याय निवाड्यात अन्याय वाटत असेल तर रयतेला मध्यवर्ती सरकारकडे अर्ज करता येत असे. न्याय अन्यायाची बाजू तपासून नि:पक्षपाती न्यायदान करणे. जमिनीचा हक्क ग्रामप्रमुखांचे हक्क इत्यादी निकाल पत्रांवर संमती म्हणून सही करणे व छत्रपतींकडे सादर करणे.

            महाराष्ट्र अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्ये....

 १).  प्रधानांच्या नेमणुका व बडतर्फी...

            शिवाजी महाराज अष्टप्रधानमंडळातील प्रधानांच्या नियुक्त्या स्वतः करत असत. योग्य,कार्यक्षम व्यक्तीची नेमणूक ते करत.त्यामध्ये जात,धर्म,पंथ इत्यादी बाबी अजिबात विचारात न घेता फक्त कार्यक्षमता हाच निकष होता. पदावर असलेल्या मंत्र्यांकडून अयोग्य कार्य झाले किंवा दुसरी कार्यक्षम व्यक्ती भेटली तर महाराज त्याची नियुक्ती त्या पदावर करतात व पहिल्या व्यक्तीला बडतर्फ करत.         

२).वंशपरंपरागत पद्धतीचा त्याग ... 

            तत्कालीन इस्लाम राजवटीमध्ये अधिकाराची पदे ही वंशपरंपरागत दिली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पदे कार्यक्षमता विचारात घेऊन दिली. जरी कार्यक्षम व्यक्ती सदर पदावर असताना मयत झाली तर ते पद वंशपरंपरागत न देता दुसऱ्या कार्यक्षम व्यक्तीला दिले.

३). जहागिरी ऐवजी रोख वेतन ....        

           शिवकालीन पूर्व कालखंडात  प्रधानांना त्यांच्या सेवेच्या मोबदल्यात जहागीर किंवा वतन दिले जात असे. शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेल्या प्रधानांना रोख वेतन दिले. त्यांच्या कार्यक्षमता, कार्याचा आवाका पाहून वेतनामध्ये भरघोस वाढ केली.जहागिरी पद्धतीचे दोष त्यांना माहीत असल्याने कोणासही जहागीर दिली नाही. 

४). लष्करी व मुलकी अश्या दोन्ही जबाबदाऱ्या...

        सेनेचे नेतृत्व संयोजन करणे हे सेनापतीचे काम होते पण पंडितराव आणि न्यायाधीश वगळता सर्व मंत्र्यांना म्हणजेच प्रधानांना युद्धाच्यावेळी हातात शस्त्र घेऊन सैन्याचे नेतृत्व करावे लागे. तसेच मुलूख ( सुभा -सरसुभा) त्यांच्याकडे कारभारासाठी दिला जात असे. स्वराज्यात दौरे काढून जनतेच्या अडचणी त्यांना सोडवाव्या लागत.

५). संयुक्त जबाबदारी...

        स्वराज्यातील कारभाराची अष्टप्रधान मंडळावर संयुक्त जबाबदारी होती. निर्णय, तह, करार-मदार याबाबत सर्वांनी संमतीची मुद्रा उमटवावी लागे. याचा अर्थ घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी सर्व मंत्र्यांवर असे.

६). छत्रपतींना सल्ला देणे...

        अष्टप्रधान मंडळातील प्रधान हे छत्रपतींना सल्ला देत असत. पण तो सल्ला छत्रपतींना बंधनकारक नव्हता. याउलट छत्रपतींनी दिलेले आदेश हे सर्व मंत्रिमंडळाला बंधनकारक होते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...