(Sawant S. R.)
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास. पेपर न.६---
प्रकरण-2 --गांधीयुग
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील 1920 ते 1947 या कालखंडाला गांधी युग असे म्हटले जाते.या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला .गांधींचे पूर्वचरित्र. 2 ऑक्टोंबर सोळा 1869 रोजी पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला. 1888 ते 1891 या काळात त्यांनी इग्लंड मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.
वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर.1893 गांधीजी वकीलीच्या व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले.
तेथे त्यांना गोऱ्या लोकांच्या कडून अपमानास्पद वागणूक मिळाली त्या अनुभवामुळे गांधींच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली .आणि यातूनच गांधीवादाची सुरुवात झाली .महात्मा गांधींचे तत्वज्ञान हे सत्य. अहिंसा.सत्याग्रह.याच्या आधारावर आधारलेले होते. गांधीजीनी स्वातंत्र्य चळवळ यशाश्वी करण्या साठी पुढील , मागृचा अवलंब केला त्यामध्ये असहकार .सविनय कायदेभंग.आणि चले जाव. या चळवळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या महत्त्वाच्या होत्या. आणि याच चळवळीच्या जोरावर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ यशस्वी केली.
दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील गोऱ्या लोकांच्या विरुद्धआंदोलन यशस्वी केले होते. 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आले. नामदार गोखले यांचे त्याना मार्गदर्शन लाभले. 1916 त्यांनी साबरमती आश्रम स्थापन केला .आणि त्यानंतर त्यांनी देशसेवेला वाहून घेतले.भारतामध्ये प्रथम त्यानी चंपारण्य सत्याग्रह केला.त्यानंतर 1918 ला खेडा सत्याग्रह केला. 1919 ला गिरणी कामगारांसाठी पहिले उपोषण केले. या आंदोलनामध्ये गांधीजींना मोठ्या प्रमाणात यश मिळाले .वेगवेगळ्या आंदोलनामध्ये गांधींना मिळालेल्या यशामुळे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर देशाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले . यानंतर त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केले .
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.