Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: अण्णाभाऊ साठे

Wednesday, 30 June 2021

अण्णाभाऊ साठे

 

(Mokashi P A)

B.A.II SEMESTER - 4

PAPER NO - 2 (H.S.R.M)

प्रकरण - 3 सामाजिक सुधारक

- अण्णाभाऊ साठे

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या प्रबोधन पर्वाने २० व्या शतकाच्या पूर्वार्धात अधिकच गती घेतली. या प्रबोधन परंपरेत काहींनी सनदशीर मार्गाने तर काहींनी क्रांतिकारी मार्गांनी बदल घडवून आणला. समकालीन काळाचा विचार करता समाजात अनेक चालीरीती, परंपरांचे मोठे प्रस्थ होते. शिक्षण समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचलेले नव्हते. विशिष्ट समाजापुरतीच शिक्षणाची कवाडे खुली होती. अनिष्ट प्रथा, शिक्षणाचा अभाव, त्यातून येणारी आर्थिक विपन्नावस्था, सामाजिक मागासलेपण, राजकीय स्वातंत्र्याचा अभाव आणि परकीयांची गुलामगिरी अशी साधारण तत्कालीन परिस्थिती होती. या भयाण अंधकारातून समाजाला प्रकाशवाटेवर आणण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक, राजकारणी, विचारवंत, तत्त्ववेत्ते, साहित्यिक आदींनी तन-मन-धन अर्पण करून भरीव कार्य केले. यापैकी काही जणांना शिक्षणाचा, काहींना धर्माचा तर काहींना आपल्या समाजाचा वारसा कामी आला. मात्र ज्या व्यक्तीला ना शिक्षणाचा, ना धर्माचा, ना त्याच्या घराण्याचा कसलाही वारसा लाभला तरीदेखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सारस्वतांच्या मांदियाळीत सर्वांना विचारप्रवण बनवले अशी व्यक्ती म्हणजे कर्ते समाजसुधारक, लोककवी, शाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे होय. अशा या थोर समाजसुधारकाचा जीवनप्रवास, त्यांनी केलेले विपुल लेखन व त्यांचे कार्य यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.

जीवन परिचय

'फकिरा'कार म्हणून सर्वपरिचित असलेले अण्णा साठे यांचे मूळचे नाव 'तुकाराम'. अण्णाभाऊ साठे या टोपण नावनेच ते प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट, १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. भाऊराव हे वडिलांचे तर बालुबाई हे त्यांच्या आईचे नाव. जातीयतेच्या फेन्यात अडकलेल्या समाजाच्या निबंधांमुळे गावकुसाबाहेरचं जीण त्यांच्या वाटेला आले. घरात अठराविश्व दारिद्र्य, नित्य नियमाची झालेली उपासमार, इथल्या समाज व धर्मव्यवस्थेमुळे वाट्याला येणारे भयाण दुःख अशा परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. आपल्या मुलाने खूप शिकावे असा आई बालुबाई यांचा आग्रह होता. मात्र शिक्षणाबद्दलची अनास्था आणि सामाजिक परिस्थितीच्या परिणामस्वरूप अण्णाभाऊंची दीड दिवसांची शाळा झाली. भूक, बेकारी यांबरोबर नित्याचा संघर्ष करत असतानाच १९३२ मध्ये अण्णाभाऊ आपल्या वडिलांसोबत आपले नशीब आजमावण्यासाठी वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करत मुंबईत दाखल झाले. पोटाची आग विझवण्यासाठी हमाली, गिरणीमध्ये काम, खाणीमध्ये काम, कोळसा वाहणे अशी मिळतील ती कामे करू लागले. लहानपणापासूनच त्यांना गायन व वादनाची आवड होती. तर मधुर आवाजाची त्यांना नैसर्गिक देणगीच लाभली होती. मुंबईच्या वास्तव्यातच ते कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र लढा याकडे आकृष्ट झाले. जन्मजात लाभलेल्या प्रतिभेच्या आधारे अक्षरओळख नसतानाही हातातील लेखणी व डफाच्या आधारे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. १९३७ च्या दरम्यान कोंडाबाई यांच्यासमवेत त्यांचा पहिला विवाह झाला. १९४४ साली स्थापन केलेल्या कलापथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी लेखक, गायक, कार्यकर्ता, नेता अशा विविध भूमिका साकारल्या. मध्यंतरीच्या काळात डॉ. आंबेडकर, कार्ल मार्क्स, लेनिन, मॅक्झिम गॉर्की, टॉलस्टॉय इत्यादी विचारवंतांच्या साहित्याचे स्वैरपणे वाचन व चिंतन केले. डॉ. आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा अण्णाभाऊंवरती विशेष प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून सर्वत्र रान पेटवले. १९६१ मध्ये त्यांना रशियाला जाण्याचे भाग्य लाभले.. साहित्यामध्ये एकएक मैलाचा दगड निर्माण करणाऱ्या या साहित्यिकास आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र वैफल्यग्रस्त जीवन वाट्यास आले. अशाच परिस्थितीत १८ जुलै, १९६९ रोजी अण्णाभाऊंचे अत्यंत दुर्दैवी निधन झाले.

साहित्य संपदा :-

शिक्षणाची नि साहित्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अण्णाभाऊंनी निर्माण केलेले साहित्य आपणास थक्क करते. प्रतिभेचा आणि शिक्षणाचा, विद्वत्तेचा आणि शिक्षणाचा काहीएक संबंध असतो हे तत्त्व अण्णाभाऊंनी खोडून काढले. पूर्वापार चालत आलेल्या, रुळलेल्या वाटेने न जाता अण्णाभाऊंनी स्वतःच्या साहित्याची एक वेगळीच वाट, एक राजमार्ग निर्माण केला. साहित्य व कला या क्षेत्रातील असा एकही प्रकार नसेल की ज्यावरती अण्णाभाऊंनी लेखन केले नाही. आपल्या कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्यांतून त्यांनी ग्रामीण समाजाची, कष्टकऱ्यांची, कामगारांची व स्त्रियांची वास्तववादी, सत्य स्थिती समाजासमोर मांडून सर्वांना अंतर्मुख केले. सर्वांना विचार करायला भाग पाडले. अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेली साहित्यकृती खालीलप्रमाणे :-

कथासंग्रह

. बरबाद्या कंजारी        . चिरागनगरची भूतं

. निखारा                 . नवती  

. पिसाळलेला माणूस   . आबी

. फरारी                     . भानामती 

. लाडी                     १०. कृष्णाकाठच्या कथा

११. खुळंवाडी             १२. गजाआड

१३. गुऱ्हाळ

कादंबऱ्या

. अग्निदिव्य                     . अलगूज

. अहंकार                      . आग

. आघात                          . आवडी

. कुरूप                            . केवड्याचं कणीस

. गुलाम                            १०. चंदन

११. चिखलातील कमळ         १२. चित्रा

१३. जिवंत काडतूस               १४. ठासलेल्या बंदुका

१५. डोळे मोडीत राधा चाले     १६. तास

१७. धुंद रानफुलाचा               १८. पाझर

१९. फकिरा                          २०. फुलपाखरू

२१. मंगला                           २२. माकडीचा माळ

२३. मथुरा                            २४. मास्तर

२५. मूर्ती                              २६. रत्ना

२७. रानगंगा                         २८. रानबोका

२९. रूपा                             ३०. वारणेचा वाघ

३१. वारणेच्या खोऱ्यात          ३२. वैजयंता

३३. वैर                               ३४. संघर्ष

३५. सैरसोबत

() लोकनाट्य

. अकलेची गोष्ट

. खापऱ्या चोर

. शेठजीचं इलेक्शन

. देशभक्त घोटाळे

. निवडणुकीत घोटाळे

. बेकायदेशीर

. माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?

. मूक मिरवणूक

. नवे तमा

१०. पुढारी मिळाला

११. लोकमंत्र्यांचा दौरा

१२. इनामदार (नाटक)

१३. बिलंदर बुडवे

१४. दुष्काळात तेरावा

१५. पेंग्याचं लगीन (नाटक)

१६. सुलतान (नाटक)

 

() पोवाडे

. नानकीन नगरापुढे

. स्टॅलिनग्राडचा पोवाडा

. बर्लिनचा पोवाडा

. बंगालची हाक

. पंजाब-दिल्लीचा दंगा

. तेलंगणचा संग्राम

. महाराष्ट्राची परंपरा

. अमळनेरचे अमर हुतात्मे

. मुंबईचा कामगार

१०. काळ्या बाजाराचा पोवाडा

() अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट                                   

 कादंबरी                     -           आधारित चित्रपट

. वैजयंता                  -          वैजयंता

. आवडी                    -   टिळा लावते मी रक्ताचा

. माकडीचा माळ           -      डोंगरची मैना

. चिखलातील कमळ      -      मुरली मल्हारी रायाची

. वारणेचा वाघ            -         वारणेचा वाघ

. अलगूज               -       अशी ही साताऱ्याची तऱ्हा

. फकिरा              -          फकिरा

() शाहिरी वाङमय

. शाहीर

. माझी मैना

. प्रवास वर्णन - माझा रशियाचा प्रवास

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...