Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: असंहकार चळवळीचे मूल्यमापन

Tuesday, 22 June 2021

असंहकार चळवळीचे मूल्यमापन

(Sawant S. R.) 

बी ए भाग 2 इतिहास विभाग पेपर नंबर--6  भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे--  

असंहकार  चळवळीचे मूल्यमापन -- 

असहकार सर्वांचे मूल्यमापन करत असताना या चळवळीला पूर्णपणे यश मिळाले नाही. हे खरे असले तरी त्यातून काही गोष्टी मध्ये यश देखील प्राप्त झाले या चळवळीचे मुल्यमापन पुढील प्रमाणे करता येइल --- 

महात्मा गांधींनी असहकार चळवळ चोरा चौरी येथील घटनेमुळे थांबवली. परिणामी देशातील सर्व सर्वसामान्य जनता नेतेमंडळी त्यामध्ये सहभाग असणारा वर्ग निराश झाला. गांधीना हिंसाचार अजिबात मान्य नव्हता. परिणामी ही चळवळ थांबवली गेली. त्यानंतर गांधीजींनी भारतीय जनता आंदोलनाला प्रशिक्षित झाल्याशिवाय आणि त्याचबरोबर सत्य अहिंसा सत्याग्रह याचं योग्य आकलन झाल्याशिवाय चळवळ राबवणे चूक ठरेल असे गांधींना वाटले. त्यामुळे त्यांनी ही चळवळ तहकूब केली. दुसरे म्हणजे 

खिलाफत चळवळ  ही धार्मिक चळवळ होती .या चळवळीला पाटिबां  देणे चूक होती .परिणामी हिंदू-मुस्लीम त्यातून फारसे सख्य स्थापन झाले नाही .त्याच बरोबर ही चळवळ तुर्कस्तानच्या खलिफा विषयी होती. सहाजिकच खिलाफत चळवळीला पाठिंबा देणे ही महात्मा गांधीजीची चूक होती. असे जनतेला वाटू लागले.त्याचबरोबर गांधींचे एक वर्षात स्वराज्य मिळवून देणे गांधीजी म्हणाले होते तसे झाले नाही .यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली. पदव्या 

मान सन्मान याचा त्याग बऱ्याच लोकांनी केला नाही हा त्याग मोठ्या प्रमाणात लोकांनी केला असता तर त्याचा परिणाम निश्चितच झाला असता.परिणामी ही चळवळ अपयशाला हे एक  

कारण ठरले असले तरी देखिल असहकार चळवळ मध्ये काही उणिवा राहिल्या तरीदेखील काही उल्लेखनीय कामगिरी निश्चित झाली. ते पुढीलप्रमाणे यामध्ये राष्ट्रीय चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली आतापर्यंत फक्त शहरी मध्यमवर्ग पुरती असलेली राष्ट्रीय चळवळ खेड्यापाड्यातील पोचली.हे फार मोठे यश होते. असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात. काँग्रेस कृतिशील संघटना बनली काँग्रेस फक्त मोर्चा निवेदन हरताळ या माध्यमाचा वापर करत होती. परिणामी त्याला अपेक्षित असे यश प्राप्त होत नव्हते. संघटनात्मक मरगळ आली होती. या चळवळी मूळे राष्ट्रसभा एक कृतिशील व्यासपीठ बनले. त्यानंतर सरकार विषयी भीती नष्ट झाली सामान्य माणसांची तुरुंगवास आणि सरकार बद्दलची भीती दूर झाली हजारो लोक पोलिसांचा लाट्या काठ्या खाण्यास व तुरुंगात जाण्यास आनंदाने तयार होऊ लागले. तुरुंगातून लोक बाहेर जाईना म्हणून ब्रिटिश पोलीस भारतीयांना  बाहेर आणून सोडू लागले.आंदौलकाशी कसे वागावे हेच पोलीस व सरकारला कळेनासे झाले.हे चळवळीचे यश होते.स्वराज्य हे अंतिम ध्येय ठरले आता पयृंत सुधारणा मागणाऱ्या कॉंग्रेसचे नजिकचे ध्येय स्वराज्य ठरले. हा  या आंदोलनातील मोठे यश मानावे लागे या असहकार आंदोलनामुळे हिंदी जनतेत नवीन चैतन्य निर्माण होण्यास मदत झाली .

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...