Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: लोकमान्य टिळक व राष्ट्रीय शिक्षण चळवळ

Monday, 21 June 2021

लोकमान्य टिळक व राष्ट्रीय शिक्षण चळवळ

 (Sawant S. R.)

बीए भाग 2--- इतिहास-- पेपर नंबर--6

लोकमान्य टिळक व राष्ट्रीय शिक्षण चळवळ 

 ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली राजसत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या गरजे साठी म्हणून ख्रिश्चन मिशनरी यांच्यामार्फत इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा इंग्रजांचा एकच उद्देश होता , की इंग्रजांना आपल्या कार्यालयातील हलकी कामे भारतीयांच्या कडून करून घेता येतील , याच्यासाठी हिंदी लोकांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र हे शिक्षण टिळकांच्या मतानुसार कारकून बनवणाऱ्या य लायकीचे होते. त्यामुळे टिळकांनी इंग्रजी शिक्षणावर टीका करण्यास सुरुवात केली.  भारतीयांनी संशोधक, शास्त्रज्ञ , तत्त्वज्ञ , उद्योगपती, कारखानदार, बनावे, असे टिळकांचे मत होते, परंतु अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सध्याची शिक्षण व्यवस्था नव्हती. त्यामुळे भारतीयांनी पुढे येऊन सरकारी अनुदानाच्या जोरावर शिक्षण व्यवस्था न काढता, पदरमोड करून प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, काढावीत, आणि देश औद्योगिक दृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या कसा प्रगत होईल असे शिक्षण तिथे दिले जावे, परिणामी टिळकांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी चळवळ सुरू झाली . त्यामुळे देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होण्यास मदत झाली.  परिणाम असा झाला की  भारतीय तरुण , नवीन शिक्षण घेऊन पुढे येऊ लागला.  स्वतःच्या पायावर तो उभा राहू लागला. प्रगती करणारा भारतीय तरुण पुढे आला , हेच टिळकांचे राष्ट्रीय शिक्षणाचे उद्देश होते ,  त्यामुळेच टिळकांची राष्ट्रीय शिक्षण चळवळ वाढीस लागली.

टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण चळवळ व्यवस्थेतून प्रेरणा घेऊन, रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली. 1906  बंगालमध्ये बंगाल हे राष्ट्रीय कॉलेज स्थापन केले, आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले गेले,  महाराष्ट्रा  भारतीय भाषांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला , पुण्यामध्ये चिपळूणकर टिळक आगरकर यांनी, डेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. पंजाबात आर्य समाजाने शैक्षणिक कार्य चालवले. बंगालमध्ये तीन वर्षात 300 प्राथमिक 25 माध्यमिक राष्ट्रीय शाळा सुरू केल्या गेल्या, अनेक देशभक्त व समाजसेवकांनी लोकवर्गणी जमा करून अनेक ठिकाणे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण केल्या. परिणाम  भारतीय  मुले असे या शिक्षण संस्थांमधून  विद्वत्तेचे धडे घेऊ लागले. आणि याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय प्रेरणा देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. आणि यातूनच भारतीय राष्ट्रीय  स्वातंत्र्य चळवळ गतिमान होण्यास मदत झाली.  लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमाचे महत्वपूर्ण योगदान होते.बीए भाग 2--- इतिहास-- पेपर नंबर--6---- लोकमान्य टिळक राष्ट्रीय शिक्षण --- ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली राजसत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या गरजे साठी म्हणून ख्रिश्चन मिशनरी यांच्यामार्फत इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. या इंग्रजी शाळा सुरू करण्याचा इंग्रजांचा एकच उद्देश होता , की इंग्रजांना आपल्या कार्यालयातील हलकी कामे भारतीयांच्या कडून करून घेता येतील , याच्यासाठी हिंदी लोकांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र हे शिक्षण टिळकांच्या मतानुसार कारकून बनवणाऱ्या य लायकीचे होते. त्यामुळे टिळकांनी इंग्रजी शिक्षणावर टीका करण्यास सुरुवात केली.  भारतीयांनी संशोधक, शास्त्रज्ञ , तत्त्वज्ञ , उद्योगपती, कारखानदार, बनावे, असे टिळकांचे मत होते, परंतु अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सध्याची शिक्षण व्यवस्था नव्हती. त्यामुळे भारतीयांनी पुढे येऊन सरकारी अनुदानाच्या जोरावर शिक्षण व्यवस्था न काढता, पदरमोड करून प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, काढावीत, आणि देश औद्योगिक दृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या कसा प्रगत होईल असे शिक्षण तिथे दिले जावे, परिणामी टिळकांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी चळवळ सुरू झाली . त्यामुळे देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होण्यास मदत झाली.  परिणाम असा झाला की  भारतीय तरुण , नवीन शिक्षण घेऊन पुढे येऊ लागला.  स्वतःच्या पायावर तो उभा राहू लागला. प्रगती करणारा भारतीय तरुण पुढे आला , हेच टिळकांचे राष्ट्रीय शिक्षणाचे उद्देश होते ,  त्यामुळेच टिळकांची राष्ट्रीय शिक्षण चळवळ वाढीस लागली.

टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण चळवळ व्यवस्थेतून प्रेरणा घेऊन, रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन ची स्थापना केली. 1906  बंगालमध्ये बंगाल हे राष्ट्रीय कॉलेज स्थापन केले, आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले गेले,  महाराष्ट्रा  भारतीय भाषांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला , पुण्यामध्ये चिपळूणकर टिळक आगरकर यांनी, डेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. पंजाबात आर्य समाजाने शैक्षणिक कार्य चालवले. बंगालमध्ये तीन वर्षात 300 प्राथमिक 25 माध्यमिक राष्ट्रीय शाळा सुरू कल्या गेल्या, अनेक देशभक्त व समाजसेवकांनी लोकवर्गणी जमा करून अनेक ठिकाणे राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण केल्या. परिणाम  भारतीय  मुले असे या शिक्षण संस्थांमधून  विद्वत्तेचे धडे घेऊ लागले. आणि याचा परिणाम असा झाला की राष्ट्रीय प्रेरणा देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. आणि यातूनच भारतीय राष्ट्रीय  स्वातंत्र्य चळवळ गतिमान होण्यास मदत झाली.  लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमाचे महत्वपूर्ण योगदान होते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...