VASANT DHERE:
B A I Sem II History Paper II Topic III
पंढरपूर चळवळ (वारकरी संप्रदाय)
मध्ययुगात म्हणजे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या चळवळीचा उदय आणि विकास झाला. ही भक्ती चळवळ होती. सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले त्या स्वराज्याच्या मागे हा संप्रदाय एका अर्थाने कारणीभूत ठरलेला दिसतो. स्वराज्य निर्मितीची पार्श्वभूमी या संत विचाराने वारकरी संप्रदायाने खऱ्या अर्थाने उभी केली. समाजात स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव होता त्या काळात या संत विचारांमध्ये सगळे जण समान होते. समाजात जातीव्यवस्थेचे उतरंड होती त्याच काळात वारकरी संप्रदायात मात्र सर्वांना समानता होती. कीर्तनात उच्च-नीचता नव्हती, स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव नव्हता. इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुष भेदभाव सुद्धा नव्हता. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत शूद्रांना कसलेही अधिकार नव्हते, मात्र वारकरी संप्रदायात भक्तीचा अधिकार सर्वांना होता. अशा या वारकरी संप्रदायाने एका नव्या समाजाची निर्मिती केली आणि हाच समाज स्वराज्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरला.
वारकरी : उत्पत्ती विचार....
पंढरीची वारी जो करतो तो वारकरी. वर्षातून दोन वेळा आषाढी आणि कार्तिकी पंढरीला पायी वारी करणारे जे भक्त आहेत ते सगळे वारकरी होय. ही वारी ची कल्पना निर्माण झाली असावी याबाबत मात्र ठोस पुरावे सापडत नाहीत. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी वारी केल्याचे उल्लेख नामदेव या दुसऱ्या संताने लिहून ठेवले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून शेकडो भाविक पायी चालत वर्षातून चार वेळा(आषाढी,कार्तिकी,माघी व चैत्री एकादशी) पंढरीला येतात. गळ्यात तुळशीची माळ घालतात विठ्ठलाला भेटतात आणि सुखी संसाराचे स्वप्न पहात परतीचा प्रवास करतात. उत्तर प्राचीन कालखंडात ही वारीची प्रथा असावी असे मानले जाते. वारी च्या भक्ती परंपरेने कर्मकांडविरहित, सर्वधर्मसमभावाची ओळख समाजाला करून दिली. वारी करण्याचा हेतू हा पुण्यप्राप्ती नसून सामुदायिक स्नेहसंमेलन, भक्ती, प्रेमसुख अनुभूती आहे. वारकरी एकमेकांना भेटतात नमस्कार करतात तेथे स्पृश्य-अस्पृश्य पाळली जात नाही,जातीभेद पाळला जात नाही,स्त्री पुरुष समानता मानली जाते. संत महात्मे होऊन गेल्यावर कालांतराने संतांच्या नावानेही दिंड्या निघू लागल्या. "वर्ण अभिमान विसरली जाती l एक मेका लागतील पायी रे"ll. हीच त्यांची भावना होती. नाचू कीर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावू जगी ll या संप्रदायात वैयक्तिक भक्ती पेक्षा सामूहिक भक्ती अभिप्रेत होती. वारीची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याबद्दल मतांतरे आहेत तरीही ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी आषाढी कार्तिकी वारी केल्याचे उल्लेख आढळतात. कर्मकांडाला फाटा देऊन नामस्मरण हे महत्त्वाचे मानलेले सर्व वारकरी एकमेकांना भेटतात नमस्कार करतात एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटल्यानंतर त्याला माऊली असे म्हणतो. यातूनच जातीभेद वर्ण निर्मूलनाची सहज प्रक्रिया पार पडली.
विठ्ठल : वारकऱ्यांचे आराध्य दैवत
विठ्ठल किंव्हा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. अठ्ठावीस युगे तो भक्तांच्या सेवेसाठी पुंडलिकाच्या इच्छेने विटेवर उभा आहे असे लोक मानतात. तो कृष्णाचा अवतार आहे अशी त्यांची धारणा आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंतचे याचे उल्लेख आढळतात. शैव-वैष्णव अनेकेश्वर-एकेश्वर सगुण-निर्गुण हे सर्व वाद बाजूला ठेवून हा पंथ एकच गोविंद म्हणजे कृष्णा म्हणजे विठ्ठल हा देव मानतो.
वारकरी संप्रदायाचा अचारमार्ग ....
विचार मार्ग म्हणजे दैनंदिन व्यवहार. वारकऱ्यांचा अचार मार्ग अत्यंत साधा सोपा आहे. आपले कर्म हेच ईश्वर आहे असे ते मानतात. नमस्मारण हीच भक्ती म्हणतात. वर्षातून आषाढी-कार्तिकी किंवा कोणत्याही एकादशीस किंवा जेव्हा जमेल तेव्हा विठ्ठलाला भेटणे ही त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते. गळ्यात तुळशीच्या लाकडाची माळ, कपाळावर गोपीचंद टिळा, अबीर-बुक्का खांद्यावर भगवी पताका, ही त्यांची बाह्य लक्षणे आहेत. तर वर्तनुकी बाबत..१). सत्य आचरण करावे.२). परस्त्री रखुमाई प्रमाणे म्हणजे मातेप्रमाणे समजावी.३). व्यभीचार करू नये. ४). अपराध्याला उदार मनाने क्षमा करावी.५). शाकाहारी भोजन करावे मांसाहार करू नये.६). वर्षातून एकदा तरी पंढरीची वारी करावी.७). एकादशी चा उपवास करावा.८). तुळशीच्या मण्यांच्या माळेने जप भजन नामस्मरण करावे.९). नित्यकर्मे प्रामाणिकपणे करावीत.१०). हरिपाठाचे अभंग म्हणावेत,चिंतन करावे,कीर्तनास जावे. ही त्यांची जीवनप्रणाली होती.
वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान...
संत जनाबाईच्या "ज्ञानदेवे रचिला पाया l उभारिले देवालया ll याअभंगात वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरांनी उभा केले हे सांगितले आहे.वारकरी संप्रदाय जरी ज्ञानेश्वरांच्या अगोदरपासून असला तरी या संप्रदायाला तात्विक जोड ज्ञानेश
Dhere Sir, [30.06.21 09:30]
्वरांनी दिली. भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या त्यांच्या ओवीबद्ध ग्रंथात त्यांनी भागवद गीतेचे तत्वज्ञान सहज साध्या-सोप्या लोकांच्या भाषेत म्हणजे मराठीत मांडले आहे. ओवी,अभंग,भारुड या लोक वाड्मयाच्या प्रकारात या संप्रदायाचे तत्त्वज्ञान आहे."आम्हा घरी धनl शब्दांचीच रत्ने llशब्दांचीच शस्त्रे l यत्ने करू ll , जे का रंजले,गांजले l तया म्हणे जो आपुले ll तोचि साधु ओळखावा l देव तेथेची जाणावा ll. तुकारामांच्या अशा ओवितून आपणास सर्व सार समजते.
वारकरी संप्रदायाचा इतिहास...
आई वडिलांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकावर प्रसन्न होऊन त्याच्या भेटीला विठ्ठल आणि रुक्मिणी हे देव येतात.तो अविरत सेवा करत असल्याने बाजूची वीट उचलून विठ्ठलाकडे फेकतो आणि त्यावरच कुंडलिका ची वाट पाहत विठ्ठल-रुक्माई ही पंढरीत थांबतात. या गोष्टीतून मिथ्य ईश्वर सेवेपेक्षा माता-पित्यांची सेवा अधिक महत्त्वाची आहे हा बोध आपणास मिळतो. महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश,तमिळनाडू या प्रदेशात सहाव्या सातव्या शतकात विठ्ठल भक्तीचे दाखले मिळतात. वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचे स्थूलमानाने चार टप्पे मानले गेले आहेत.
१). कुंडलिक ते ज्ञानेश्वरा पर्यंत चा कालखंड.
२). ज्ञानेश्वर व नामदेव यांचा कालखंड.
३). तुकाराम महाराजांचा कालखंड.
४). तुकारामोत्तर कालखंड.
पुंडलिक ते ज्ञानेश्वर या कालखंडातील वारकरी साहित्य हे मौखिक स्वरूपात आहे.शैव-वैष्णव अनेकेश्वर-एकेश्वर,सगुण-निर्गुण हे सर्व वाद बाजूला ठेवून हा पंथ एकच विठ्ठल हा देव मानतो.
निवृत्ती, ज्ञानदेव,सोपानदेव,मुक्ताबाई या भावंडांना जातिव्यवस्थेचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. लोकशिक्षण व जनजागृती हे उद्दिष्ट ठेवून माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके. आलोक भाषेचा आग्रह जागृत करून ज्ञानेश्वरांनी ओवी अभंग लिहीले. त्यांच्या भावंडांनी ही अभंग लेखन केले.
संत नामदेवांनी ही भक्ती परंपरा महाराष्ट्राच्या बाहेर अगदी पंजाब पर्यंत नेली. नाचू कीर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावू जगी ll उद् घोषणा होती. याच कालखंडात गोरा कुंभार,सावता माळी,नरहरी सोनार,चोखामेळा, सेनान्हावी,जनाबाई,कान्होपात्रा इत्यादी संत परंपरा निर्माण झाली.
संत एकनाथांनी मोठ्या प्रमाणावर भारुड रचना केली. विपुल विविध लेखन केले. ज्ञानेश्वरी ची मूळ प्रश्न शोधून त्यातील आपपाठ दूर केले.
यानंतर चा कालखंड संत तुकारामांचा आहे. मेनाहून मऊ l आम्ही विष्णुदास ll कठीण वज्रास l भेदू ऐसे ll. असे सांगणारे तुकाराम विद्रोही आहेत. ढोंगीपणावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. ऐसे कैसे झाले भोंदू l स्वार्थ साधुनी म्हणती साधू ll, शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी ll , माझ्या वडिलांची मिराशी गा देवा l तुझी चरण सेवा पांडुरंगा ll, तुका म्हणे माझे l हेचि सर्व सुख ll पाहिन श्रीमुख l आवडीने ll इ. अभंग आणि महाराष्ट्रातील मने तयार करण्याचे काम तुकारामांनी केले. म्हणूनच आपल्या अभंगात बहिणाबाई म्हणतात "तुका झालासे कळस भजन करा सावकाश ". तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे समकालीन होते. लढवू या पाण्याच्या मावळ यांसाठी त्यांनी पाईका चे अभंग लिहिले.
तुकारामोत्तर कालखंडात वारकरी संप्रदायाला काही प्रमाणात ओहोटी लागली या कालखंडात बहिणाबाई होत्या. संत निळोबा हे अखेरचे संत मानले जातात. त्यानंतर चा कालखंड पेशवाईचा होता येथे संत परंपरा खंडित झाली.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.