Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: महात्मा गांधीजींची असहकार चळवळीची कारणे

Monday, 21 June 2021

महात्मा गांधीजींची असहकार चळवळीची कारणे

 Sawant R., [21.06.21 14:43]

BA--2  भारतीय स्वातंत्र्या चळवळीचा इतिहास पेपर नंबर 6 --महात्मा गांधीजींची असहकार चळवळीची  कारणे--- 

महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी असहकार आंदोलनाची घोषणा करण्याचा अगोदर हे आंदोलान  का करावं लागलं आपण बघणार आहोत.या मध्ये पहिले कारण रौलट अॕक्ट हे कायदे क्रांतिकारकांचा मोठ्या प्रमाणात उदय होत होता. त्या प्रमाणात ब्रिटिशांना त्याची धास्ती वाटत होती, भारतीय लोकांच्यादेश द्रोही हालचाली रोखण्यासाठी मिस्टर रौलट  यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली. आणि तिच्या शिफारशीनुसार 1919 आली सरकारने  कायदे केले त्याला रोलेट कायदा म्हणतात. या कायद्यानुसार भारतीय याःच्यावरविनाचौकशी खटला दाखल केला जानार होता. शिक्षा झाल्यास त्याला उच्च न्यायालयात अपील करता येणार नव्हते.  पोलीस कचेरीतुन रोज हजेरी लावणे ही सक्ती केली गेली होती. सरकारला दडपशाहीचे एक प्रकारे स्वातंत्र्य या कायद्यामुळे मिळाले होते. अशा कायद्यामुळे भारतीय लोकांच्या वर प्रचंड दडपशाही केली गेली .हे जुलमी कायदे मी चालु देणार नाही हे गांधीजींनीत्या वेळी ठणकावून सांगितले आणि त्यांनी 30 मार्च 1919 देश व्यापी आंदोलनाची तारीख घोषित केली त्यानंतर  जालियनवाला बाग हत्याकांड घडले भारत देशाच्या इतिहासातील अतिशय व अमानवी घटना म्हणजे 1919चे  जालियनवाला  बाग हत्याकांड होय रौलट कायद्याला विरोध म्हणून पंजाब मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू होता 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत निषेध सभा आयोजित केली होती या सभेला हजारो लोक जमले होते ही संधी साधून पटांगण बंदिस्त होते त्याला एकच आत-बाहेर करण्यास वाट होती त्या संधीचा फायदा घेऊन ही वाट जनरल डायरने बंद केली .आणि ब्रिटिश सैनिकांन करवी बंदुकी द्वारे हजारो गोळ्या हिंदी जनतेवर मारल्या यामध्ये चारशे लोक मारले गेले हिंदुस्तानच्या इतिहासात अशा प्रकारच्या हत्याकांडाने देश पेटून उठला ही घटना घडल्यानंतर व्हाइस राॕय ओडवायरने जनरल डायर ला शाबासकी दिली या मुळे भारतीयांच्या  मनातअसंतोष निर्माण झाला. अधिकच  हे आंदोलन गतिमान करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी गांधीजीने मुस्लिम समाजाची  खिलापत चळवळ सुरू होती त्या चळवळीला पाठिंबा दिला या पाठिंबा च्या निमित्ताने हिंदू मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात भारतीय स्वातंत्र्यासाठी एका ठिकाणी आले एक प्रकारे ब्रिटिशाना  मोठा इशारा होता. या सगळ्याला भारतातील जालियनबाग हत्याकांडाची चौकशी करन्या साठी व भारतीय  असंतोष शांत करण्यासाठी सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली होतीत्याचा अहवाल 23 मे 1919 रोजी  प्रसिद्ध केला जनरल ला दोषी ठरवून त्याला निवृत्त केले. इंग्लंडमध्ये डायरच्या सन्मानासाठी इंग्रज साम्राज्याचा त्राता म्हणून निधी उभारला गेला. यावेळेला भारतामध्ये त्याच्या मुळे तीव्र असंतोष पसरला. या सर्वांचाच परिपाक म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अहिंसा मार्गाने आक्रमक असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि हे आंदोलन म्हनजे असहकार आंदोलन चळवळ होय या आंदोलनाला वरील कारणे कारणीभूत ठरली आणि याच कारणामुळे ब्रिटिशांच्या वरचा गांधींचा विश्वास उडाला .म्हणून  त्यांनी  असहकार आंदोलनाची घोषना केली.लावून त्याची चौकशी केली जानार होती. या कायद्याच्या माध्यमातून भारतीयानां ञास दिला जात होता. त्याच्यावर अपील करता येणार नव्हते.शिवाय विनाचौकशी कोणत्याही भारतीय व्यक्तीला अटक करता येणार होते. या कायद्याला विरोध करन्यासाठी13-4-1919 ला अमृतसर मध्ये जालियनवाला बागेमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करण्यासाठी लोक एका ठिकाणी जमले असताना .ब्रिटिशांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला .त्याच्या मध्ये 400 लोक मारले गेले 13 एप्रिल 1919  रोजी ची घटना आहे या घटनेमुळे देशात असतोंष निर्माण  झाला.परीनामी गांधींना ब्रिटिशांच्या वर विश्वास दाखवली ती चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी सर्व भारतीयांच्यात ऐक्य निर्माण व्हावे  या साठी स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांनी देखील सहकार्य मिळावे यासाठी महात्मा गांधींनी खिलापत चळवळीला पाठिंबा दिला  त्याचबरोबरजालीयन बाग हत्याकांड करन्यातत आले.परीणामी वरील सर्व  कारना मुळे देशात असतोष निर्माण  झाला"देशाने त्या वेळी गांधीनी  ब्रिटिशांच्या विरोधात   आंदोलन सुरू केले .करन्याचा निर्णय  घेतला गांधीजी नी1920 चे असहकार चळवळ चे आंदोलन हाती घेतले 4 -9-1920रोजी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार  आंदोलनाचा ठराव पास केला. गेला आणि पुढे असहकार चळवळीचा कार्यक्रम निश्चित करून हे आंदोलन सुरू केले गेले .या आंदोलनाचे कार्यक्रमां मध्ये  पुढील गोष्टीचा अंतर्भाव होता. यामध्ये  लोकांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या पदव्या मानसन्मान अधिकार पदे याचा त्याग करायचा. स्वदेशी मालाचा वापर.परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा.सरकारी  सभा कार्यक्रमांना हजर राहायचे नाही. सरकारी शाळा महाविद्यालय विद्यापीठे यातून शिक्षण घ्यायचे नाही .ब्रिटिश न्यायालयावर


Sawant R., [21.06.21 14:43]

बहिष्कार टाकायचा. भारतीय लोकांनी न्याय पंचायत सुरू करायच्या .स्थानिक स्वराज्य संस्था कायदेमंडळ यांचे वर बहीष्कार टाकायचा .  कायदेमंडळाच्या निवडणुका बहिष्कार टाकायचा अशा पद्धतीचा असहकार आदोंलनाचा चा कार्यक्रम होता. आणि या निमित्ताने गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले गेले या चळवळीमुळे 

देशामध्ये स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला गेला स्वदेशी मालाच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले गेले हातमागाच्या व्यवसायाचे पुनर्जीवन झाले. दारुबंदीचा प्रचार अस्पृश्यता निवारण हिंदू-मुस्लीम एक्य या साठी यासाठी प्रयत्न होऊ लागली लोकांनी पदव्या व मानसन्मान यांचा त्याग केला नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आयसीएस पदवीचा त्याग केला गांधीजीनी कैसर-ए-हिंद या पदवीचा त्याग केला रविद् नाथ टागोर यांनी सर या पदविचा त्याग केला.परीनामी असहकार  चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत ते उच्चशिक्षित तरुण या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. हे आदोंलन ब्रिटिशांनी दडपून   टाकण्याचा प्रयत्न  केला त्यात  ब्रिटिशांना यश आले नाही . या आंदोलनात अनेक लोकांना अटक केली गेली 1921 25 हजार कार्यकर्त्यांना केले गेले होते.तरी देखील  हे आंदोलन सुरु होते.हे आंदोलनसुरुअसताना  उत्तर  पृदेश चौरी चौरा येथे5--2-1922 रोजी बंदीचा सत्याग्रह सुरु असताना पोलीस आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष झाला. यामध्ये भारतीय जनतेने पोलिसांना मारहाण करून .त्याना ठिर मारले. पोलीस चौकी जाळली. परिणामी महात्मा गांधींनी ही चळवळ तहकूब  केली.जोपर्यंत अहिंसेचे महत्व लोकांना कळत नाही तो पयृतं कोणतीही चळवळ यशस्वी होणार नाही . अशी गांधीनी  खूणगाठ बांधली .आणि यामुळेच असहकार चळवळ त्यांनी मागे घेतली. अनेकांना हा निर्णय आवडला नाही. ही संधी साधून  10 मार्च 1922 रोजी गांधीजींना अटक केली त्यामध्ये त्यांना सहा वर्षाची शिक्षा दिली. असहकार चळवळी चे  मूल्यमापन करताना असे लक्षात येते कीया चळवळी ला जरी अपेक्षित यश मिळाले नाही तरी .भारतीय  स्वातंत्र्याची चळवळ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचली. काँग्रेसचे कृतिशील संघटना बनली सरकार बद्दलची लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती ती भीती नष्ट झाली. आतापर्यंत सुधारणा मागणाऱ्या काँग्रेसचे नजिकचे ध्येय स्वराज्य ठरले .हे  आंदोलनाचे यश होते. या आंदोलनामुळेच त्यामध्ये नवचैतन्याची निर्मिती झाली नवीन विचार करायचे सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची फळी तयार झाली.  जरी ही चळवळ यशस्वी झाली नसली तरी अ यशस्वी झाली अशी देखील म्हणता येणार नाही. मात्र या चळवळीमुळे हिंदुस्तान स्वातंत्र्य चळवळ विषयी जागृत झाला असे मात्र नक्कीच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...