(J. D. Ingawale)
बी.ए.भाग ३ / सेमि ६ /
पेपर नं. १४ / अर्थिक विचारांचा इतिहास-२
अल्फ्रेड मार्शल यांचे प्रमुख आर्थिक विचार
प्रास्ताविक
आर्थिक विचारांच्या इतिहासात मार्शलचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मार्शलचा जन्म २६ जुलै, १८४२
रोजी लंडन येथे झाला. त्याचे वडील 'बँक ऑफइंग्लंड'मध्ये कॅशिअर होते. धार्मिक क्षेत्रात कार्य करावे या दृष्टीने त्याला शिक्षण देण्यात आले होते. तथापि, गणित हा त्याच्या आवडीचा विषय होता. मार्शलचे शिक्षण सेंट जॉन्स कॉलेज व केंब्रिज विद्यापीठात झाले. 'रॅंग्लर' ही गणितातील उच्च पदवी मार्शलने केंब्रिज विद्यापीठात मिळविली होती. गणिताबरोबर मानसशास्त्र व पदार्थविज्ञान हे त्याचे आवडीचे विषय होते. मार्शलने केंब्रिज विद्यापीठात ९ वर्षे गणिताचे अध्यापन केले होते. सन १८८५ मध्ये केंब्रिज विद्यापीठात काम करताना त्याने स्वतंत्र केंब्रिज संप्रदायाची निर्मिती केली.
पुढे मार्शलवर हेगेल व कास्ट या तत्त्व वैत्यांच्या विचारांचा प्रभाव पडला. अडम
स्मिथ व रिकार्डोचे आर्थिक विचार अभ्यासतानाच ते अर्थशास्त्राकडे वळले. सन १८९० मध्ये त्याने Principles of Economics हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला, त्याचप्रमाणे
Economics of Industry, Industry and Trade Money, Credit and Commerce हे त्याचे इतर महत्त्वाचे ग्रंथ मानले जातात. १८९१
ते १८९४ या काळात मार्शलने 'रॉयल कमिशन ऑन लेबर' या संस्थेत काम केले होते.
मार्शलचे मूल्यविषयक समन्वयवादी विचार
मार्शलच्या विविध आर्थिक संकल्पनांमध्ये मूल्यविचारांना अनन्यसाधारण असे महत्व आहे. त्याने सनातनी विचारसरणी व उपयोगितावाद्यांची विचारसरणी यांच्यात समन्वय साधून वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोणातून मूल्य सिद्धांताची मांडणी केली. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी वस्तूच्या मूल्याची चर्चा पुरवठा व उत्पादन खर्चाच्या संदर्भात केली होती, तर ऑस्ट्रियनपंथी अर्थशास्त्रज्ञांनी वस्तूची मागणी व उपयोगिता यावर लक्ष केंद्रित केले होते. मार्शलने मात्र मागणी व पुरवठा यांच्यात समन्वय साधून मूल्य सिद्धांताची मांडणी केली. मार्शलने आपले मूल्यविषयक विचार मांडताना पूर्ण स्पर्धा व उपयोगिता विवेचनातील गृहीते आधारभूत मानली. त्याने 'वस्तूचे मूल्य हे त्या वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेवर अवलंबून असते' हा सनातनी मूल्य सिद्धांताचा गाभा विचारात घेऊन वस्तूच्या मूल्य निश्चितील आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिले. त्यांच्या मते, वस्तूचे मूल्य हे तिला असलेली मागणी पुरवठा यांच्या संतुलनातून निश्चित होते. त्यामुळे मूल्यनिश्चितीत वस्तूची मागणी महत्त्वाची की, पुरवठा अधिक महत्त्वाचा हा प्रश्न गौण आहे. त्याचप्रमाणे वस्तूच्या मूल्याच्या विवेचना मार्शलने कालखंडाचा
समावेश करून अल्पकालीन बाजारभाव दीर्घकालीन सर्वसाधारण किंमत या दोहोंच्या बाबतीत समतोल कसा साधला जातो याच सविस्तर विवेचन केले.
मार्शलने वस्तूचे मूल्य निश्चित करताना वस्तूच्या मागणीसाठी एकूण उपयोगित सीमांत उपयोगिता, घटती सीमांत उपयोगिता, मागणीचे कोष्टक व मागणीची लवचीकता बाबींना आधारभूत मानून विवेचन केल्याने ते अधिक वस्तुनिष्ठ बनले. वस्तूच्या पुरवठ्या विश्लेषण करताना श्रमविभागणी, लोकसंख्यावाढीची स्थिती, अर्थव्यवस्थेची उत्पादनक्षम व उत्पादन संघटनाचे विद्यमान स्वरूप इ. बाबी महत्त्वाच्या मानल्या. त्यामुळे त्याचे मूल्यविषयक विचार अधिक महत्त्वपूर्ण ठरले आहेत. मार्शलने मूल्य सिद्धांताचा विचार करताना वस्तूची मागणी व पुरवठा या दोन घटकांबरोबर त्यांचा प्रभाव अजमावण्यासाठी लागणारा कालावधी अधिक महत्वाची भूमिका पार पाडतो. मार्शलचे कालखडविषयक विवेचन मूल्यनिश्चितीतील स्थान आधुनिक काळात महत्त्वाचे मानले जाते. त्याने मूल्यनिश्चितीत कालखंडाची भूमिका पुढील चार प्रकारात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
१. अत्यल्प काळ (Very Short-run Period) अत्यल्प काळ हा अगदी अल्प म्हणजे काही तासांचा असतो. या काळात उत्पादक विक्रेत्यास वस्तुच्या पुरवठ्यात वाढ घडवून आणता येणे कठीण असते. अशा
वेळी वस्तूची किंमत ही तिच्या मागणीवरून निश्चित होते. जर वस्तूच्या मागणीत वाढ झाली तर किंमत वाढते, याउलट स्थितीत ती कमी झालेली दिसून येते. म्हणजेच अत्यल्प काळात वस्तूच्या मूल्यनिश्चितीवर तिच्या मागणीचा प्रभाव अधिक असतो.
• २. अल्पकाळ (Short-run Period) : अल्पकाळात. उत्पादक विक्रेता बदलत्या घटकांचे प्रमाण विशिष्ट मर्यादेत वाढवून पुरवठ्यात काही प्रमाणात वाढ घडवून आणू शकतो. व त्यामुळे अल्प कालखंडात वस्तूची मागणी व वस्तूंचा पुरवठा या दोहोंच्या संघर्षातून वस्तूची जून किंमत ठरते. ही किंमत 'अल्पकालीन सर्वसाधारण किंमत' म्हणून ओळखली जाते.
३. दीर्घकाळ (Long-run Period) : मार्शलच्या मते, दीर्घकाळात सामान्यतः वस्तूची तर मागणी व वस्तूच्या पुरवठ्याच्या संतुलनातून मूल्यनिश्चिती होते. या काळात विक्रेता यंत्रसामग्री व उत्पादन तंत्रात योग्य ते बदल करून मागणीप्रमाणे पुरवठ्यात वाढ घडवून आणू शकतो. 7. त्यामुळे दीर्घकालीन मागणी व पुरवठा यांच्या समतोलातून प्रस्थापित होणारी ही किंमत ते 'दीर्घकालीन सर्वसाधारण किंमत' म्हणून ओळखली जाते.
४. प्रदीर्घ काळ (Very long or Secular Period) : प्रदीर्घ काळ हा सर्वसाधारणपणे ना ३० ते ४० वर्षांचा असतो. या काळात देशाची लोकसंख्या, लोकांच्या आवडीनिवडी, व उत्पादनतंत्र भांडवल रचना, संघटन कौशल्य आणि वस्तूच्या मागणी-पुरवठ्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो.तसेच
प्रदीर्घ काळात अर्थव्यवस्थेत होणाऱ्या बदलानुसार वस्तूची मागणी व पुरवठ्यात व जरी बदल होत असले तरी प्रत्येक विक्रेत्याचे वस्तूच्या किमतीविषयीचे धोरण अधिक चे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे वस्तूची प्रदीर्घकालीन किंमत ही तिच्या दीर्घकालीन सरासरी खर्चाइतकी असते. या काळात विक्रेत्यास मिळणारा नफा हा सामान्य स्वरूपाचा असतो.
मार्शलचे 'मुख्य खर्च' व 'पूरक खर्चविषयक' विचार
१.मुख्य अथवा बदलता खर्च (Prime Costs) : वस्तूच्या उत्पादनात बदलत्य घटकावर होणारा खर्च म्हणजे मुख्य खर्च होय. हा खर्च उद्योजकाच्या उत्पादनाच्य आकारमानानुसार बदलत असतो. याचाच अर्थ उत्पादकाने वस्तूच्या उत्पादनात वाढ घडवू आणण्याचे ठरविले तर मुख्य खर्च वाढतो. याउलट, उत्पादन कमी करण्याचे ठरविले असता मुख्य खर्च कमी होतो. इतकेच नव्हे तर त्याने उत्पादन बंद केले तर बदलता खर्च शू होतो. अशा
प्रकारच्या खर्चात उत्पादकाने कच्चा माल, मजुरी, उत्पादन कर, विक्रीकर वाहतुकीवर केलेल्या खर्चाचा समावेश होतो. म्हणजेच उत्पादकाच्या दृष्टीने मुख्य खर्चाच संबंध उत्पादनाच्या आकारमानाशी असतो.
मार्शलच्या मते, अल्पकाळात उत्पादक आपले उत्पादनविषयक निर्णय घेताना, खर्चाचा विचार करतो. किमान मुख्य अगर बदलता खर्च भरून निघेल इतकी किंम मिळण्याची शक्यता असेल तर तो उत्पादन चालू ठेवतो. अन्यथा उत्पादन बंद करणे अधिक पसंत करतो. म्हणजेच उत्पादकाला आपले अल्पकालीन मूल्यविषयक धोरण ठरविण्यासाठी उत्पादनविषयक निर्णय घेण्यासाठी मुख्य खर्चाची संकल्पना महत्त्वाची उपयुक्त ठरते.
२. स्थिर अगर पूरक खर्च (Fixed or Supplemantery Costs) : ही संकल्पना दीर्घकाळाच्या संदर्भात अधिक महत्त्वाची मानली जाते सर्वसाधारणपणे उद्योगसंस्थेने अल्पकाळात स्थिर घटकांवर केलेला खर्च हा 'स्थिर अगर पूर खर्च' म्हणून ओळखला जातो. अशा
प्रकारच्या खर्चात इमारत भाडे, यंत्राची किंमत भांडवलावरील व्याज, विमा
हप्ते, उद्योगसंस्थेचा घसारा, देखभालीचा खर्च, कार्यालयीन व्यवस्थापकीय घटकांवर होणारा खर्च, उद्योग परवाना व व्यवसाय कर इ. बाबींचा समावे होतो. पूरक
खर्चाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्योगसंस्थेचे उत्पादन चालू अगर असले तरी हा खर्च करावाच लागतो. म्हणजेच अल्पकाळात हा खर्च करणे अपरिहार्य अस अशा प्रकारच्या खर्चास 'सुविधांवरील खर्च असेही म्हणतात. कार
पूरक खर्चावरूनच उत्पादनाचे आकारमान निश्चित होत असते. म्हणून पूरक खर्चा संकल्पना महत्त्वाची मानली जाते.
मार्शलची प्रातिनिधिक उद्योगसंस्थेची संकल्पना
मार्शलने मांडलेल्या उत्पादनविषयक विचारांमध्ये प्रातिनिधिक उद्योगसंस्थे'च्या संकल्पनेला
अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अर्थशास्त्रात प्रथमच प्रातिनिधिक उद्योगसंस्थेची संकल्पना मांडण्याचे श्रेय मार्शलकडे जाते. त्याच्या मते, दीर्घकाळात वस्तूची किंमत ही तिच्या सरासरी उत्पादन खर्चाशी निगडित असते. तथापि, उत्पादन खर्च ही संकल्पना बहुआयामी असून प्रत्येक उद्योगसंस्थेच्या बाबतीत ती भिन्न-भिन्न असू शकते. त्यामुळे दीर्घ कालखंडाचा विचार करता, कोणती उद्योगसंस्था अधिक कार्यक्षम ठरू शकेल ? याचे
उत्तर मार्शलने 'प्रातिनिधिक उद्योगसंस्थेच्या माध्यमातून दिलेले आहे. प्रातिनिधिक उद्योगसंस्था ही सर्व उद्योगसंस्थांना मार्गदर्शक ठरणारी उद्योगसंस्था असते.
प्रातिनिधिक उद्योगसंस्थेची संकल्पना विशद करताना मार्शलने असे म्हटले आहे की, प्रचलित उत्पादनतंत्र व व्यवस्थापकीय कौशल्य विचारात घेता, पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत, प्रातिनिधिक उद्योगसंस्थेचा सरासरी खर्च किमान असतो. त्यामुळेच अशी संस्था दीर्घकाळात टिकून राहू शकते. अशा
उद्योगसंस्थेचा दीर्घकाळातील सरासरी खर्च किमान पातळीवर असल्यामुळेच ती इतर संस्थांचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र असते.
प्रातिनिधिक उद्योगसंस्थेचा दीर्घकालीन सरासरी खर्च किमान पातळीवर असल्याने तिला पुढील पाच प्रकारचे अंतर्गत लाभ प्राप्त होतात.
१. तांत्रिक लाभ अगर बचती
२. व्यवस्थापकीय लाभ
३. भांडवलविषयक लाभ
४. खरेदी-विक्रीविषयक लाभ
५. मागणीविषयक लाभ अगर बचती
इतकेच नव्हे तर प्रातिनिधिक उद्योगसंस्थेला विशेषीकरण, स्थानियीकरण, उपफल निर्मितीचे लाभ व संशोधनातून मिळालेले लाभ असे बाह्य लाभही प्राप्त होतात. म्हणजेच प्रातिनिधिक उद्योगसंस्थेच्या आदर्श व्यवस्थापनामुळे तिचा सरासरी किमान पातळीवर राहण्यास या लाभाचा उपयोग होतो. प्रातिनिधिक उद्योगसंस्थेच्या माध्यमातून मार्शलने दीर्घकालीन मूल्यनिश्चितीच्या आदर्श व्यवस्थेचे स्पष्टीकरण केलेले आहे.
मार्शलचे उत्पादन व संघटनविषयक विचार
मार्शलने उत्पादनाचे प्रमुख तीन घटक असतात असे म्हटले आहे. त्यामध्ये भूमी, श्रम व भांडवल या घटकांचा त्याने समावेश केला आहे. त्याच्या मते, संघटक हा उत्पादनाची व्यवस्था पाहणारा एक महत्त्वाचा घटक असला तरी उत्पादन प्रक्रियेत त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसतो. परिणामी, उत्पादनाचे कार्य प्रामुख्याने भूमी, श्रम
व भांडवल या घटकांच्या कार्यक्षमतेवर व उत्पादकतेवर अवलंबून असते. या उत्पादन घटकांच्या मोबदल्याचा विचार करताना मार्शलने सीमात उत्पादकतेचा प्रकर्षाने विचार केला. श्रम, भूमी व भांडवल या उत्पादन घटकाच्या मोबदल्यांचा विचार करताना त्याने पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे.
१. श्रम: श्रम हा उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त ठरणारा महत्त्वाचा घटक असतो. श्रमाला. त्याच्या कार्याबद्दल दिला जाणारा मोबदला हा त्याच्या किमान वाजवी राहणीमानाच्य खर्चाइतका असावा, असे
मत मार्शलने व्यक्त केले आहे. मार्शलच्या मते, वेतनदर हे श्रमाला असलेली मागणी व त्याचा पुरवठा यांच्या समतोलातून निश्चित होतात. दीर्घकाळात श्रमिकाला देण्यात येणारा मोबदला हा त्याने उत्पादनात टाकलेल्या भरीइतका म्हणजेच त्याच्या सीमात उत्पादकतेइतका दिला जाणे आवश्यक आहे असे मत मार्शलने व्यक्त केले आहे. अशा
प्रकारे श्रम या उत्पादन घटकाच्या मोबदल्याबाबत विविधांगी स्वरूपाचे विचार मार्शलने व्यक्त केलेले दिसून येतात.
२. भूमी : मार्शलने रिकार्डोचा खंडसिद्धांत मान्य करून जमीनदाराला मिळणारे खंडस्वरूप उत्पन्नही मान्य केले. तथापि, अल्पकाळात जमिनीबरोबर श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादन घटकांचा पुरवठा अलवचीक असल्याने त्यांना खंड स्वरूप उत्पन्न मिळते. अशा
उत्पन्नास त्याने 'आभास
खंड' असे
नाव दिले. अर्थशास्त्रात आभास खंडाची संकल्पना मार्शलने सर्वप्रथम मांडली. मार्शलच्या या संकल्पनेतूनच पुढे खंडाचा आधुनिक सिद्धांत उदयास आला.
३. व्याज -
मार्शलने भांडवल या उत्पादन घटकाचे उत्पादन व्यवस्थेतील महत्त्व अनन्यसाधारण असे मानले आहे. भांडवलाच्या मालकाला देण्यात येणारा मोबदला (व्याज) हा भांडवल या उत्पादन घटकाच्या वापरातून निर्माण होतो. उद्योग व्यवसायासाठी भांडवलाचा पुरवठा करणारी व्यक्ती उपभोगाचा त्याग करून बचत करीत असते. त्याबद्दल त्याला बक्षीस रूपाने व्याज मिळावयास हवे. मार्शलच्या मते, अल्पकाळात भांडवलदाराला मिळणारा व्याजाचा दर हा भांडवलाला येणारी मागणी व भांडवलाचा पुरवठ यांच्यात समतोल प्रस्थापित करतो. मात्र दीर्घकाळात पैशाच्या पुरवठ्याचा व गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या लाभाचा व्याजदरावर परिणाम होत असतो. थोडक्यात, व्याजदर हा भांडवलाच्या उत्पादकतेवर व भांडवलाला येणाऱ्या मागणीवर अवलंबून असतो.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.