Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: अक्षरबंध/अग्रलेख

Monday, 21 June 2021

अक्षरबंध/अग्रलेख

 राधानगरी महाविद्यालय, राधानगरी

बी ए भाग १

अभ्यासक्रमपञिका क्रमांक:२

सञ :२

पाठ्यपुस्तक :अक्षरबंध

विभाग :३ अग्रलेख

विषय प्राध्यापक प्रा बी के पाटील

प्रस्तावना : वृत्तपञात बातमीबरोबर वृत्तपञिय लेख लिहिले जातात. वृत्तपञिय लेखास इंग्रजीत Feature Writing असे म्हणतात.A non-news aarticle in newspaper म्हणजे वृत्तपञिय  लेख. ज्याला बातमी म्हणता येत नाही. असा लेख असे या लेखाचे स्वरुप असते. वृत्तपञ, व्यक्तिविशेष लेख, मुलाखतीतून लेख, ऐतिहासिक लेख, स्फूटलेख, स्तंभलेख या सर्वामध्ये प्रथम क्रमांकाचा मान आग्रलेखाला दिला जातो. अग्रलेखाला संपादकीय लेख असे म्हटले जाते. संपूर्ण वृत्तपञाची जबाबदारी संपादकावर असते. वृत्तपञाच्या पृष्टावर अग्रलेखाला जागा  दिली जाते.

🔹अग्रलेख :संकल्पना, स्वरुप आणि महत्व

       'अग्रलेख' या शब्दात अग्र आणि लेख हे दोन शब्द आहेत. अग्र म्हणजे,अगोदरचा आणि महत्वाच्या स्थानी असलेला. लेख म्हणजे विशिष्ट विचार प्रतिपादन  करणारी भाषिक रचना. 'वृत्तपञातील अत्यंत महत्वाचा लेख म्हणजे अग्रलेख' या विधानात अग्रलेख हे समजून येत नाही , माञ त्याचे स्थान कळते.

   अग्रलेख म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ,अग्रलेख कशाला म्हणता येत नाही, याचा विचार करावा लागतो. एखादी बातमी किंवा वृत्त वाचकापुढे विस्तृत स्वरुपात मांडणे म्हणजे अग्रलेख नव्हे. एखाद्या समस्येवर दिलेली लेखी रुपातली प्रतिक्रिया म्हणजे अग्रलेख नव्हे. अग्रलेखासाठी वृत्तपञातील विशिष्ट पृष्ट आणि विशिष्ट जागा जी अढळ स्वरुपात संपादकाने निश्चित केलेली असते, त्यावरुनही तो लेख हा अग्रलेख आहे की नाही हे समजून घेता येते.

उदा. आतील दूसरे, चौथे, सहावे किंवा आठवे पृष्ठ आणि अगदी डावीकडची बाजू. अशा प्रकारे त्या त्या वृत्तपञात अग्रलेखाची जागा ठरलेली असते.

अग्रलेखात संपादक किंवा अग्रलेख लेखक हा सभोवतालच्या घडामोडीचे विश्लेषण करीत असतो, त्यामागच्या कार्यकारणाचा शोध घेत असतो, घटनेत दडलेल्या सत्याचा शोध घेऊन त्यावर भाष्य करीत असतो. वाचकांना एखादी घटना वा विषय आवडेल की नाही याचा विचार लेखक करीत नाही. ती घटना प्रभाव टाकणारी, जीवनमान बदलवून टाकणारी असेल तर तिची निवड करुन अग्रलेख लिहिला जातो. 'सभोवतालच्या घडामोडी, राज्यकर्त्याचे बदलते धोरण, त्यासाठी राबविल्या जाणार्‍या योजना आणि लोकांचे विचार वर्तन याचे सम्यक विश्लेषण करणारा, वाचकांच्या शक्तीला चालना देणारा लेखन प्रकार म्हणजे अग्रलेख होय.'

   तसेच वैचारिक निबंधाशी अत्यंत जवळचे नाते सांगणारा लेख म्हणजे अग्रलेख होय. प्रत्येक वृत्तपञातील अग्रलेख हा त्या वृत्तपञाची भूमिका दर्शविणारा लेख असतो. अग्रलेख वाचल्यानंतर त्या त्या वृत्तपञाची किंवा संपादकाची भविष्यकालीन वाटचाल लक्षात येते. अग्रलेख वाचणे म्हणजे सभोवतालच्या घडामोडीकडे पाहण्याचा दृष्टिकोण विकसित करणे. वैचारिक समृद्ध होण्याचा अनुभव अग्रलेखामुळे येतो.

  अग्रलेख हा कोण लिहितो,हे महत्वाचे नसते. लिहिणारी व्यक्ती माञ जबाबदारीची जाणीव असलेली, पणकारितेची पुरेपूर जाण असलेली, बहुश्रुत असलेली आणि काळाची पुढील पावले ओळखणारी असावी लागते. अग्रलेखाच्या खाली वा शीर्षकाजवळ लेखकाचे नाव वा ओळख नसते. इतर कोणत्याही लेखाचा कर्ता वाचकांना कळतो माञ अग्रलेख/संपादकीय लेख कोणी लिहिला हे समजत नाही. नाव समजले नाही तरी अग्रलेखातील विचार समजून घेता येतात.


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSddwhPiXLOnODtWP_kUWPSaeMFeLIAR-sx4x_XgdsvyNQGXuw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...