(Dr. Dhere V. D.)
B.A.I.Sem.II Paper II History
मराठ्यांचे आरमार (भाग ६)
भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. मध्ययुगात भारताने भारतातील कोणत्याही सत्ताधीशांनी आरमार उभारण्याचा प्रयत्न केला नाही पण शिवाजी महाराजांनी राष्ट्रीय आरमाराची स्थापना केली. हे त्यांच्या दूरदृष्टीचे व मुत्सद्दीपणाची उदाहरण होय. स्वराज्य विस्तार करताना जावळीच्या मोर्यांना जिंकल्यानंतर स्वराज्याची हद्द समुद्रापर्यंत पोहोचली आणि शिवाजी महाराजांच्या लक्षातही आले की, युरोपियन आचीत सत्ता आहे इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, सिद्धी यांच्या ताब्यात सर्व समुद्रकिनारा आहे. तो जर आपला समुद्रकिनारा आपल्या ताब्यात ठेवायचा असेल तर आरमार निर्मिती केली पाहिजे. स्वराज्याला असलेल्या परकीय सत्ता पासून चा धोका आपणास जर नष्ट करावयाचा असेल तर आरमार निर्मिती व सागरी किल्ले निर्मिती केली पाहिजे. कोकण जिंकल्यानंतर शिवरायांना सिद्धीचा सातत्याने त्रास जाणवू लागला. तर गोवेकर पोर्तुगीज समुद्रात जहाजे फिरवावी याचे असतील तर आम्हास दस्तक द्यावा लागेल असेच जाहीर केले. सेक्स युद्धासाठी आणि देशांतर्गत व्यापार साठी शिवरायांनी जहाजबांधणीचे उद्योगाला सुरुवात केली कोकण किनारपट्टीवरील कोळी भंडारी या दर्यावर्दी जमातींचा त्यासाठी वापर करून घेतला कोकणात सागाचे लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याचा वापर या जहाज बांधण्यासाठी करण्यात आला भारतीयांकडे युरोपियन साठी मोठी जहाजे ही नव्हती व तसे तंत्रज्ञान ही मराठ्यांना अवगत नव्हते. त्यामुळे त्यांनी लहान-लहान जहाज बांधणीला सुरुवात केली. आणि नंतर गोवेकर पोर्तुगीज तंत्रज्ञाना कामावर ठेवून त्यांच्या हाताखाली आपल्याकडील लोहार सुतार या कारागीर जमातींना देऊन आपला जहाज बांधणीचा उद्देश सफल केला.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे पुढील प्रकारची जहाजे होती.
गुराबा, मायावा, पगार, तरांडी, शिबाड, तीरकारी, तारू, गलबत,मचवा, पाल,जुग.
शिवरायांच्या आरमारात 'गुराब' हे ३०० टन वजनाचे दोन डोल काट्या असणारे सगळ्यात मोठे जहाज होते.
त्याखालोखाल 70 टन वजनाचे सहा ते सात डोल काट्या आसणारे गलबत हे जहाज होते. डोल काड्यांची संख्या, वजन, आकार, त्यावरील तोफांची संख्या यावरून जहाजाचे प्रकार पाडले जात. मराठ्यांच्या आरमाराची संख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिलेली आहे. होड्या 160, महागिरी 150, गलबत 100, मचवे 50, लहान गुराब 50, तारू 60 गुराब 30, पाल 25, जुग 15.
आरमार दलाचे प्रशासन.
आरमाराच्या प्रमुखाला दर्यासारंग /सरखेल या नावाने ओळखले जात असे. त्याच्या हाताखाली दुय्यम अधिकारी म्हणून मायनाईक नेमलेला असे. आरमाराचे अनेक सुभे केलेले असत एका सुभ्यात 5 गुराब 15 गलबते व इतर काही जहाज असत. कथा आपल्या समुद्र किनाऱ्याचे रक्षण करणे शत्रूच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करणे आपल्या व्यापाराचे रक्षण करणे ही प्रमुख कामे केली जात. शिवरायांनी आरमाराच्या जोरावर मोहीम काढल्याचे दाखले मिळतात. आरमारला वावरता यावे यासाठी समुद्रकिनाऱ्यावर जलदुर्गांची एक साखळी शिवाजी महाराजांनी निर्माण केली. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या सागरी सत्ता व परकीय व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या आरमाराचा मराठ्यांना मोठा उपयोग झाला.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.