Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: मराठाकालीन न्याय व्यवस्था

Friday, 25 June 2021

मराठाकालीन न्याय व्यवस्था

 (Dr. Dhere V. D.)

मराठाकालीन न्याय व्यवस्था

B.A.I Sem.II History Paper II


       संपूर्ण प्रजा अन्यायमुक्त व सुरक्षित बनली पाहिजे. या आज्ञापत्रातील रामचंद्र पंत अमात्य यांच्या लिखाणावरून आपल्या लक्षात येते की, रयतेचा आजार नष्ट करून कल्याणकारी सुराज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करणे हे शिवाजी महाराजांचे धोरण होते. शिवकालीन न्यायव्यवस्था ही अचानक निर्माण झालेली नाही, तर पूर्व-पार सुरू असलेल्या व्यवस्थेतील दोष दुरुस्त करून तिला अधिक समाजाभिमुख, रयतेच्या कल्याणकारी बनवण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला.

       गोतसभा,धर्मसभा,ज्ञातीसभा यातील निर्णय जेव्हा जनतेला अन्यायकारक असतील,एखाद्या व्यक्तीवर अथवा समाजावर अन्याय करणारे असतील तेव्हा त्याविरुद्ध दाद मागण्याची प्रबळ व्यवस्था शिवाजी महाराजांनी निर्माण केली. यासाठी अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश व धर्मविषयक बाबीसाठी पंडितराव या मंत्र्यांची नियमित नेमणूक केली. न्यायविषयक अंतिम अधिकार छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे जरी असले तरी प्रसंगी ते न्यायाधीश,पंडितराव,राज्यसभा, गोतसभा,ज्ञातीसभा यांचा सल्ला घेत व साक्षी-पुरावे वस्तुस्थिती याचा अभ्यास करून निर्णय घेत होते. त्यात आपले-परकेपणा नव्हता. शिक्षा कडक होत्या, कर्नाटक मोहिमेतून विजय प्राप्त होत असतानाच बेलेवाडी च्या सावित्रीबाई वर अन्याय करणाऱ्या आपल्याच नातलग असलेल्या सरदाराला शिवाजी महाराजांनी जबर शिक्षा दिली होती. असाच प्रकार महाराजांना प्रथम पासून साथ देणाऱ्या देशमुखांनी रदबदली करून देखील दोषी असणाऱ्या विरोधकांना साथ करणाऱ्या खंडोजी खोपडे या सरदाराला शिवाजी महाराजांनी हात-पाय तोडण्याची शिक्षा दिली.

       शिवकालीन न्यायव्यवस्था रचना

न्यायाधीश : अर्थमूल (दिवाणी) व दंडमूल (फौजदारी)

                     खटले.

पंडितराव : धर्माविषयक खटले 


राज्य मंडळ : यामध्ये स्वतः छत्रपती,त्यांचे मंत्री,सुभेदार हवालदार,मुजुमदार,सरदेशमुख,देशमुख,देशपांडे, कुलकर्णी,पाटील व ज्या भागातील खटला आहे तेथील शासकीय अधिकारी यांचा समावेश होता. दोन्ही बाजूचे साक्षीपुरावे जाबजबाब नोंदवून त्यावर राज्य मंडळ निर्णय घेई व राजाची राजमान्यता मिळाल्यावर त्याला अंतिम निवाडा मानला जात असे.गोतसभा याला मजलिस असेही म्हटले जाई. 

        गोतसभा किंवा ग्रामसभा   :

खेड्यात निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी ही सभा गावचा पार, चावडी,ग्रामपंचायत, नदीचाकाठ,पाटील/देशमुख यांचे घर इत्यादींपैकी ठिकाणी ही भरत असे.  

पाटील,कुलकर्णी,मिरासदार,बारा बलुतेदार व ज्येष्ठ लोक या सभेत न्यायदानासाठी सदस्य म्हणून हजर असत. 

      कसब्यात असेल तर गोतसभेत व्यापारी शेटे, महाजन यांनाही बोलावले जाई.

      सुभ्याच्या ठिकाणी गोतसभा असेल तर देशमुख देशपांडे देश चौगुला इत्यादीं बरोबरच शेटे महाजन प्रतिष्ठित व्यापारी बोलते दार यांनाही बोलावले जाईल सूर्या तील किंवा परगण्यातील गो सभा सुभेदाराच्या नेतृत्वाखाली असे.

      गोतसभेची न्यायदान प्रक्रिया.....

गावात निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी यातील १.वादी म्हणजे तक्रारदार ज्याला अग्रवादी म्हटले जाई

२. जाबदार म्हणजे प्रतिवादी/पश्चिमवादी म्हटले जाई

      गोतसभेचा प्रमुख (पाटील) वादी प्रतिवादींना पंचांवर आपला विश्वास आहे की नाही हे विचारून घेई. पंचांनी गोतसभेत दिलेला निर्णय दोघांनाही बंधनकारक आहे हे मान्य आहे.असे सांगितल्यावर न्यायदान प्रक्रियेला सुरुवात केली जात असे. दोन्ही पक्षाचे म्हणणे लेखी घेतले जाई त्याला 'तकरीरा'  म्हणत त्यानंतर  त्यांना स्नान करून हातात बेल-भंडारा घेऊन तिथे काढलेल्या दोन रिंगणामध्ये उभे केले जाई. शपथेवर सत्य बोलण्यास सांगण्यात येई. दोन्ही पक्षांना आपल्या बाजूने साक्षी-पुरावे देण्यास सांगण्यात येई. वस्तुस्थिती साक्षीपुरावे यातील सत्या-सत्यते वर सभासद विचारविनिमय करत व आपला निवाडा जाहीर करत. त्याला मजहरपत्र असे म्हटले जाई. त्यावर ग्रामसभा सदस्यांच्या सह्या व निशाणीअसत.

      जर एखादा निर्णय घेणे सदस्यांना अवघड जात असेल तर 'विज्ञानेश्वर' 'मिताक्षरा' इत्यादी ग्रंथांचा आधार घेतला जात असे.

       गोतसभेतील निर्णयानुसार वादी प्रतिवादी कडून काही रक्कम घेतली जात असे. जिंकणाऱ्या कडून 'हारकी' (हारकणेआनंदित होणे) व पराभुताकडून 'गुन्हेगारी' वसूल केली जात असे. 

       काही कागदपत्रात याचा उल्लेख 'शेरणी' असा आहे. विजयी पक्षाकडून शेरणी तर पराभुताकडून 'तिप्पटशेरणी' घेतली जात असे.

         गोतसभेचा निर्णय वादी,प्रतिवादींना बंधनकारक होता तरीही जर आपणास योग्य न्याय मिळाला नाही असे वाटल्यास तो पक्ष व गोतसभेच्या निर्णयाविरोधात कसब्यात,महालात,परगण्यात, न्यायाधीशांकडे व शेवटी खुद्द छत्रपतींकडे दाद मागू शकत असे/अपील करू शकत असे.

                   ज्ञातीसभा....

शिवकाळ व पूर्वकाळात होणाऱ्या भांडण-तंटा बाबत गोतसभा बरोबरच प्रत्येक ज्ञातीची किंवा जातीची एक सभा असे. आपल्या जातीत झालेले वाद-विवाद भांडणतंटे सोडवण्यासाठी त्या-त्या जातीची पंच मंडळी असत. आजही विज्ञान काळातदेखील अशा जात सभा किंवा ज्ञाती सभा भरतात व तेथील निर्णय त्या त्या जातीतील लोकांना बंधनकारक असतात.

                    ब्रह्मसभा किंव्हा धर्मसभा......

दिवाणी स्वरूपाचे खटले गोतसभेसमोर सोडवले जात पण जर धर्मविषयक खटला असेल किंवा लग्न, घटस्फोट,दत्तक,धर्मांतर,प्रायश्चित इ. संबंधीच्या बाबी असतील तर ते धर्मसभेसमोर किंवा ब्रह्मसभेसमोर सोडवले जात. धर्मशास्त्र पारंगत ब्राह्मण यात सभासद असत.   


                 शिवकालीन दिव्य प्रकार  .......

   काही खटल्यांमध्ये पुरेशी कागदपत्र-साक्षीपुरावे, माहिती नसेल तर किंवा काही बाबतीत निर्णयानंतर पराक्रमाची गरज असेल तर अशा वेळी दिव्य करण्याची प्रथा होती. अशा दिव्यांमध्ये यशस्वी होणार याच्या बाजूने न्याय निवाडा केला जात असे.

१). अग्निदिव्य..

                     पंचांसमक्ष वादी व प्रतिवादी यांचे हात स्वच्छ धुऊन कापडी पिशवीने सीलबंद केले जात. हातात तप्त लोखंडी गोळा देऊन मंदिरासमोर रिंगणातून फिरवून तो खाली ठेवण्यास सांगण्यात येत असे. दुसरे दिवशी पंचांसमक्ष कापडी पिशवी काढून पाहिले जाई. जर भाजले असेल,जखम झाली असेल तर न जखम होणार याच्या बाजूने निर्णय दिला जाई. सीतेच्या अग्निदिव्या चा विचार केला तर अग्नीतून चालावयास लावल्याचे उल्लेख आढळतात.

२). रवादिव्य....

                 वरील प्रमाणे वादी प्रतिवादी यांचे हात स्वच्छ धुऊन कापडी पिशवी ने शिलबंद करून कढईत हात घालून उकळत्या तेलातून सोन्याचे नाणे काढण्यास सांगितले जाई. दुसऱ्या दिवशी पिशवी काढल्यानंतर हाताला फोड आले नसतील त्याच्या बाजूने निर्णय दिला जाई. ज्याच्या हाताला फोड आले त्याला रवा लागला असे म्हटले जाई. 

३). धारादिव्य.....                   

                   इनाम, देशमुखी इ. बाबतच्या खटल्यात पराक्रमाची गरज होती. अशा प्रकारच्या तंट्यांमध्ये शत्रूच्या ताब्यातील एखादा किल्ला किंवा प्रदेश जिंकून आणण्यास सांगितले जात असे,अथवा वाघ,सिंह,हत्ती इ.प्राण्याची शिकार म्हणजेच पराक्रमी कृत्य करण्यास सांगितले जात असे त्यात तो यशस्वी झाला तर त्याला निर्दोष मानले जाई त्याच्या बाजूने निर्णय दिला जात असे.  

४). दिवादिव्य...

                 वादी प्रतिवादी च्या बाजूने एक-एक दिवा मंदिरात लावला जाई. ज्याचा दिवा लवकर विझेल तो दोषी ज्याचा दिवा दीर्घकाळ राहील तो निर्दोष व त्याच्या बाजूने निकाल दिला जाई.  

                 याशिवायही अन्य काही दिव्य उपप्रकार होते.

 जलदिव्य .... एखाद्या खोल विहिरीत किंवा डोहात एखादी छोटी वस्तू टाकून पण समोर ती दोन्ही पक्षांना शोधून काढण्यास सांगितले जाई. शोधून काढणार यांच्या बाजूने निर्णय दिला जाई. 

 धन्यदिव्य... एकच धान्याचे काळे-पांढरे असे दोन प्रकार पिठात मळून पाण्यात टाकतात व शोधून काढावयास सांगत ज्याची रंगसंगती बरोबर येईल त्याच्या बाजूने निर्णय दिला जाई. इ. इ. इ.


     शिवकालीन न्यायदान पद्धतीची वैशिष्ट्ये...

१).न्यायदानाचा अंतीम अधिकार छत्रपतींकडे होता.

२). कोणत्याच धर्मियांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जात होती.

३). पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी दक्षता घेतली जात होती.

४). जात,धर्म,पंथ,गरीबी, श्रीमंती यांचा विचार न करता नि:पक्षपाती न्यायदान व्हावे असा कटाक्ष छत्रपतींचा होता.

५). स्थानिक गोतसभेला महत्त्वाचे स्थान होते.

६). निकाल म्हणजे मजहरपत्र लेखी असावे यासाठी सक्ती होती.

७). देवाची शपथ व दिव्य पद्धत यामुळे उचित न्यायदान होत  होते. 

८). न्यायदानासाठी जहागीरदार,इनामदार,वतनदार यांची नेमणूक केली जात नव्हती. वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात होती. त्यामुळे ते शासनास जबाबदार होते आणि नि:पक्ष न्यायदान करणे हे त्यांच्यावर बंधनकारक होते.

९). गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा दिली जात नसे.

१०). शिक्षा कठोर होत्या कारण गुन्हेगारी वाढू नये हेतू होता.

११). न्यायव्यवस्था स्वतंत्र होती.आवश्यकते शिवाय गोतसभेचे निर्णय छत्रपती सुद्धा बदलत नसत.


         शिवकालीन गुन्हे व शिक्षांचे स्वरूप...

   

चोरी,लूट,लाच-लुचपत,भ्रष्टाचार,बदनामी करणे,खोटे पुरावे-साक्षी देणे,बनावट कागदपत्रे तयार करणे, इतरांना फसविणे, व्यभिचारआणि अनैतिक वर्तन, पैशाचा अपहार, मालकीहक्क,जमिनीचा हक्क,वतनाचे हक्क, देवस्थान हक्क, राजद्रोह इ. गुन्हे दिसून येतात.

   शिक्षक कडक स्वरूपाच्या होत्या. बहिष्कार टाकणे, गावातून हाकलून लावणे,वतन जप्त करणे,दंड करणे, तुरुंगात टाकणे, हातपाय तोडणे,डोळे काढणे इ.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...