Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती (भाग २)

Monday, 21 June 2021

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती (भाग २)

 (Dhere V. D.)

B.A.II. History Paper IV

 महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती (भाग २)

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्ती कोयना भूकंप (१९६७)आणि लातूर भूकंप (१९९३)

भूकंप ....भूकंप निसर्गनिर्मित आपत्ती आहे. पृथ्वीच्या कवचात धक्के बसल्याने भूकंप घडून येत असतात. याचा अभ्यास करण्यासाठी भूकंप मापक यंत्र ही सध्या तयार केली गेलेली आहेत. जगभरात दरवर्षी 30,000 भूकंप होतात यातील बरेचसे भूकंप सागर तळाशी आणि दुर्गम भागात होत असल्याने आपणास कल्पना येत नाही तेवढा जास्त असणारे भूकंप व आपणास समजतात.

व्याख्या.."पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्या इतक्या बसलेल्या त्याला भूकंप म्हणतात".

डब्ल्यू जी मूर "नैसर्गिक कारणाने भूपृष्ठाखाली निर्माण झालेल्या हालचालींमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात त्यास भूकंप असे म्हणतात".

       पृथ्वीचे बाह्य स्वरूप एकसंघ नसून ते सुमारे ३० दृढ व कठीण भागांचे बनलेले आहे त्याला भूपट्ट म्हणतात. प्रत्येक भूपट्ट हा पृथ्वीचे कवच आणि कवचाखाली उष्ण खडक (प्रावरण)यांचा बनलेला असतो. कवच आणि प्रावरण यांच्या थराला शिलावरण म्हणतात. भूपट्ट दुर्बलावरनावर म्हणजे प्रावरणातील शीलावरणाच्या खाली उष्ण व मृदू खडकांना जो भाग असतो त्यावर तरंगतात /सरकतात. ही हालचाल अडकने- निसटणे धक्के खात सरकणेअशी होत असते. स्टेटस काही वेळा भूपट्टचे खडक एकमेकात असे अडकतात की हलू शकत नाहीत. अशा वेळी दोन्ही बाजूंच्या खडकांमध्ये ताण वाढत जातो आणि तुटतात आणि ते पुढे -मागे किंवा वर- खाली सरकत जातात त्यामुळे भूकंप घडून येतात.

           भूकंपाची स्थान व त्याची तीव्रता या बाबी भूकंपलेखाद्वारे निश्चित केल्या जातात. भूकंप मापकाद्वारे भूकंप तरंगांची भूमीवरील हालचाल शोधली जाते. भूवैज्ञानिक   'चार्ल्स  रिश्टर' यांनी 1935 मध्ये भूकंपाची तीव्रता ठरवणारे मापक यंत्र तयार केले. त्यामुळे या मापन पद्धती ला रिश्टर प्रमाण (रिश्टर स्केल) असे म्हणतात. या पद्धतीत भूकंपाची तीव्रता मॅग्न (मॅग्नेटयूड) केवळ एका अंगाने वाढली तर भूकंपामुळे मुक्त झालेली ऊर्जा 32 पट वाढली असे मानतात. ७ किंवा अधिक रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या इमारती देखील जमीनदोस्त होऊ शकतात.

              आजवरचा सर्वात मोठा भूकंप 1960 मध्ये चिली देशात घडून आला. त्याची तीव्रता 9.5 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. सेक्स 20 11 मध्ये जपानमधील फुकुशिमा या शहरात झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.1 होती. 2001 मध्ये गुजरात मधील भुर्ज येथे झालेल्या भूकंपाची नोंद 7.7 रिश्‍टर स्केल इतकी होती. यात आर्थिक नुकसान बरोबरच २०,००० लोक मृत्युमुखी पडले होते. 26 डिसेंबर 2004 रोजी इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील भूकंप 9.1 रिश्‍टर स्केलचा होता यामुळे सुनामी ची लाट भारतात आली. कोयनेच्या पट्ट्यात सतत भूकंप होत असतात. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात कराड येथे भूकंप संशोधन केंद्र उभारले आहे.

              भूकंपाची कारणे....

       १). भूपृष्ठीय कारणे (Surface Causes)     पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठमोठे पर्वत आहेत ऊन वारा पाऊस व निसर्गातील बदलांमुळे त्यांची झीज होते. त्यामुळे पर्वताच्या कडील भाग कमजोर होतो कडे कोसळून खाली जाऊन कोसळतात. अशावेळी भूकंप होतात.  

       २). पातलीय कारणे...

   पृथ्वीच्या खोल भागातील होणारे भूकंप यांना पातलीयभूकंप असे म्हणतात. भूपृष्ठापासून तीनशे किलोमीटर खोलीवर विविध बदल होतात खडकांमधील खनिज पदार्थांचे भूगर्भात असलेल्या रासायनिक द्रवव्यामुळे स्पटीकिकरण होते यामुळेही भूकंप होतात.

        ३). जलाशयाचा भार..

   महाराष्ट्रात व जगभर जी मोठी मोठी धरणे बांधली गेली त्या कृत्रिम जलाशयातील पाण्याचा भार पडून भूकंप तयार होतात.

       ४). निवर्तनिक करणे ..

     रस्तावरील विविध प्रकारच्या खडकांचे अंतर्गत बल व दाब घडल्यामुळे हालचाली होतात व भूपृष्ठाला मोठे आघात होतात यातून भूकंप तयार होत असतो.

     ५). ज्वालामुखीय कारणे..  

पृथ्वीच्या पोटातील लाव्हारस वेगाने भूपृष्ठावर येतो ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यामुळे जमिनीला हादरे बसतात व त्या प्रदेशांमध्ये भूकंप होत असतो. 

    ६). भुगर्भाच्या घड्यांच्या हालचाली...

गुगल बाबा ची रचना वेगळे स्थळांचे आहे काही खडकांचे थर यात वरचे दोन खालचे वेगळे तळाचे वेगळे असे आहेत. या खडकांना घड्यांना स्वतःची अशी गती आहे . या गतीतून भूगर्भात प्रचंड शक्ती निर्माण होते व भूपृष्ठाला हादरे बसतात याला आपण भूकंप म्हणतो.


               कोयना भूकंप (११ डिसेंबर १९६७)

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर आलेली ही सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती होती 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4 वाजून 21 मिनिटांनी कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचा मोठा धक्का बसला. 7.5 रिश्टर स्केल चा हा धक्का होता. एकापाठोपाठ एक असे दोन धक्के यावेळी बसले. 1963 पासून 2020 पर्यंत कोयना धरण परिसरात अंदाजे 1 लाख 21 हजार भूकंपाची नोंद झाली आहे. यात कमी तीव्रतेचे 1 लाख 19 हजार 197 भूकंपाची नोंद आहे. ३ते ४ रिश्टर स्केल चे 5 भूकंप झाले जे सर्वसामान्यपणे जाणवले. 

                कोयना भूकंपाची आपत्ती...

  १). जीवित व वित्तहानी.   कोयना नदीवर बांधलेल्या शिवसागर जलाशयात पाणी वाढल्याने हा 7.5 रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला या भूकंपाचा गडगडाट ध्वनी व हादरे  जवळपास 46 सेकंद जाणवले. भूकंपामुळे 190 लोकांचा बळी गेला हजारो लोक जखमी झाले/ जायबंदी झाली तर हजारोंच्या संख्येने संसार उद्ध्वस्त झाले.

  २). कोयनेच्या वैभव व विकासावर परिणाम.. एम कंपनी लोकांच्या मनावर भीतीचे साम्राज्य उभे राहिले. सततच्या भूकंपामुळे हा परिसर भूकंपप्रणव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे येथे विकास कामांना खीळ बसली.

  ३). कोयना परिसराची वाताहत.. महाराष्ट्र अनेक लोकांनी या भूकंपानंतर कोयनानगर सोडण्याचा निर्णय घेतला कराड-चिपळूण उद्योग उभे राहिले मात्र कोयनानगर भूकंपाच्या भीतीने माणसेही वसाहत करण्यास तयार नाहीत.

     भूकंपानंतरच्या तातडीच्या उपाययोजना...

भूकंपाचे परिणाम म्हणून धरणाला जे बारीक तडे गेले होते ते बंदिस्त करण्यात आले. पोलादाच्या तारांनी धरणाचा संपूर्ण परिसर प्रतिबलित करून शीवल्यासारखा एकसंघ करण्यात आला. प्राथमिक स्तरीकरण केले नंतरच्या काळात जोड स्तंभ बांधून संपूर्ण धरण मजबूत करण्यात आले.  महाराष्ट्रातील इतर जलाशयांची पाहणी करून तेथेही मजबुतीकरण करण्यात आले.

    लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे भूकंपग्रस्तांसाठीचे कार्य .. ... या परिसरातीलच पाटणचे असलेले आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सर्वप्रथम धाव घेतली आणि दृढनिश्चयाने येथील जिवंत साडेतीन लाख लोकांच्या जीवनाच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवल्या खेरीज येथून हलणार नाही अशी प्रतिज्ञा केली. सेक्सी जखमींना कराड सातारा कोल्हापूर येथील दवाखान्यात हलवले. तिचे ढिगारे उपसून त्या खालून शक्य तितक्या जिवंत लोकांना बाहेर काढण्याचे काम केले. या आपदग्रस्तांना अन्न आणि निवारा जागेवरच मिळेल याची व्यवस्था केली. बाहेरून वैद्यकीय मदत तसेच अन्नधान्याची मदत अपदाग्रस्तांना पर्यंत पोहोचवण्यासाठी ते स्वतः दोन महिने कोयनानगरला तळ ठोकून होते.नवीन घरासाठी लागणारे वासे, बांबूची तट्टे, पत्रा, कपडे, भांडी, अंथरूण-पांघरूण, जेवण, अन्नधान्य, वैद्यकीय साहित्याची मदत इत्यादी वाहने शक्य तितक्या लवकर अपघातग्रस्तां पर्यंत पोहोचवली. जनतेकडून, शासनाकडून इतकेच नाही तर लष्कराकडूनही मदत मिळवून अपघातग्रस्तांच्या जीवन सुखकर करण्याचा त्याने प्रयत्न केला. अशा रीतीने 70 हजार घरे पुन्हा उभी करण्यात आली.


          लातूर भूकंप (३० सप्टेबर १९९३)

कोयना भूकंपानंतर महाराष्ट्रावर मोठा आघात करणारा लातूरचा भूकंप होता. या भूकंपात पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. लातूर येथील भूकंपमापन यंत्र वर 3.1 रिश्‍टर स्केल चे धक्के नोंदवले गेले होते. एक तीव्र भूकंप पूर्वी 1962 84 आणि 1992- 93 मध्ये 124 भूकंपाच्या धक्क्याची नोंद या परिसरात होती. किल्लारी या छोट्या गावात केंद्रबिंदू असलेला हा भूकंप 6.5 रिश्टर स्केलचा होता.  कोयना पेक्षा हा भूकंप तुलनेने जरी लहान असला तरी या भूकंपाने आठ ते दहा हजार लोकांचा बळी गेला. 

  ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३.५६ मिनिटांनी भूकंप झाला. खिल्लार जातीच्या पहिला साठी प्रसिद्ध असलेले हे किल्लारी गाव. या भूकंपाची बातमी जगभरात गेली बीबीसी नियर टाइम पासून इतर वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी भयानक विध्वंसाची छायाचित्रे छापली. ज्यामुळे येथे जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. अमेरिका, इंग्लंड, जपान, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅंड इत्यादी देशांनी औषधे, तंबू, ब्लांकेट्स, खाद्यपदार्थ पाठवले, जागतिक बँक पुनर्वसनात सहभागी झाली, भारतातील सर्व शहरानी, असंख्य तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली. कोयनेच्या भूकंपात शासनाने फक्त मदत केली होती. आता पुनर्वसन कार्यात सर्व लोक सहभागी झाले होते. किल्ला, गुवाळ, गांजनखेडा, नाम नंदुगी, बानेगाव- तळणी, हरेगाव, दापेगाव, टाकळी, सारवाडी इत्यादी गावांना भूकंपाचा मोठा तडाखा बसला. काही गावांमध्ये तोफे सारखे आवाज जमिनीतून आले तर काही गावात मोठमोठे खड्डे पडले. 

  जीवित व वित्तहानी...... लातूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांना या भूकंपाची जवळ बसली 30 सप्टेंबर च्या मध्यरात्री 03:56 नंतरच्या पहिल्या धक्क्यानंतर पहाटे 04:41 सकाळी 6.24 व सकाळी 7.48 असे आणखी तीन धक्के बसले. यातील पहिले दोन धक्के मोठे होते. त्यामुळे झोपेतच हजारो लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले व मरण पावले.

          या परिसरात प्रामुख्याने माळवदाची घरे होती. मोठ मोठे दगड एकमेकांवर रचून मधे माती घालून घरांचे बांधकाम केले होते. छप्परही दगड मातीचे होते. भूकंपाचा जोराचा धक्का बसल्यामुळे भिंती व छप्पर कोसळले व त्याखाली लोक गाडले गेले अनेक जायबंदी झाली किल्लारी तील जवळपास 90 टक्के घरे ही भुईसपाट झाली. गणेश विसर्जन करून आलेले 34 लोक जिल्हा बँकेच्या इमारतीखाली झोपले होते ते सर्वजण गाडले गेले व मरण पावले.

          किल्लारीचा भूकंपापेक्षा कोयनेचा भूकंप ३० पट अधिक तीव्रतेचा होता. पण कोयनेत 190 लोकांचा बळी गेला तर किल्लारी भूकंपात दहा हजारापेक्षा अधिक लोक मरण पावले, प्रचंड आर्थिक स्वरूपाचे नुकसान झाले, तीस हजार पेक्षा अधिक लोक जखमी झाले एक लाख घरांचे नुकसान झाले.

          भूकंपाची माहिती मिळताच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व महसूल मंत्री विलासराव देशमुख स्वतः किल्लारीला पोहोचले. सर्व शासकीय यंत्रणा सुसज्ज केली. त्याच्या जोडीला लष्कराचे जवान मदत कार्यात उतरवले, घराच्या ढीगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, मृतदेह बाहेर काढणे, जखमी लोकांना रुग्णालयात पोहोचवणे, लोकांना राहण्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणे, त्यांच्या जेवणाखाण्याची सोय करणे, ही कामे या यंत्रणेने तातडीने केली. यात स्वयंसेवी संस्थानाही सहभाग घेण्याची संधी दिली. भूकंपरोधक घरे नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे लक्षात घेऊन लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील पन्नास गावांचे ठेकेदार नेमून भूकंपरोधक घरे बांधून बांधण्याचे काम सुरू केले. लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी संतोष प्रधान यांनी झपाटून जाऊन पंधरा -पंधरा वीस-वीस तास पुनर्वसनाचे कार्य केले. देश-विदेशातून लातूरमध्ये मदतीचा ओघ आला. त्याचे योग्य वाटप केले गैरव्यवहार होणार नाही याकडे लक्ष दिले. लातूर उमरगा तालुक्यातील 50 गावांचे स्थलांतर केले 55 हजार लोकांना तयार घरे देण्यात आली. 2 लाख 50 हजार घरांची दुरुस्ती केली गेली. लोकसहभाग व श्री महिला गृह उद्योग, हिंदुस्तान पेट्रोलियम, टाटा हाऊसिंग, रामकृष्ण मिशन, जनकल्याण, टाइम्स ऑफ इंडिया, मल्याळम मनोरमा, रोटरी इंटरनॅशनल, शिवसेना, महाराष्ट्र काँग्रेस, आंध्र प्रदेश सरकार, केरळ हाऊसिंग बोर्ड इत्यादी संस्थांनी लातूर उमरगा जिल्ह्यातील 39 गावे घरे बांधून दिली.  भूकंपग्रस्त गावातील १२०० मुलांना पुढील शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने आधार दिला. अनेक स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी संघटना यांनी ही महत्त्वपूर्ण योगदान दिले.


           भूकंपाचे परिणाम....

   भूकंप आपत्ती अचानक येते त्याचा प्रभाव काही सेकंद असतो. पण त्याने प्रचंड जीवित व वित्तहानी होते. मानवा बरोबरच सर्व प्राणिमात्राला याची झळ पोहोचते. इमारती, झाडे पडतात, खड्डे पडतात, जमिनीतून आवाज येतात, समुद्रातून मोठमोठ्या लाटा उसळतात, पृथ्वीच्या कवचात कंपने निर्माण होतात भूकंपाचे परिणाम आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील.   

   १). भूपृष्ठावर चे दोन स्थळ एकमेकांवर आदळणे व भेगा पडणे..... भूकंपामुळे भूपृष्ठावर चे दोन स्तर परस्परांवर आदळतात तीवर भूकंपात जमीन वेगाने आदळते तिच्यावरील सुट्ट्या वस्तू इतरत्र सरकतात जन्मलेला व जमीनीवरील बांधकामांना भेगा पडतात भूपृष्ठाच्या रचनेत बदल घडून येतो.

   २). विजेच्या तारा, रुळ, इमारती, रस्ते, पूल यांची हानी...... पाण्याचे नळ, भूमिगत दूरध्वनी, विजेच्या तारा, इंधन- वायूचे मार्ग, हे वेडेवाकडे होतात, रस्ते उखडतात पडतात, पूल कोसळतात, इमारतींची पडझड होते, डोंगराच्या उतारावर कडे कोसळतात.

   ३). भूजल पातळीत मोठे फेरबदल होतात.... भूपृष्ठाचे स्तर सरकल्याने दरडी कोसळणे, भू पृष्ठाला भेगा पडणे या क्रिया घडतात. त्यामुळे भूजल पातळीत मोठे फेरबदल होतात. विहिरीचे पाणी गढूळ होते, काही विहिरीतला आटतात तर काही तुंबतात अनेक पाण्याचे झरे नष्ट होतात तर नवीन निर्माण होतात.  

   ४). जमिनीच्या उदरात मनुष्य/ प्राणी गडप होतात....

काहीवेळा भूकंपामुळे मोठ्या भेगा पडतात जमिनीला खड्डे पडतात या भागांमध्ये अनेक लोक पशू-प्राणी गडप होतात .

५). त्सुनामी लाटांची निर्मिती ... समुद्राच्या तळाला अथवा किनार्‍यालगत भूकंप घडून आला तर समुद्रात खूप मोठ्या लाटा निर्माण होतात अशाप्रकारे भूकंपाचा ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या लाटांना त्सुनामी लाटा असे म्हणतात. त्सुनामी लाटा हजारो किलोमीटर अंतरावर गेल्या तरी त्यांची शक्ती कमी होत नाही किनाऱ्यावरील हजारो जीवन प्राणी त्या नष्ट करतात.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...