Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: नियोजन व त्याचे प्रकार

Wednesday, 30 June 2021

नियोजन व त्याचे प्रकार

 िषय-व्यवस्थापनाची तत्त्वे आणि उपयोगिता

बी-काॅम 1 सेम II

उपघटक-नियोजन व त्याचे प्रकार

नियोजन व्याख्या-

                           भावी प्रक्रिया व भविष्यात तिची अंमलबजावणी करण्याची योजना म्हणजे नियोजन होय.


नियोजन प्रकार-

1-उत्पादन नियोजन-  उत्पादन नियोजनात उत्पादनाची संख्या, दर्जा, खर्च, मालाची उपलब्धता यासंधी नियोजन केले जाते. नियोजन ही व्यवसाची मुलभूत प्रक्रीया आहे.


2- वित्त नियोजन-  व्यवसायाच्या सर्व क्रिया साठी पैशाची गरज असते. भांडवल उभारणी व इतर गुंतवणूक साठी वित्त नियोजन गरजेचे आहे. वित्त नियोजनानुसार वित्ताची उपलब्धता होणे गरजेचे आहे.


3- विपणन नियोजन- विपणन हा व्यवसायाला उत्त्पन मिळवून देणारा प्रमुख मार्ग आहे.विक्री वाढ व ग्राहकाच्या गरजांचे समाधान करणे यासाठी विपणन नियोजन गरजेचे आहे. 


4- अल्पकालीन नियोजन-  अल्प काळासाठी केलेल्या नियोजनाला अल्पकालीन नियोजन म्हणतात.हे नियोजन एकवर्षा पर्यंत असते.तसेच हे नियोजन यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. 


5- दीर्घ कालीन नियोजन-  ही नियोजन प्रक्रिया एकवर्षा पेक्षा अधिक चालते.या नियोजनात उद्दिष्टे व धोरणांचा समावेश असतो.तसेच या नियोजनात तज्ञ व्यक्तींची गरज असते. मोठी दूरदृष्टी ठेवून हे नियोजन करावे लागते. 


6 - प्रशासकीय नियोजन- हे नियोजन दीर्घ कालीन नियोजन असते. उच्च व्यवस्थापन हे नियोजन करावे लागते व त्यामध्ये प्रशासनाला व्यवसायाच्या सर्व विभागांना समाविष्ट करून घ्यावे लागते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...