Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: सविनय कायदेभंग चळवळी चे महत्व

Wednesday, 30 June 2021

सविनय कायदेभंग चळवळी चे महत्व

(S R  Sawant)

 BA-- 2 ---  इतिहास -- पेपर नं-- 6- 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ---2 

सविनय कायदेभंग चळवळी चे महत्व-- 

भारताच्या  इतिहासात सविनय कायदेभंग चळवळी ला फार मोठे महत्त्व आहे. देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात अहिंसात्मक लढ्यामुळे मोठ्या राज्यसंस्थेला जेरीस आणू शकतो. हेया चळवळीने दाखवून  दिले .आणि हे उदाहरन म्हणजे भारतातील सविनय  कायदे भंग चळवळ  होय. या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई गिरणी मालक कारखानदारांनी या चळवळीला सढळ हाताने मदत केली. त्याचबरोबर या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. सर्वसामान्य माणसे यामध्ये सामील झाली होती.सरोजिनी नायडू यांनी  गांधीच्या अटकेनंतर चळवळी चे नेतृत्व केले होते कमलादेवी चट्टोपाध्याय कमला नेहरू चेतना कृपलानी आणि नागा लोकांची राणी गौदिन लीवू या महिलांचा वाटा फार मोठा होता. 

याचबरोबर या चळवळीमध्ये सरहद्द  प्रांतातील पठाण लोकांनी या चळवळीचा मनःपूर्वक स्वीकार केला होता. खान अब्दुल गफार खान आणि त्यांची खुदाई खिदमतगार ही संघटना या चळवळीत सक्रिय झाली होती.या चळवळीचे वैशिष्ट्य  असे की शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.चळवळीने विशाल रूप प्राप्त केले होते. याच दरम्यान भारतीयांना कोणत्या सुधारणा द्यावे याच्यासाठी नोव्हेबंर 1930  पहिली गोलमेज परिषद भरली. या गोलमेज परिषदेमध्ये काही सामज्यस्य करार झाले5 मार्च 1931 ला झाला याला गांधी-आयर्विन करार म्हणतात.मात्र पूढे हा करार ब्रिटिशांनी पाळला नाही.पुन्हा  दुसरी गोलमेज परिषद घेण्यात आली या दुसरी गोलमेज परिषदेमध्ये हिंदुस्तानी मंडळींच्या मागण्या मान्य केल्या नाहीत.परिणामी सरकारविरुद्ध रोष वाढला. त्या मुळे चळवळीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. आणि कायदेभंग चळवळीच्या दुसरे पर्व म्हणजेच नव्या सरकारने गांधी-आयर्विन करार माघार घेऊन  

त्यामुळे मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू केले  जनतेवर गोळीबार लाटीमार सुरु केला. अशातच हिंदू-अस्पृस्य यांच्यामध्ये फूट पडू नये म्हणून गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या 25 सप्टेंबर 1932 ला पूणे करार झाला . नंतर 1932 ला लंडनमध्ये तिसरी गोलमेज परीषदेत देखील हिंदी लोकांच्या हिताकडे गंभीरपणे बघितले नाही .आणि ही परिषद औपचारिक ठरली. साहजिकच या यावेळी पुणे करार केला यामध्ये इंग्रजांची कुटील नीती त्यांनी ओळखली होती. त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळीकडे दुलृक्ष करून सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले. आणि त्यांनी हरिजन संघ स्थापन करून अस्पृश्यता निवारणाच्या कामाला प्राधान्य दिले .

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...