Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: लोकमान्य टिळक व स्वदेशी, चळवळ

Monday, 21 June 2021

लोकमान्य टिळक व स्वदेशी, चळवळ

 बीए भाग ---  2--- इतिहास पेपर नंबर-- 6  

लोकमान्य टिळक व स्वदेशी, चळवळ

 राष्ट्रसभेच्या पहिल्या कालखंडात मवाळवादी वर्चस्व मुळे. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांना आपले चतुर धोरण राबवता आले नाही. तरीही अन्या मार्ग आणि पर्याय या माध्यमातून आपले जहालवादी धोरण जनतेपर्यंत पोहोचविण्याचे धोरण टिळकांनी आखले.हे धोरण म्हणजे स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण व स्वातंत्र्य यामध्ये. स्वदेशी आणि बहिष्कार हे दोन मार्ग असे होते .त्यामध्ये स्वदेशी म्हणजे भारतीय लोकांनी आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करावा, म्हणजेच स्वदेशी उद्योगांना चालना मिळून भारतीय उद्योग मोठ्या प्रमाणात चालतील त्यामुळे बेकारीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटण्यास मदत होईल तसेच लोकांच्याकडे  पैसेदेखील येतील परिणामी लोकांना मदत होण्यास मदत होईल. आणि या माध्यमातून आपण विलायती कपड्यावर एक मार्गे बहिष्कार टाकू शकू. हा टिळकांना आत्मविश्वास होता.  म्हणून त्यांनी व्यापक दृष्टीने स्वदेशीचा आग्रह धरला एक राजकीय चळवळ म्हणून त्यांनी स्वदेशी कडे पाहिले. यातून स्वराज्य मिळवणे हेच ध्येय अंतिम ठरले,

 खेड्यातील शेतकऱ्यांना हाताशी धरून, अन्यायाविरुद्ध कायदेशीर प्रतिकार चळवळ चालवली. टिळकांनी यामध्ये सहभागी होऊन सरकार विरोधात प्रतिकारासाठी ग्रामीण आणि शहरी शहरी भागातील लोकांचे संघटन करण्यास सुरुवात केली. यावेळी सरकारने तलम कापड या ला जकात दर कमी केला आणि गरीब लोक जे जाडेभरडे कापड कापड वापरत होते.. त्याच्यावर साडेतीन टक्के नवीन कर बसवला. त्यामुळे  श्रीमंता वरील कराचे ओझे गरिबावर बसवले गेले. तेव्हा टिळकांनी संघटितपणे सरकारच्या या धोरणाला लोकांनी विरोध करावा, त्याच बरोबर लोकांनी देशी कापड वापरावयास सुरुवात करावी. मुंबईच्या सभेत सेट वसंत जी खिमजी यांनी अशीच सूचना केली . ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सभा घेऊन , देशी कापड वापरण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की  देशी कापडाचे अनुकरण सर्व लोक करू लागले. त्याच बरोबर लोकांची संघटित शक्ती तयार होऊ लागली . परिणामी टिळकांनी स्वदेशीचे  महत्व लोकांना सांगण्यात ते यशस्वी झाले . यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन स्वदेशीच्या  महत्त्व लोकांच्यात पसरू लागले.

यावेळी राष्ट्र राष्ट्रसभेचे एक नेते दिनेश वाच्छां यांनी टिळकांच्या स्वदेशी बहिष्कार चळवळी व अनेक आक्षेप घेतले ही चळवळ म्हणजे लांब पल्ल्याची असून त्याला यश येणे अशक्य आहे. असे म्हटले असे असले तरी लोक मान्य यांनी  स्वदेशी चळवळीचे महत्व सर्वांना पटवून सांगितले. या चळवळीमुळे देशी उत्पादनात वाढ झाली लोक स्वदेशीचा स्वीकार करू लागले. परिणामी भारतीय लोकांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली . 

 सर्वांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करायचा. स्वदेशी मालाच्या वापरास प्रोत्साहन द्यायचे असे चळवळीचे स्वरूप होते. या चळवळीला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. स्वदेशात बनवलेली कापड वापरावयास अनेकांनी सुरुवात केली. बरोबर परदेशी मालावर बहिष्कार टाकून त्या वस्तूंचा जागोजागी एका ठिकाणी घेऊन त्याची होळी करण्यात येऊ लागली. यामुळे खाद्य वस्तू तयार करणाऱ्या व्यवसायिकांनी विलायती साखर न वापरण्याची प्रतिज्ञा केली लोकांनी विलायची कपडे धुने बंद केली. महिलांनी बांगड्या व काचेच्या वस्तू वापरणे बंद केले. विद्यार्थ्यांनी विलायती कागद न वापरण्याचे ठरवले. व्यापार्‍यानी परदेशी कापडाचा व्यवसाय बंद केला या वेळेला सरकारने या मंडळीला मोठ्या प्रमाणात त्रास दिला असे असले तरी लोकांनी कशी चळवळीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवून आपले स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दाखवून दिले . रवींद्रनाथ टागोर यांनी  स्वदेशी वस्तू भांडार सुरू केले . टाटा कंपनी ला लोकांनी आर्थिक मदत केली भांडवलदारांनी बँका विमा कंपन्या काढल्या. देशी लोकांनी वाहतूक व्यवसाय सुरू केले. यातूनच साहित्य निर्मितीला चालना मिळाली. अनेक लेखक कवी यातून निर्माण झाले एकंदरीत टिळकांनी  नी  सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीचा परिणाम.भारतीय स्वातंत्र्य चळवळी वर मोठ्या म् प्रमाणात झाला.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...