Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: आधारसामग्रीचे वर्गीकरण. (Classification of Data)

Sunday, 27 June 2021

आधारसामग्रीचे वर्गीकरण. (Classification of Data)

 

(J. D. Ingawale)

बी.. 3      सेमी. 6.      पेपर 13:  अर्थशास्त्रातील संशोधन पध्दतीशास्र 

आधारसामग्रीचे वर्गीकरण. (Classification of Data)

प्रास्ताविक

संशोधकाने विशिष्ट हेतूने अभ्यासविषयासंबंधी भरपूर माहिती जमा केलेली असते. शिरगणती, सर्वेक्षण, मुलाखत, प्रश्नावली इत्यादी पद्धतीने प्राथमिक सामग्री (वस्तुनिष्ठ माहिती) अथवा ग्रंथ, मासिके, बखरी यांद्वारे दुय्यम सामग्री जमा केलेली असते. आकाराने प्रचंड विस्कळीत स्वरूपात जमा केलेल्या सामग्रीचा संशोधन कार्यासाठी वापर करण्यापूर्वी तिच्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे सामग्रीला लघुरूप देण्याच्या पद्धतीला 'सांकेतीकरण' असे म्हणतात. माहिती हाताळणे सोपे जावे म्हणून निवेदकाने दिलेल्या उत्तरांना अक्षरांच्या चिन्हांच्या अथवा आकड्यांच्या साहाय्याने लघुरूप दिले जाते. उदा. एखाद्या प्रश्नाच्या होकारार्थी उत्तराला (वाय) हे चिन्ह देणे तर नकारार्थी उत्तराला N (एन) हे चिन्ह देणे. तिसऱ्या पर्यायाला o () हे चिन्ह दिले असेल तर त्यावरून सामग्री संक्षिप्त होते.

सांकेतीकरणानंतरचा टप्पा म्हणजे सामग्रीचे वर्गीकरण करणे होय. जमा केलेली माहिती निरनिराळ्या गटांत विभागणे म्हणजे वर्गीकरण होय.

वर्गीकरण म्हणजे काय ?

      माहिती वेगवेगळ्या गटांत विभागणे म्हणजे वर्गीकरण होय. नेहमीच्या व्यवहारात आपण असे वर्गीकरण करीत असतो. उदा. हा मित्र आहे, हा शत्रू आहे, भाज्यांमध्ये फळभाज्या, पालेभाज्या इत्यादी. 'जमा केलेल्या माहितीवरून साम्य भेद लक्षात घेऊन ठरावीक हेतूने पदार्थांचे वेगवेगळे गट पाडणे म्हणजे वर्गीकरण होय.' उदा. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यार्थिनींची संख्या, ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थी, गरीब श्रीमंत विद्यार्थी, काळा-गोरा, स्थिर खर्च बदलता खर्च, इत्यादी हेतुनिहाय जमा केलेली सामग्री काही निष्कर्ष काढण्यासाठी उपयोगी पडावी म्हणून तथ्यांचे वर्गीकरण केले जाते. सामग्रीचे समीकरण करण्यासाठी अभ्यासाच्या निष्कर्षात जाण्यासाठी वर्गीकरण ही महत्त्वाची पायरी होय. अभ्यासाचे उद्दिष्ट व्याप्तीनुसार विशिष्ट गटात तथ्यांची अशा रीतीने विभागणी केली जाते की, ज्यायोगे समस्येची उकल होण्यास मदत होते. वर्गीकरणाच्या व्याख्या

     कोन्नोर (Connor) यांच्या मते, "वस्तूंच्या सादृश्यानुसार किंवा विशिष्ट गुणधर्माच्या समानतेनुसार त्यांची निरनिराळ्या वर्गांत अथवा गटांत मांडणी करण्याच्या क्रियेला वर्गीकरण असे म्हणतात.

एलशन्स यांच्या मते, "सादृश अथवा समानतेनुसार सामग्री विविध गटांत अथवा व्यवस्थित करण्याची तांत्रिक प्रक्रिया म्हणजे वर्गीकरण होय "

वर्गीकरणाची वैशिष्ट्ये/लक्षणे

. वर्गीकरण कोणत्याही माहितीचे/सामग्रीचे होऊ शकते : वर्गीकरण हे केवळ वस्तूंचे किंवा माहितीचे होते असे नसून ते मानसिक अवस्थांचेही करता येते. उदा. रागीट, शांत, लोभी, चिक्कू, उधळ्या, दुःखी, आनंदी असे गट पाडता येतात. तसेच वस्तूच्या गुणधर्मांचे वर्गीकरण करता येते. उदा. आंबट, कडू, गोड, तुरट, तिखट इत्यादी. कलेनुसार चित्रकला, हस्तकला, नृत्यकला इत्यादी.

. वर्गीकरण करताना साम्याचे भेदाचे मुद्दे विचारात घ्यावे लागतात : जगातील कोणत्याही वस्तूत काही साम्य असते तसेच भेदही असतो. उदा. काळा रंग, पांढरा रंग, द्विपाद, चतुष्पाद, उंच-बुटका, गरीब-श्रीमंत इत्यादी. वर्गीकरण करताना कोणते साम्य लक्षात घ्यावयाचे कोणते भेद लक्षात घ्यावयाचे हे वर्गीकरणाच्या उद्देशावर आणि जमा केलेल्या माहितीच्या स्वरूपावर अवलंबून असते.

. वर्गीकरणात काही उद्देश असतो : उदा. शेतकऱ्याकडे असणारे धारणक्षेत्र विचारात घेऊन अल्पभूधारक शेतकरी, सीमांत शेतकरी, मोठे शेतकरी असे वर्गीकरण करता येते, तसेच काळा रंग विचारात घेऊन कावळा, कोकिळा, कोळसा, फळा, काळे मणी तसेच पांढरा रंग विचारात घेऊन ससा, दूध, बगळा, खडू असे वर्गीकरण होऊ शकते. वर्गीकरणाचे हेतू सांगताना () उपलब्ध वृक्षांची शास्त्रशुद्ध मांडणी करणे () तथ्यांची समान असमान माहिती करून घेणे () दोन चलांमधील आंतरसंबंध समजावून घेणे () दोन चलांमधील विसंगती वाढणे () सामग्री तयार करण्यासाठी निष्कर्ष काढण्यासाठी माहिती उपलब्ध करणे इत्यादी.

. निष्कर्षाप्रत जाणे : वर्गीकरणामुळे निष्कर्ष काढणे सोपे जाते. उदा. विषुववृत्तीय प्रदेशात हवामान उष्ण असते तर टुंड्रा प्रदेशातील देशात हवामान थंड असते.. वर्गीकरणाचे आधारतथ्यांचे वर्गीकरण मुख्यत: पुढील चार आधारांनी केले जाते.

. गुणात्मक आधार : सामान्यत: ज्या तथ्यांचे आकडे संख्येत मांडता येत नाहीत अशा तथ्यांचे वर्गीकरण गुणवैशिष्ट्यांनुसार केले जाते. उदा. लोकांची अभिवृत्ती (Attitudes) हा याचा आधार असतो. उदा. साक्षर-निरक्षर, गरीब-श्रीमंत, विवाहित अविवाहित, ग्रामीण बाहरी याला गुणात्मक विभाजन असेही म्हणतात.

. संख्यात्मक आधार : जेव्हा संकलित केलेली तथ्ये संख्येमध्ये व्यक्त करता येतात तेव्हा त्याला संख्यात्मक आधार असे म्हणतात. उदा. वय, उंची, उत्पन्न, खर्च इत्यादी. अभ्यासविषयाची चले (Variables) ही वर्गीकरणाची मुख्य आधार असतात.

. कालाचा आधार : तथ्यांचे वर्गीकरण हे काळाच्या आधारे केले जाते. उदा. वर्षे, महिने, दिवस इत्यादी. वेगवेगळ्या वर्षांतील एखाद्या देशातील साक्षरतेचे प्रमाण किती होते याचा अभ्यास करता येतो.

. भौगोलिक आधार : तथ्यांचे वर्गीकरण भौगोलिक क्षेत्राच्या आधारे केले जाते.उदा. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील साक्षरतेचे प्रमाण पाहणे.

वर्गीकरणाचे प्रकार (Types of Classifications)

. भौगोलिक वर्गीकरण (Geographical Classification) : जमा केलेल्या सामग्रीची गटवारी जर त्यांच्या स्थानानुसार अथवा भौगोलिक परिस्थितीनुसार केलेली असेल तर त्याला भौगोलिक वर्गीकरण असे म्हणतात. तथ्यांचे वर्गीकरण देशानुसार, राज्यानुसार, जिल्ह्यानुसार केलेले असेल तर त्याला भौगोलिक वर्गीकरण म्हणता येईल. उदा. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील साक्षरता प्रमाण, तालुकानिहाय पर्जन्यमान, विद्यापीठांनुसार विद्यार्थी संख्या, राज्यनिहाय सिंचन क्षेत्र इत्यादी. जमा केलेली आकडेवारी निरनिराळ्या भौगोलिक घटकांना कशा रीतीने विखुरलेली आहे हे समजून घ्यावयाचे असेल तर भौगोलिक वर्गीकरण केले जाते.

. गुणात्मक वर्गीकरण (एखादा गुण) (Qualitative Classification) : जमा केलेल्या सामग्रीचे गट पाडताना जेव्हा एखादा गुणधर्म विचारात घेतला जातो तेव्हा त्याला गुणात्मक वर्गीकरण असे म्हणतात. व्यक्तीच्या अथवा वस्तूच्या गुणधर्मानुसार अथवा वैशिष्ट्यानुसार तथ्यांचे गट पाडले जातात तेव्हा ते गुणात्मक वर्गीकरण होय. उदा. साक्षरता हा घटक विचारात घेऊन केलेले वर्गीकरण पुढील पत्रकात दाखविले आहे.

. गुणात्मक वर्गीकरण (ठरावीक गुण) (Qualitative Classification) :  ज्यांचे निश्चित संख्येत मापन करता येत नाही परंतु ठरावीक गुणधर्म विचारात घेता येत असतील तर अशा सामग्रीचे जेव्हा गट पाडले जातात तेव्हा त्याला 'गुणात्मक वर्गीकरण' असे म्हणतात. लोकसंख्येचे स्त्री-पुरुष, साक्षर निरक्षर, विवाहित-अविवाहित, ग्रामीण-शहरी असे वर्ग पाडता येत असतील तर त्याला गुणात्मक वर्गीकरण असे म्हणता येते. असे गट पाडताना ज्या घटकात तो गुणधर्म आहे त्यांचा एक वर्ग पाडला जातो, तर ज्यांच्यात तो गुणधर्म नाही. त्यांचा दुसरा गट पाडला जातो.

गुणात्मक वर्गीकरणाचे () साधे वर्गीकरण () बहुविध वर्गीकरण असे दोन प्रकार सांगता येतील.

() साधे वर्गीकरण : जमा केलेल्या तथ्यातील एखाद्या विशिष्ट गुणधर्माचा विचार करून सामग्रीची गटवारी केलेली असेल तर त्याला साधे वर्गीकरण असे म्हणतात. संशोधनात विशिष्ट चिकित्सा करता केलेले असे हे वर्गीकरण असते. उदा. भारताच्या लोकसंख्येचे लिंगभेदानुसार केलेले वर्गीकरण. भारताची लोकसंख्या

() बहुविध वर्गीकरण : जमा केलेल्या तथ्यांचे दोन किंवा अधिक गुणधर्म विचारात घेऊन अनेक वर्ग पाडले जात असतील तर त्याला बहुविध वर्गीकरण असे म्हणतात. अशा वर्गीकरणामुळे तथ्यांमध्ये अंतर्भूत असलेला फरक स्पष्ट होतो.

. कालिक वर्गीकरण : जमा केलेल्या सामग्रीची मांडणी कालानुक्रमे केलेली असेल तर त्याला कालिक वर्गीकरण असे म्हणतात. यामध्ये कालावधी हा घटक महत्त्वाचा असून संशोधन विषयाची आकडेवारी कालानुक्रमे व्यक्त केली जाते. उदा. महाविद्यालयातील दहा वर्षांतील विद्यार्थिसंख्या, आयात-निर्यात, वस्तूचे निर्देशांक, कारखान्याचा नफा-तोटा, स्थूल देशांतर्गत उत्पादनातील कृषिक्षेत्राचा  इत्यादी.

. संख्यात्मक वर्गीकरण (Quantitative Classification) : तथ्ये ही संख्येमध्ये व्यक्त केलेली असतात. तेव्हा अभ्यासविषयाची चले संख्येत मांडता येतात. अनेक गुणधर्म निश्चित अशा एककात (Units) मोजता येतात. उदा. वय, वजन, उंची, उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकसंख्या, नफा-तोटा इत्यादी स्वरूपाची आकडेवारी निरनिराळ्या गटात मांडता येते केलेल्या सामाग्रीतील एखाद्या गुणधमचि त्याच्या आकारानुसार गट पाडले असतील तर त्याला ख्यमवर्गीकरण म्हणतात.

() स्थिर चल पदे (Constants and Variables) : जमा केलेल्या तथ्यांचे दोन वर्ग करता येतात. स्थिर चल. ज्या तथ्यांचे मूल्य बदलत नाही त्यांना स्थिर पद म्हणतात. उदा. देशाचे क्षेत्रफळ, अक्षांश-रेखांश. एखाद्या शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची, एखाद्या पुस्तकाचे वजन ही स्थिर पदे होत. मात्र ज्यांचे मूल्य बदलते त्यांना चल पदे (Variables) असे म्हणतात. उदा. भिन्न शहरांची लोकसंख्या, कामगारांचे उत्पन्न, उत्पादन खर्च इत्यादींत सतत बदल होत असतो. म्हणून त्याला चल असे म्हणतात.

() वर्ग मर्यादा  : जमा केलेली सामग्री (आकडेवारी) आकारमानानुसार निरनिराळ्या वर्गांत मांडलेली असते. त्या वर्गातील सर्वांत लहान मूल्यास आणि सर्वांत मोठ्या मूल्यास त्या वर्गाची मर्यादा म्हणतात. उदा. वरील उदाहरणातील गट क्र. मधील रु. ५००० ते ६००० ही त्या वर्गाची वर्गमर्यादा होय. सर्वांत लहान मूल्यास कनिष्ठ मर्यादा (Lower Limit) म्हणतात. तर सर्वांत मोठ्या मूल्यास ज्येष्ठ मर्यादा (Upper Limit) असे म्हणतात. उदा. गट क्र. ची ५००० रु. ही कनिष्ठ मर्यादा तर ६००० रु. ही ज्येष्ठ मर्यादा होय.

() वर्गांतर (Class Intervals) : एखाद्या वर्गाची ज्येष्ठ मर्यादा कनिष्ठ मर्यादा यांमधील फरकास वर्गांतर असे म्हणतात. वरील उदाहरणात रु. १००० हे वर्गांतर होय. सामान्यतः प्रत्येक वर्गाचे वर्गांतर समान असावे असे असले तरी जरुरीप्रमाणे वर्ग पाडता येतात..

() वर्गाची वारंवारिता (Class Frequency) : दिलेल्या वर्गात मोजल्या जाणाऱ्या घटकांची मूल्ये त्या वर्गात समाविष्ट केली जातात. त्या संख्येला त्या वर्गाची वारंवारिता असे म्हणतात. उदा. आपल्या उदाहरणात गट क्र. ची वारंवारिता ५००, गट क्र. ची ८०० तर गट क्र. ची वारंवारिता ७०० आहे. () वर्गांतरानुसार वर्गीकरण : सामग्रीतील वर्गांतर विचारात घेऊन गटवारी केलेली असेल तर त्या संख्यात्मक वर्गीकरणाला वर्गांतरानुसार वर्गीकरण असे म्हणतात. वर्गांतरानुसार वर्गीकरण करण्याच्या दोन पद्धती आहेत. () अपवर्जक पद्धती () समावेशक पद्धती.

() अपवर्जक पद्धती (Exclusive Method) : वर्गीकरण करताना जेव्हा वर्गाची ज्येष्ठ मर्यादा त्या वर्गातून वगळली असेल तर त्याला 'अपवर्जक पद्धती' असे म्हणतात. उदा. वरील उदाहरणात गट क्र. मध्ये रु. ५००० ते ६००० चा एक गट पाडला आहे आणि गट क्र. मध्ये रु. ६००० ते ७००० चा एक गट पाडला आहे. या दोनही गटांत रु. ६००० चा उल्लेख आहे. परंतु समजा, आपण गट क्र. मध्ये मासिक ६००० रु. उत्पन्न मिळविणाऱ्या कामगारांचा समावेश करता तो गट क्र. मध्ये केलेला असेल तर त्याला अपवर्जक पद्धती असे म्हणतात. अपवर्जक पद्धतीत त्या वर्गाची ज्येष्ठ मर्यादा त्या गटातून वगळलेली असते.

() समावेशक पद्धती (Inclusive Method) : जेव्हा त्या वर्गाची ज्येष्ठ मर्यादा त्याच वर्गात समाविष्ट केलेली असते तेव्हा त्याला समावेशक पद्धती असे म्हणतात. समावेशक पद्धतीनुसार मासिक उत्पन्न रु. ६००० मिळविणाऱ्या कामगारांचा समावेश गट क्र. मध्ये करावा लागेल.

वारंवारिता वितरण (Distribution Frequency)

दिलेले घटक निरनिराळ्या वर्गांत कशा प्रकारे विखुरलेले आहेत, त्या घटकांचे निरनिराळ्या वर्गात कशा प्रकारे वितरण झालेले आहे त्या वितरणास वारंवारिता वितरण असे म्हणतात.अमर्याद तथ्यांना मर्यादित स्पष्ट करणे हे वर्गीकरणाचे प्रमुख कार्य होय. त्यासाठी वर्गीकरण हे निश्चित स्पष्ट असावे लागते. त्यात संदिग्धता असू नये. तुलनात्मक अध्ययनासाठी वर्गीकरण उपयुक्त ठरते. त्यामुळे माहितीचे चटकन आकलन होते. तथ्यातील विसंगती टाळता येते. तथ्यांची शास्त्रशुद्ध रीतीने मांडणी करता येते.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...