(Sawant S. R.)
BA - 2 --- पेपर -- नं -- 6 --
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास -- महात्मा गांधीजींचे चलेजाव आंदोलन --
गांधी युगाच्या कालखंडामध्ये याच्या अगोदर असहकार चळवळ सविनय कायदेभंग
चळवळीचा अभ्यास केला. या दोन्ही चळवळी पेक्षा चलेजाव आंदोलन चळवळ ही भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चळवळ मानले जाते. कारण या चळवळीमुळे british सत्तेला आपला भारतातील घाशा गुंडाळावा लागला. आणि भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. यानंतर आपल्याला छोडो भारत आंदोलनाची पार्श्वभूमी पाहावे लागेल. 1935 च्या भारतसरकारच्या कायद्या नुसार राज्याना स्वायतत्ता मिळणार होती.या स्वायत्ते मुळे1935 ला प्रांताच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये अनेक राज्यांमध्ये राष्ट्रसभेचे सरकार सत्तेवर आलीत. त्यानंतर त्याच दरम्यान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हुकूमशाही राष्ट्रांनी लोकशाही राष्ट्रांच्या वर दादागिरी करण्यास सुरुवात केली होती. एक प्रकारे युरोपच्या राजकारणात अशांततेचे वातावरण तयार झाले होते. परिणामी भारतातील प्रांतीय सत्त्तेची सुञे केंद्राच्या हाती गेलीत व्हाइस राॕयला सर्वाधिकार दिले गेले. परिणामी काँग्रेसने या निर्णयाच्या धोरणात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलनामध्ये मुळे देशात अशांतता निर्माण झाली. त्याच दरम्यान युरोप मध्ये 1939 ला दुसऱ्या महायुध्धास सुरुवात झाली होती.भारतात अशांतता होती या अशा परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी 8 ऑगस्ट 1940 रोजी व्हाइसरॉयने ऑगस्ट घोषणा केली. त्यामध्ये काही आश्वासने भारतीयांना दिली गेली. मात्र यामुळे भारती यांचे समाधान झाले नाही. साहजिकच महात्मा गांधीजींनी 1940 मध्ये मुंबईमध्ये राष्टीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव पास करून घेतला आणि त्यानंतर देशात गांधीजींच्या आदेशावरून वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात झाली .यातून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिशांनी स्टे फर्ड क्लिप्स या मंत्र्याला मार्च 1942 मध्ये भारतात पाठवले. त्याने सुधारित योजना जाहीर केली. मात्र त्यामुळे भारतीयांचे अजिबात समाधान झाले नाही.त्या मुळे भारता मध्ये असतोषाची परिस्थिती तयार झाली होती.
परिणामी सुधारित क्रिप्स योजना राष्ट्र सभेने फेटाळून लावली. दरम्यान ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरण त्याचबरोबर सरकारची भारतीयांच्या वर चालवलेली दडपशाही दुसऱ्या बाजूला जपानने आक्रमक धोरणाचा स्वीकार करून जपान हिंदुस्थानच्या सीमेवर येऊन धडकला होता. जो इंग्लंड स्वतःचे संरक्षण करू शकत नाही तो हिंदुस्तानचे काय संरक्षण करणार हे गांधीजींनी ओळखले त्यामुळे
महात्मा गांधीनी निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सात ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबई मध्ये भरले. होते. या अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारत हा ऐतिहासिक ठराव प्रचंड मतानुसार मान्य केला गेला. आणि त्यावेळी गांधीजीनी आम्ही आता अधिक काळ शांत राहू शकत नाही गुलामगिरीत राहू शकत नाही त्यासाठी सर्वशक्तीनिशी सरकारच्या विरोधात लढा द्या मी तुम्हाला छोटा मंत्र देतो तो मंत्र म्हणजे करा अथवा मरा ही घोषणा करून संपूर्ण देशाला गांधीजींनी चले जाव आंदोलनाची घोषणा केली. आणि संपूर्ण देश या चळवळीने पेटून उठला भारतामध्ये चलो जो आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षपणे सुरुवात झाली
Comments
Post a Comment