(Sawant S R)
B.A-- 3 --
पेपर नंबर -- 12-- प्राचीन भारताचा इतिहास प्रकरण--2 ---गुप्त सत्ता व वाकाटक--- बृहत भारत संकल्पना ( भारताचे परकीय देशांशी संबंध )---
गुप्त काळामध्ये भारतीयांनी आपल्या प्रगतीचा व सांस्कृतिक गोष्टीचा वसा भारताबाहेर अन्य देशांनाही दिलेला आहे.गुप्ताच्यां कारकिर्दीमध्ये देशांशी जावा सुमाञा मध्य आशिया या पृदेशाशी व्यापार व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत होता. फाइयान या चिनी प्रवाशांने याविषयी आपल्या प्रवासा वणृना मध्ये याचे विस्तृत वर्णन केलेले आहे. गुप्त राजे आपल्या साम्राज्या मध्ये गुंतून राहिले नव्हते. त्यांनी पश्चिम व पूर्व आशियाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते .यामध्ये बौद्ध धर्माने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. या भागांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला .
चीनने तर बौद्ध धर्माला राजधमृ म्हणून जाहीर केले. परिणामी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी चिनी देशातील अनेक प्रमुख भारतात आले होते. भारतीय संस्कृतीचा ठसा आशियायी देशावर मोठ्या प्रमाणात उमटला होता. आशियाई राजांना गौतम बुद्धा विषयी विलक्षण आकर्षण होते. जावा सुमात्रा व्दी समूहात व्यापार व धर्मप्रसार राजकीय व्यवहारासाठी स्थायिक झाले होते. चांगल्या संबंधामुळे
गुप्त काळात अनेक भारतीय मध्य आशियात झाले होते. कुची या नगरात कायम स्वरूपात स्थायिक झालेला बौद्ध तत्वज्ञान कुमार जीव यापैकी एक प्रमुख होता. यानेच चिनी लोकांना बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या तत्वाची ओळख करून दिली .जवळजवळ 106 बौद्धधर्मीय संस्कृत ग्रंथाचे त्याने चिनी भाषेत भाषांतर करून दिले, सिलोनचा चा बौद्ध राजा श्री मेघ वर्मन याच्याशी समुद्रगुप्ताचे मैत्रीचे संबंध होते.समुदृ गूप्ताच्या सहाय्याने बौध्द गया येथे सुंदर विहार बांधला. अलाहाबाद येथील एका स्तंभलेखा नुसार द्वीप वासियांनी हिंदू वसाहतींनी समुद्रगुप्ता शी सातत्याने संपर्क ठेवून भारत भूमी ची जवळीक साधली होती. अजिंठ्यातील चित्रामधील पृसगांवरून सातव्या शतकात भारताचा निकटचा संबंध असावा असे दिसुन येते. गुप्तकाळात भारतीय संस्कृतीचा रोम शी संबंध होता असे मानले जाते. रोमन सम्राट च्या भेटीसाठी तीन भारती यांचे पथक गेल्याचे गुप्त नाण्यावर कोरलेले आहे.चीनी पृवाशी फायियान याच्या प्रवास वणृना तून गुप्त कालीन सामाजिक धार्मिक व राजकीय परिस्थितीवर पडतो .
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.