Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: चांगल्या चिन्हनामाची वैशिष्ट्ये

Wednesday, 21 July 2021

चांगल्या चिन्हनामाची वैशिष्ट्ये

(Parit V. B.) 

Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari


B.Com -1    Sem - II


Subject- Principles of Marketing


Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व 


 * चांगल्या चिन्हनामाची वैशिष्ट्ये *



१. सोपा उच्चार (Easy to Pronounce) : वस्तूचे चिन्हनाम उच्चाराच्या दृष्टीने सोपे व सुटसुटीत असावे. सहजपणे उच्चारता येईल असे असावे. उदा. बाटा, सोनी, अकाई इ. जोडाक्षरे, कठीण अक्षरे / शब्द शक्यतो टाळावेत.


२. लघुरूप (Short) : वस्तूसाठी चिन्हनाम निवडताना व ठरविताना ते कमीतकमी शब्दांचे/अक्षरांचे असावे. दोन ते चार अक्षरांचे व एका शब्दाचे असावे. उदो. टाटा, बाटा इत्यादी.


३. श्रवणमधुरता (Sweet to Hear) : वस्तूचे चिन्हनाम ऐकताना मधुर व गोड वाटले पाहिजे. श्रवणमधुरता असल्यास त्याचा चांगला प्रभाव पडतो. उदा. टाटा, गुडनाईट, प्रतिभा इत्यादी.


४. आठवण सुलभता (Simple to Remember) : चिन्हनाम बाजारपेठेत संभाव्य ग्राहक, ग्राहक, विक्रेता, किरकोळ व्यापारी, वितरक इत्यादी या सर्वांच्या आठवणीत सुलभपणे राहिले पाहिजे.


५. दर्जा प्रक्षेपक (Projecting Qualities) : ग्राहकाला वस्तूमधील गुणवैशिष्ट्ये व तिचा दर्जा प्रक्षेपण करणारे चिन्हनाम असावे. उदा. पूजा, हेरिटेज, सर्फ इत्यादी.


६. संस्थादर्शक (Indicating the Producer) : उत्पादन संस्थेचे नाव दर्शविणारे चिन्हनाम सर्वांत चांगले होय. बहुसंख्य ग्राहकांना वस्तूपेक्षा तिच्या उत्पादन संस्थेवर अधिक विश्वास असतो. म्हणून चिन्हनामामध्ये उत्पादन संस्थेचे नाव प्रतिबिंबित असावे. उदा. अमुल, वारणा, कोलगेट, रेमंड इत्यादी.


७. प्रसिद्धीयोग्य (Easy to Promote) : चिन्हनामाची सहज जाहिरात करता येईल व त्याची बाजारपेठेत प्रसिद्धी होऊन लोकप्रिय होईल, असे असावे.


८. कायदामान्य (Legally Protectable) चिन्हनाम हे कायदेशीरदृष्ट्या योग्य असले पाहिजे. भविष्यात ते नोंदविण्याचा निर्णय झाल्यास त्यास कायदेशीर मान्यता मिळावयास हवी.


अशा रीतीने चिन्हनाम ठरविताना वरील सर्व वैशिष्ट्ये विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...