(Sawant S. R.)
BA--- 2 -- इतिहास पेपर -- नं -- 6--- मुंबई भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास-- चले जाव चळवळ --चले जाव चळवळ ची वाटचाल.
भारताच्या इतिहासातील चलेजाव आंदोलनाचे महत्त्व --
8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्र सभेने चले जाव चळवळ पुकारली आणि त्याच रात्रीला राष्ट्सभेच्या सर्व प्रमुख नेत्यांसह अटक करण्यास सुरुवात केली. यामध्ये महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद सरदार पटेल अरुणा असफअली या सर्वांना अटक करण्यात आली.अटक करून कोठे ठेवलेले आहे. याची माहिती देखील जनतेला देण्यात आले नाही. याच दरम्यान मुस्लिम लीगने british सरकार बरोबर हात मिळवणी केली, असे असले तरी इतर राजकीय पक्षाच्या मंडळीनी ही चळवळ पुढे चालवली. गांधीच्या करा किंवा मरा या मञांने जनता नेतृत्व नाही म्हणून स्वस्त बसली नाही. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारने क्रूर मार्गाचा अवलंब केला. त्यामध्ये गोळीबार मशीन गन्सचा वापर स्त्रियांवर अन्याय कैद्यांना उपाशी ठेवणे.अशा अनेक कारणाने हिंदी जनतेचा ब्रिटिश सरकारने छळ केला. अनेक लोकांना कारावासात घातले. त्याला उत्तर म्हणून जनतेने रेल्वे टेशन जाळली टेलिफोन तारा तोडल्या पोस्ट ऑफिस नष्ट केली. सरकारचा खजिना लुटला यावेळी देशांमध्ये राज्यात अशी सघंमय परिस्थिती सरकार आणि जनतेमध्ये निर्माण झाली होती.
सरकारने गांधी यांच्यावर गुप्तता जपान धार्जी ने धोरण आणि अनीतिमत्ता हे आरोप ठेवले त्याच्याविरोधात गांधीजींनी 10 फेब्रुवारी 1943 पासून 21 दिवसाचे आमरन उपोषण केले. आधुनिक भारताच्या इतिहासात चलेजाव चळवळीला फार मोठे महत्त्व आहे 1789 ची फ्रान्सची राज्यक्रांती 1917 ची रशियन राज्यक्रांती . 1942चे चलेजाव आंदोलन या आंदोलनाला देखिल भारतिय राज्य krantiअसेच म्हणावे लागते, ही चळवळ पूर्णतः यशस्वी झाली नाही तरी ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आवाहन हिंदी लोकांनी दिले, चले जाव आंदोलनामुळेच काही कालावधीतच भारताला.स्वातंत्र्य मिळाले .या वेळी सरकारच्या लक्षात आले की आता आपण भारतावर जास्त वेळ राज्य करु शकणार नाही. परिणामी त्यांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला. या चळवळीचा एक आणखी परिणाम म्हणजे इंग्रज व मुस्लीम लीग यांची युती घनिष्ट झाली. आणि त्याचा परिणाम म्हणजे 1947 ला हिंदुस्थानला फाळणीला सामोरे जावे लागले. एकंदरीत असहकार सविनय कायदेभंग चलेजाव या तीन चळवळीतील महात्मा गांधींचे योगदान महत्त्वपूर्ण होते. 2
या तिन्ही चळवळी मुळे देश स्वातंत्र्य मंदिराच्या पायऱ्या चढत चढत स्वातंत्र्य मूर्तीजवळ पोहोचला.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.