Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: गुप्तकाळातील आर्थिक परिस्थिती

Sunday, 4 July 2021

गुप्तकाळातील आर्थिक परिस्थिती

(Sawant S R) 

BA-- 3 -- इतिहास  -- पेपर  नं -- १२-- 

प्राचीन भारताचा इतिहास--- गुप्तकाळातील आर्थिक परिस्थिती --- 

प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये गुप्त काळाच्या आर्थिक परिस्थितीला महत्त्वाचे  स्थान आहे. कारण गुप्त राजे  हे कर्तबगार होते. त्यांच्या साम्राज्यात शांतता नांदत होती साम्राज्य विस्तार आणि साम्राज्य संरक्षणासाठी त्यांनी केलेल्या व्यवस्थेमुळे गुप्त राजवटीमध्ये शांतता प्रस्थापित झाली. आणि ही शांतता  सुव्यवस्था समाजाच्या आर्थिक विकासाला कारणीभूत ठरली. शेती व्यापार उद्योग धंदे याने या सत्तेला आर्थिक सुसंपन्न आता मिळवून दिली.  गुप्त काळामध्ये आथीक दृष्ट्या शेती हा उत्पन्नाचा महत्वपूर्ण घटक होता शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली जात होती. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पीक घेण्यासाठी तलाव व कालव्याच्या पाण्याचा उपयोग केला जात होता.पाणीपुरवठ्याच्या सुविधा होत्या. स्कंद गुप्ता च्या काळात सुदर्शन नावाच्या तलावाची दुरुस्ती त्याने केलेली होती. शेतामधून तांदूळ गहू कापूस फळे पालेभाज्या यांचे उत्पादन घेतले जात होते. शेतीच्या जोडीला पशुपालन व्यवसाय होता. बहुसंख्य वर्ग हा शेती व्यवसाय करीत होता गुलामगिरीची पद्धत होती.गुलामांची विक्री केली जात  होती. त्यानंतर व्यापार हा गुप्तकाळातील दुसरा व्यवसाय होता. चांगले रस्ते सुरक्षित व्यवस्था धर्मशाळा यामुळे तक्क्षशीला उज्जैन या शहरांना प्रसिद्ध व्यापारी पेटा म्हणूनषृ सिध्द झालेल्या  होत्या . राष्ट्रीय व्यापार देखील वाढला होता. समुद्रमार्गे व्यापार चालत होता.चंदन केशर मसाल्याचे पदार्थ अत्तरे इत्यादी वस्तू भारतामधून निर्यात होत होत्या इराण इराक चिन मलाया  इत्यादी देशाबरोबर व्यापार चालत होता. भारतात मध्ये आशियातिल घोडे रेशीम हस्तिदंत निलमनी आयात होत होते. भारतीय व्यापारी काही वस्तूंचे दलाल म्हणून देखील काम करत होते.व्यापाऱ्यानी आपल्या वेगवेगळ्या व्यावसायिक संस्था  स्थापन केल्या होत्या .त्याच्या श्रेण्या मार्फत व्यापार करण्यासाठी व्यापाऱ्याना   आर्थिक मदत दिली जात होती. सुवर्णाची नाणी चांदीची  नाणि  इत्यादी चा वापर वस्तू  विनिमयासाठी केला जात होता. कवड्यांचा ही वस्तू  विनिमयासाठी  वापर केला जात होता .गुप्त राजांची नाणी शुद्ध सोन्याची व अतिशय प्रगत होती. 122 ग्रॅम वजनाची सोन्याची  नाणी होती. एकंदरीत गुप्तकाळातील  शांतता सुव्यवस्था   व्यापार व्यवहार समाजाच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत ठरली

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...