Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: वस्तू : अर्थ व महत्त्व

Thursday, 8 July 2021

वस्तू : अर्थ व महत्त्व

(V B Parit) 

Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari

B.Com -1    Sem - II

Subject- Principles of Marketing

Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व 


 व्याख्या -


"वस्तू म्हणजे भौतिक, आर्थिक, सामाजिक व मानसशास्त्रीय लाभांची गोळाबेरीज होय, जे विपणन संस्था उपलब्ध करते व ज्याची ग्राहक अपेक्षा करीत असतो."


वस्तूची वैशिष्ट्ये (Features of Product)-


 वस्तूची ही वैशिष्ट्ये काही दृश्य स्वरूपात असतात, तर काही गर्भित स्वरूपात असतात. वस्तूची ही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.


(अ) दृश्य/उघड वैशिष्ट्ये- (Explicit Features)


वस्तूची ही वैशिष्ट्ये स्पष्ट स्वरूपात दिसणारी असतात. प्रत्येक ग्राहकास ती समान स्वरूपात दिसतात.


१. व्यापक संकल्पना : 'वस्तू' म्हणजे केवळ भौतिक वस्तू असा अर्थ घेणे हे संपूर्णतः चुकीचे आहे. 'वस्तू' या संकल्पनेमध्ये भौतिक वस्तू (उदा. स्कूटर) शिवाय अभौतिक स्वरूपातील सेवा / योजना (उदा. आयुर्विमा महामंडळाची 'जीवनसाथी' विमा योजना), वस्तू अधिक सेवा मिळूनची बाब यांचा समावेश होतो.

२. भौतिक आकार व रचना (Physical Configuration) : भौतिक स्वरूपाची वस्तू असल्यास तिची रचना अनेक भौतिक घटकांपासून बनलेली असते. त्या भौतिक घटकांमध्ये कच्चा माल, रसायने, वजन, लांबी, उंची, रंग, डिझाईन, व्यापारी नाव, इत्यादींचा समावेश असतो. लेबल, वेष्टन


३. अभौतिक गुणघटक (Non-material Factors) : भौतिक अथवा अभौतिक "वस्तू'मध्ये अनेक प्रकारची अभौतिक वैशिष्ट्येसुद्धा असतात. गंध, चव, देखणेपणा, सफाईदारपणा, सौंदर्य, आकर्षकता, स्टाईल, कंपनीची प्रतिमा, सुरक्षितता, क्षमता, ख्याती (Goodwill) इत्यादी प्रकारचे गुणघटक असतात. वस्तुपरत्वे ते भिन्न-भिन्न असतील हा भाग वेगळा आहे.


४. उपयोगितांचा समूह (Bundle of Utilities) : वस्तू ही भौतिक असो अथवा अभौतिक असो, तिच्यामध्ये विभिन्न प्रकारच्या उपयोगितांचा समूह असतो. प्रत्येक वस्तूमध्ये उपयोगितेचे घटक भिन्न-भिन्न असले तरी उपयोगितेशिवाय वस्तू अर्थहीन व निरुपयोगी आहे.


५. गरजांचे समाधान (Satisfaction of Wants) : वस्तू ही मानवाच्या गरजांचे समाधान करणारी बाब (Item) आहे. हे समाधान केवळ आर्थिक स्वरूपाचे नसते तर मानसिक व सामाजिक स्वरूपाचेसुद्धा आहे. विपणनाची क्रिया मुख्यतः वस्तूमध्ये असलेल्या गरजांच्या समाधानात केंद्रित असते.


६. संलग्न सेवा (Associated Services) : कोणत्याही वस्तूसोबत संलग्न सेवा अभिप्रेत असतात. या संलग्न सेवा विक्रीपूर्व व विक्रीउत्तर अशा दोन्ही प्रकारच्या असतात. विक्रीपूर्व सेवांमध्ये वस्तूचे प्रात्यक्षिक दाखविणे, मोफत नमुना देणे, चाचणी वापरास मुभा देणे, पतपुरवठ्याची व्यवस्था करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो, तर विक्रीउत्तर सेवांमध्ये घरपोच सेवा, वस्तू बसवून देणे (Installation), सुटे भाग पुरविणे, दुरुस्ती करणे, मोफत देखभाल करणे, अदलाबदल करून देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.


७. किंमत (Price Element) : प्रत्येक वस्तूची किंमत असते. उत्पादन संस्था अथवा विपणन संस्था आपल्या वस्तूची किंमत निर्धारित करीत असते. वस्तू बाजारपेठेत सोडण्यापूर्वी ही किंमत निश्चित केलेली असते. 


८. वस्तू मिश्रण (Product Mix) : बहुसंख्य उत्पादन संस्था अथवा विपणन संस्था एका वस्तूचे उत्पादन / विपणन करताना, त्या वस्तूशी संबंधित वस्तूंचे उत्पादन / विपणन करतात. सुटिंगचे कापड उत्पादन करणारी कंपनी शर्टिंगचे उत्पादन व विपणन करतात. पुस्तकांची विक्री करणारी संस्था वह्या व तत्सम साहित्यांचीसुद्धा विक्री करतात. म्हणजे उत्पादन अथवा विपणन करताना असे वस्तूमिश्रण केले जाते. 


९. वस्तू जीवन चक्र (Product Life Cycle) : प्रत्येक वस्तूचे एक जीवन चक्र असते. वस्तूचा बाजारपेठ प्रवेश, वस्तुविकास, परिपक्वता व वस्तू उच्चाटन अशा अवस्थांपासून कोणत्याही वस्तूचे जीवन चक्र पूर्ण होत असते. काही वस्तूंचे जीवन चक्र अल्प, मध्यम व दीर्घ असे ढोबळ तीन प्रकारचे असते.  

      इत्यादी वस्तूची दृश्य /उघड वैशिष्ट्ये आहेत .

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...