(K S Powar)
िषय- उद्योजकतेची मूलतत्वे
बी काॅम भाग 2 सेम IV
उपघटक-महिला उद्योजक विकासासाठी उपाययोजना
1-सामाजिक प्रबोधन-
पुरूषांच्या वाढत्या संस्कृतीमुळे महीला उद्योजकांची संख्या कमी झाली. यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे.स्रियांच्या कर्तृत्वाला प्रेरणा देवून स्ञी- पुरूषांसाठी विकासाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामुळे महीला उद्योजकांची संख्या व धाडस नक्की वाढेल.
2- पुरूषांचे सहकार्य-
महीलांवर अनेक सामाजिक व सांस्कृतिक बंधने घालण्यात आली आहेत.ह्या सर्व गोष्टीतून मुक्तता मिळून त्यांना पुरूषांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच महीलांनी उद्योजक व्हावे यासाठी त्यांना समाजाकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
3- मालमत्तेबाबत नोंद-
महीलांना उद्योजक व्हायचे असल्यास त्यांना बॅकांकडून कर्ज घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या नावावर मालमत्ता असणे गरजेचे आहे. ते तारण ठेवून बॅका त्यांना कर्ज देतात. त्यामुळे आजच्या काळात स्ञीयांच्या नावावर मालमत्तेच्या समान नोंदी झाल्या पाहिजेत.
4- समाजातर्फे प्रोत्साहन-
महीलाना व्यवसाय क्षेञात आणण्यासाठी समाजाकडून विशेष प्रोत्साहन गरजेचे आहे. अनेकदा महीलांना उद्योजक व्हायचे असल्यास घरातून विरोध होतो.त्यासाठी महीलावर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे.
5-व्यवस्थापकीय कौशल्य प्रशिक्षण-
महीला ह्या जोखीम स्विकारयला किंवा तातडीच्या प्रसंगी निर्णय घ्यायला तयार नसतात. त्यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. उद्योजकतेचे प्रशिक्षण देणार्या संस्थांची पुढाकार वृत्ती असली पाहिजे.
Comments
Post a Comment