Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: महीला उद्योजकतेची वैशिष्ट्ये

Sunday, 4 July 2021

महीला उद्योजकतेची वैशिष्ट्ये

(K S Powar)

 िषय- उद्योजकतेची मूलतत्वे   

 बी काॅम भाग 2     सेम-  4

उपघटक- महीला उद्योजकतेची वैशिष्ट्ये 

1-पुरूषांचा आधार- 

          भारतातील महीला उद्योजकांना सुरवातीपासून पुरूषांचा आधार  आहे.काही ठिकाणी तर पुरूष हे महीला उद्योजकांच्या नावे उद्योग चालवतात. फार कमी महीला उद्योजक आहेत ज्या स्वत:च्या कर्तृत्वार व्यवसाय चालवतात. 

2- व्यावसायिक पार्श्वभूमी-

            व्यावसायिक पार्श्वभूमी असल्याशिवाय महीला उद्योजकांना पुढे येणं शक्य नाही. व्यावसायिक पाठींबा मिळवून काही महिलांनी पुढे येवून उद्योग स्थापन केले आहेत.हे भारतीय महिलांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

3- कौटुंबिक घटकांचा प्रभाव-

               महीला उद्योजक भारतात 1975 नंतर पुढे आल्या. ही महीला उद्योजकांची पहीली पिढी म्हणता येईल. 

कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या त्या महीलांनी कुटूंबाच्या साहाय्याने व्यवसाय स्थापन केले व पुढे नेले.

4. कार्यक्षमतेची कसोठी- 

                उद्योजकाला प्रत्येक वेळी कसोटी सामना करावा लागतो. कारण व्यवसायातील बदल व आव्हानात्मक परिस्थिती कायम येते, त्याचा सामना करणे शिकावे लागते

त्यातून मार्ग काढणे हे उद्योजकांचे काम असते. महीला ह्या आव्हानात्मक परिस्थितीत मार्ग काढण्याची शक्यता कमी असते.

5 - सवलतीद्वारे विकास-

             महीला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही विशेष सोयी व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

त्याचा मदतीने महीलांनी लोकांकडून सवलतीच्या दरात कर्जे घेवून उद्योग सुरू केले आहेत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...