Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari
B.Com -1 Sem - II
Subject- Principles of Marketing
Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व
चिन्हनाम व व्यापारी चिन्ह (Brand Name and Trademark)
बाजारपेठेत ग्राहकांसाठी वस्तू मूळ रूपात सादर करण्याऐवजी तिच्यावर वेगवेगळे संस्कार करून सादर करण्याची पद्धत सर्वच उत्पादन संस्था अनुसरतात. जन्मलेल्या नव्या मुलास जसे बारसे करून एक नाव दिले जाते, तसेच वस्तूचे नामकरण करणे हे महत्त्वाचे संस्कारकार्य समजले जाते. वस्तूचे नामकरण करण्याच्या कार्यास विपणनशास्त्राचे चिन्हांकन (Branding) असे म्हटले जाते. सर्वच उत्पादन संस्था विपणनाच्या सोईसाठी आपल्या वस्तूचे नामकरण करतात. आधुनिक विपणनामध्ये तर नामकरण हा विपणन व्यूहरचनेचा भाग समजला जातो.
*चिन्हनाम***
चिन्हनामाचा अर्थ (Brand Name: Meaning) :-
"चिन्हनाम म्हणजे वस्तू बाजारपेठेत ओळखता यावी व संदेशवहनाचे साधन म्हणून त्याचा विपणनात उपयोग व्हावा म्हणून वस्तूला दिलेले विशिष्ट नाव किंवा चिन्ह होय."
*चिन्हनामाची वैशिष्ट्ये *
१. वस्तूचे बाजारपेठेत विपणन सुलभ व्हावे या उद्देशाने चिन्हनाम दिले जाते.
२. चिन्हनामामुळे वस्तू बाजारात ओळखली जाते.
३. चिन्हनाम हे वस्तूची प्रतिमा दर्शवित असते.
४. चिन्हनामाद्वारे वस्तूचा दर्जा, उपयुक्तता व व्यक्तिमत्त्व दर्शविले जाते.
५. चिन्हनाम हे नाव, चित्र, प्रतीक, अक्षरे, चिन्ह अशा स्वरूपात दिले जाते.
६. चिन्हनाम देणे हा विपणनतंत्राचा व व्यूहरचनेचा भाग समजला जातो.
७. उत्पादन संस्था आपल्या विपणन विभागाच्या सल्लामसलतीने हे चिन्हनाम निवडतअसते.
८. चिन्हनाम देण्याच्या कार्यास चिन्हांकन (Branding) असे म्हणतात.
इत्यादी चिन्हनामाची वैशिष्ट्ये आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.