(V B Parit)
Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari
B.Com -1 Sem - II
Subject- Principles of Marketing
Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व
**चिन्हनामाबाबत धोरणे (Brand Strategies)
कंपनी चिन्हनामाबाबत विचारपूर्वक धोरण ठरवित असते. चिन्हनामाचे धोरण दीर्घकालीन स्वरूपाचे असते. एकदा घेतलेले चिन्हनाम दीर्घकाल अथवा कायमस्वरूपी असते. चिन्हनामाबाबत कंपनी खालीलपैकी कोणत्याही धोरणाचा अवलंब करू शकते.
१. एकनामी धोरण (Single Brand Strategy) : उत्पादन संस्था आपल्या सर्व उत्पादनांसाठी एकच चिन्हनाम वापरत असेल तर त्यास एकनामी धोरण म्हणतात. 'अमुल' संस्थेने आपल्या सर्व उत्पादनांसाठी 'अमुल' हेच चिन्हनाम निवडले आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघाने आपल्या दूध, तूप, श्रीखंड, चीझ या उत्पादनांसाठी 'गोकुळ' हे एकच चिन्हनाम निवडले आहे.
२. बहुनामी धोरण (Multi Brand Strategy): उत्पादन संस्था आपल्या वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वेगवेगळे चिन्हनाम निवडत असल्यास ते बहुनामी धोरण समजले जाते.हिंदुस्थान लिव्हरने आपल्या वेगवेगळ्या साबणवड्यांसाठी वेगवेगळी चिन्हनामे घेतली आहेत.
३. वितरकाचे चिन्हह्नाम धोरण (Distributor's Brand Strategy) : उत्पादन संस्था आपल्याऐवजी वितरकाच्या चिन्हनामाखाली वस्तूची विक्री करीत असल्यास, त्यास वितरकाचे चिन्हमम धोरण म्हणतात. हे धोरण फारसे प्रचलित नाही.
४. मिश्रनाम धोरण (Mixed Brand Strategy) : जेव्हा उत्पादन संस्था आपल्या व
वितरकाच्या अशा दोघांच्याही चिन्हनामाखाली वस्तूचे विपणन करते, तेव्हा त्यास मिश्रनाम
धोरण म्हणतात. गोडेतेल, बिस्किटे, धान्य इत्यादींबाबत हे धोरण अनुसरले जाते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.