Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: चिन्हनामांचे वर्गीकरण (Classification of Brand names)

Friday, 16 July 2021

चिन्हनामांचे वर्गीकरण (Classification of Brand names)

 Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari


B.Com -1    Sem - II


Subject- Principles of Marketing


Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व 


 **चिन्हनामांचे वर्गीकरण (Classification of Brand names)


चिन्हनामांचे साधारणपणे पुढील प्रकारात वर्गीकरण केले जाते. 


१. वैयक्तिक व कौटुंबिक चिन्हनामे (Individual and Family Brand names) :


उत्पादन संस्था आपल्या वैयक्तिक आवडीनुसार आपल्या उत्पादनाची चिन्हनामे ठेवतात. हिंदुस्थान लिव्हरने आपल्या फेसपावडरसाठी 'पाँडस्' हे चिन्हनाम ठेवले आहे, तर काही संस्था आपल्या उत्पादनास कौटुंबिक नाव देतात. बजाज स्कूटर, बिर्ला सिमेंट इत्यादी.


२. उत्पादक व वितरक चिन्हनामे (Individual and Distribution Brand names) : मोठमोठ्या उत्पादन संस्था आपल्या सर्व प्रकारच्या उत्पादनासाठी चिन्हनाम घेतात. भारतातील मोठ्या उद्योगसमूहांनी तशा प्रकारचे चिन्हनाम घेतले आहे. उदा. टाटान, बिर्लाज, किर्लोस्कर्स इत्यादी, तर वितरक संस्थांनीसुद्धा स्वतःचे चिन्हनाम घेतले आहेत.. उदा. पार्क अव्हेन्यू, कॅरोना इत्यादी..


३. प्रादेशिक व राष्ट्रीय चिन्हह्नामे (Regional and National Brand names) : उत्पादन संस्था भौगोलिक विभाजनानुसार वेगवेगळ्या बाजारपेठांसाठी प्रादेशिक चिन्हाम वापरतात, तर राष्ट्रीय बाजारपेठ असलेल्या उत्पादन संस्था राष्ट्रीय स्वरूपाचे चिन्हनाम निवडतात. एका वस्तूसाठी प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळे चिन्हनाम घेतले जाते. पण राष्ट्रीय चिन्हमान हे देशभर एकच असते.


       उत्पादन संस्था/वितरण संस्था आपल्या सोईनुसार व विपणनाच्या दृष्टीने योग्य असे चिन्हनाम निवडतात, अर्थात, विपणन विभागातील अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून चिन्हानामाबाबत अंतिम निर्णय घेतला जातो.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...