Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ( District Central Co-operative Banks)

Friday, 16 July 2021

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ( District Central Co-operative Banks)

 (S D Patil)

B.A II Sem IV

Co-Operatives in India Paper II

Unit – I

घटक -  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ( District Central Co-operative Banks)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

 

स्वरूप

            जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ही सहकारी संरचनेत मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ असते. जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे ती नेतृत्व करते.

 

प्रकार

            जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन प्रकार आहेत.

1)    शुद्ध सहकारी संघ

या प्रकारात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओेरिसा आणि केरळ या राज्यांत असा प्रकार आहे.

2)    मिश्र मध्यवर्ती सहकारी बँका

या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच व्यक्तींना सुद्ध खुले असते. इतर सर्व राज्यांत या प्रकारच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत.

 

कार्ये

1)    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करणे हे आहे. परंतू काही कर्जे व्यक्तींनाही दिली जाऊ शकतात.

2)    नियमांनुसार या बँका व्यापारी कारणांसाठी कर्जपुरवठा करीत नाहीत. मात्र जानेवारी 2016 पासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी बहूतेक बँकाना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.

3)    या बँका शहरी भागातून ठेवी स्वीकारून ग्रामीण भागात निधी उप्लब्ध करून देण्याचे कार्य करतात.

 

भांडवल उभारणी

            जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका पुढील मार्गांनी आपले भांडवल उभारतात.

1)    स्वस्वामित्व निधीयात सहकारी संस्थांनी पुरवलेले भागभांडवल या राखीव निधीचा समावेश होतो.

2)    ठेवीसहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या ठेवी.

3)    कर्जेशिखर बँक तसेच इतर बँकाकडून मिळालेली कर्जे

4)    प्राथमिक सहकारी संस्थांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी.

 

विस्तार

            भारतात मार्च 2017 पर्यंत 370 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका होत्या. त्यापैकी महाराष्ठ्रात 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...