(Parit V B)
Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari
B.Com -III Sem - II
Subject- Business Regulatory Framework
Topic - E-Commerce
ई-कॉमर्स
प्रस्तावना
इंटरनेट संगणकाच्या माध्यमातून होणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री यास ई-कॉमर्स असे म्हटले जाते. ई-कॉमर्स या संकल्पनेमध्ये इलेक्ट्रॉनिक पैसे हस्तांतरण, विपणन, मालसाठा व्यवस्थापन, पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन, माहिती संग्रहण व प्रक्रिया तसेच ग्राहक संबंध या सर्वांचा समावेश होतो. इंटरनेट शिवाय टेलिफोन फॅक्स बारकोड मशीन टेलिव्हिजन या सर्वांच्या माध्यमातून होणाऱ्या व्यापाराला ही ई-कॉमर्स या व्याख्येमध्ये गणले जाते. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 सुधारित ई-कॉमर्स चे नियमन व नियंत्रण करतो.
*** ई-कॉमर्स वाढीसाठी कारणीभूत घटक
1.इंटरनेट वापराची साधने तसेच इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वेगाने वाढलेली आहे.
2.इंटरनेट सेवेचा वाढलेला वेग कमी झालेली किंमत आणि इंटरनेट सेवा वापरणाऱ्या भौगोलिक क्षेत्रातील वाढ इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बैंकिंग तंत्रज्ञानाचा मोठा वापर आणि त्यामध्ये झालेली वाढ
3.ई कॉमर्स चे सर्व व्यवहार वैयक्तिक पद्धतीने करता येत असल्यामुळे ई-कॉमर्स मध्ये वाढ
4.ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांतील ग्राहक मिळवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी लागलेली तीव्र स्पर्धा, यांचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांना मिळतो.
5.ई-कॉमर्स व्यवहारांना मिळालेली कायदेशीर मान्यता तसेच ई-कॉमर्स व्यवहारांमध्ये वाढलेला विश्वास आणि सुरक्षितता.
6.इंटरनेट वापरणाऱ्या तरुण वर्गात ई खरेदीचे वाढलेले आकर्षण
7.ई-कॉमर्स मध्ये येणाऱ्या सेवा वापरातील सुलभता व वेग आणि अशा सेवा वापरातून ग्राहकाचा वाचणारा वेळ आणि पैसा
8.ग्राहक समाधान सेवाचा वाढलेला दर्जा.
9.ई-कॉमर्स व्यवहारातील पारदर्शकता व अचुकता..
10.ई-कॉमर्स बाजारपेठ आणि सेवांची 24 तास व वर्षाचे 365 दिवस असणारी उपलब्धता ई कोणत्याही ठिकाणी योग्य साधनाआधारे ई-कॉमर्स शक्य आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.