Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: आधुनिक जीवनशैली आणि आरोग्य (Modern Lifestyle and Health)

Friday, 16 July 2021

आधुनिक जीवनशैली आणि आरोग्य (Modern Lifestyle and Health)

 (Mokashi P A)

B.A.II SEMESTER - 4

SOCIOLOGY PAPER - 6

आरोग्याचे समाजशास्त्र

प्रकरण - 3

जीवनशैली आणि आरोग्य

.आधुनिक जीवनशैली आणि आरोग्य

(Modern Lifestyle and Health)

 

निरोगी जीवनशैली हा चांगल्या जीवनाचा पाया आहे. जरी ही जीवनशैली साध्य करण्यासाठी फारसा प्रयत्न केला जात नसला तरी त्याचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून जीवनशैलीचा विचार करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वैयक्तिक आरोग्याशी आणि जीवनाच्या गुणवणतेशी संबंधित ६० टक्के घटक जीवनशैलीशी संबंधित आहेत. लाखो लोक आरोग्यदायी जीवनशैली पाळतात. म्हणूनच त्यांना आजारपण, अपंगत्व आणि मृत्यूचा सामना करावा लागतो. चयापचयाशी रोग, हाडाच्या समस्या, हृदय रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, उच्च रक्तदाब, जास्त वजन, हिंसा आणि यासारख्या समस्या एखाद्या रोगी जीवनशैलीमुळे उद्भवू शकतात. जीवनशैली आणि आरोग्याच्या संबंधाचा जास्त विचार केला पाहिजे. आज सर्व लोकांच्या जीवनात व्यापक बदल घडून आले आहेत. कुपोषण, अयोग्य आहार, धूम्रपान, मद्यपान, मादक पदार्थांचा गैरवापर, तणाव अशा प्रकारची जीवनशैली आरोग्याला मारक ठरत आहे. सध्या नागरिकांना नवीन आव्हानांचा सामना करावा लागतो. उदा. इंटरनेट आणि व्हर्म्युअल कम्युनिकेशन नेटवर्क यासारख्या माहिती तंत्रज्ञान प्रक्रिया जगाला एखाद्या मोठ्या आव्हानाकडे नेत आहेत. ज्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास धोका होती. तंत्रज्ञानाचा अति वापर आणि दुरुपयोग हे आव्हान आहे. म्हणूनच विद्यमान अभ्यासानुसार असे म्हणता येईल की, माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. पारंपरिक जीवनपद्धती प्रमाणेच आधुनिक जीवन पद्धतीचे आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे आणि तोटे म्हणजे आरोग्याला हानिकारक असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत.

आधुनिक जीवन पद्धतीतील आरोग्यविषयक फायदे

मनुष्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र व निवारा या तीन मूलभूत गोष्टींची गरज लागते. परंतु आता आधुनिक काळात आपण अन्न, वस्त्र, निवारा या मानवाला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत आणि मानवाला चांगले, दीर्घकालीन आयुष्य जगण्यासाठी यामध्ये आरोग्य व शिक्षण आणि मनोरंजन या गोष्टींचा समावेश केलेला आहे. मानवाचे आरोग्य चांगले असेल तर तो दीर्घकाळ सुखी आयुष्य जगू शकतो.

मानवाच्या आरोग्याचे मूळ हे मानवाच्या आहारात असते. सकस व पौष्टिक आहार असेल तर मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. आधुनिक जीवनपद्धतीमधील काही महत्त्वाचे घटक मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असतात असे घटक व त्याच्याशी संबंधित असलेले आरोग्य पुढीलप्रमाणे

. आहार:

सकस किंवा पौष्टिक आहार कार्ल मार्क्स यांच्या मतानुसार, मनुष्य हा टिचभर खळगी भरण्यासाठी वा भाकरीसाठी जीवन जगतो. २० व्या शतकातील काही शास्त्रज्ञांना मार्क्स यांचे विचार मान्य नाहीत. भाकरी हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला तरी जीवन जगण्याचा एकमेव उद्देश नाही. हे जरी खरे असले तरी माणसाला जीवंत राहावयाचे असेल तर त्याला भाकरीशिवाय म्हणजेच आहाराशिवाय पर्याय नाही.

भारतीय संस्कृतीचा विचार करता अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा अभिमान असलेला आयुर्वेद आहारतत्त्वाकडे अतिशय चांगल्या दृष्टीने पाहतो.

चरक सूत्रामध्ये अन्नाचे गुणवर्णन पुढील श्लोकात केले आहे -

प्राणाः प्राणभृताम् अन्नम् अन्नं लोकोऽभिधावति ।। वर्णप्रसादसौस्वर्य जीवितं प्रतिभा सुखम्

तृष्टी: पुष्टिर्बलं मेधा सर्वम् अन्ने प्रतिष्ठितम् ।।

अर्थ - अन्न हे सर्व प्राणिमात्राचे प्राण आहेत. अन्नासाठीच सारे जग धडपड करीत आहे. शरीराची कांती, सुस्वरता, जीवन, बुद्धी, सुख, संतोष, पृष्टी, शक्ती, मेधा या सर्व गोष्टी अन्नावर अवलंबून आहेत.

आहार या संकल्पनेत पोट भरण्यासाठी लागणाऱ्या किंवा वापरल्या जाणाऱ्या अन्न - पदार्थांचा किंवा घटकांचा समावेश होतो. या आहारात आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पौष्टिकतेचा विचार केला जातो. वैद्यकशास्त्रानुसार आहार सकस व निकस .. म्हणजेच पौष्टिक व कुपोषित अशा दोन प्रकारचा असतो. परंतु सकस आहारासाठी आयुर्वेदात मात्र हितकारक आहार ही संज्ञा वापरली होती. उत्तम आरोग्याच्या दृष्टीने सकस आहार महत्त्वाचा आहे. चरक सूत्रात सर्वश्रेष्ठ व हितकारक आहार व पौष्टिक आहार कोणता याचे केलेले वर्णन आजच्या आधुनिक युगालाही लागू पडते.

आधुनिक जीवनशैलीत आहाराचे महत्त्व विचारात घेतले जाते. शारीरिक व मानसिक वाढीसाठी चौरस आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रकृती निरोगी व उत्तम राहण्यासाठी चांगला आहार असणे आवश्यक आहे याचे भान आधुनिक जीवनपद्धतीत आहे.

पौष्टिक अन्नपदार्थाचे प्रामुख्याने सहा घटक असतात. ते म्हणजे प्रथिने (प्रोटिन्स), स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ (कर्बोदके), जीवनसत्त्व, खनिज पदार्थ (क्षार) आणि पाणी हे आहेत. आपल्या आहारातील बहुसंख्य खाद्यपदार्थ हे प्रामुख्याने वरील घटकांचे बनलेले असतात. मानवी शरीरसुद्धा या घटकांचे बनलेले आहे.

आधुनिक जीवन पद्धतीचा विचार करता सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण हे सर्व वरील घटकांनी युक्त असेल. आपल्या आहारात सर्व प्रकारचे अन्न पदार्थ घेतात. जे पारंपरिक जीवनपद्धतीमध्ये दिले आहे त्यानुसार पालेभाजी, धान्य, डाळी, कडधान्य, अंडी, दूध, दही, तूप, ताक, ळे, ड्रायफ्रूट, मटण अशा सर्व प्रकारचा समावेश त्यांच्या आहारात असतो. काही व्यक्ती तर त्यांच्या डाएटचा चार्ट तयार करून त्याप्रमाणे आहार घेतात. त्यामुळे साहजिकच आरोग्यमय जीवन जगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात.

. स्वच्छता :

आधुनिक जीवन पद्धतीमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिले जाते. वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता, परिसर स्वच्छता, खाण्यापिण्यातील स्वच्छता, सांडपाण्याचा योग्य निचरा अशा सर्व प्रकारच्या स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. स्वच्छता राखल्यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणे टाळले जाते. आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने विचार करता स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे.

. आचार-विचार व चांगल्या सवयी :

आधुनिक जीवनशैलीत उच्च विचार व त्यानुसार आचरण केले जाते. पारंपरिकतेऐवजी बुद्धिजीवी, वैज्ञानिक गोष्टींना महत्त्व दिले जाते. शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान यांच्या साहाय्याने जीवन पद्धती आचरली जाते.

. झोप, विश्रांती :

योग्य आहार, उच्च आचार, चांगल्या सवयी याबरोबर पुरेशी झोप आणि विश्रांती आवश्यक आहे. जीवनामध्ये विकास करण्यासाठी शारीरिक कष्ट जितक्या प्रमाणात घेतले जातात तितक्या प्रमाणात विश्रांतीदेखील आवश्यक आहे. त्यामुळे जीवनात ताणतणाव कमी येतात.

. व्यायाम, खेळ व करमणूक :

व्यायामावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. सध्या जीम, झुम्बा डान्स, योगसाधना, प्राणायाम अशा गोष्टी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मानवाचे शरीर तंदुरुस्त राहते. शिवाय आधुनिक खेळ जसे की फूटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश दिसून येतो. करमणुकीसाठी टी. व्ही., इंटरनेट, संगणक, मोबाईल, स्मार्टफोन यासारख्या गोष्टींचा वापर लोक अधिक करताना दिसतात. अर्थात, परिस्थितीनुसार त्यामध्ये फरक पडू शकतो.

. व्यवसाय :

आधुनिक काळात व्यापार, कामधंदा, नोकरी, उद्योगधंदे अशा विविध गोष्टींचे व्यवसाय केले जातात. ग्रामीण लोकांना व्यवसाय व नोकरीची संधी शहरात मिळते. आधुनिकतेमध्ये काम करण्याचे विविध प्रकार आढळतात. कारखाना, ऑफिस, बँक, शैक्षणिक क्षेत्र, विविध उद्योगधंदे, व्यवसाय, व्यापार अशा अनेक आर्थिक बाबींचा समावेश दिसून येतो. आधुनिक प्रकारची शेती करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती होत आहे.

. आरोग्यविषयक जाणीव जागृती :

आधुनिक समाजात आरोग्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले जाते. आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा दोन उपायांचा वापर केला जातो. प्रतिबंधात्मक उपाय व उपचारात्मक उपाय यांच्या साहाय्याने रोग किंवा आजार होऊच नयेत म्हणून त्याला प्रतिबंधात्मक मार्गांचा वापर केला जातो आणि काही आजार सभोवतालच्या परिस्थितीमुळे उद्भवतात. त्यासाठी उपचारात्मक उपायांचा वापर केला जातो.

. भौतिक सुख सुविधांत वाढ :

आधुनिक पद्धतीचे राहणीमान झाल्यामुळे अनेक भौतिक सुख-सुविधा उपयोगात आणल्या जातात त्यामुळे आधुनिक पद्धतीची घरे, गाडी, फर्निचर, . सी., स्वयंपाकघरातील आधुनिक साधने त्यात फ्रिज, वॉशिंग मशिन, मिक्सर, कुकर, ओव्हन अशा अत्याधुनिक वस्तूंचा समावेश होतो. भौतिक सुविधांमुळे गृहिणींचे शारीरिक कष्ट कमी झाले. सांधेदुखी, कंबरदुखीसारख्या व्याधींचे प्रमाण कमी झाले. वेळेची बचत झाली.

. शैक्षणिक विकास :

सध्या शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते. आधुनिक, तांत्रिक, वैज्ञानिक शिक्षण पद्धतीमुळे सकारात्मक विचारांची वाढ होते. अंधश्रद्धेपासून आधुनिक समाज दूर आहे. शिक्षणाच्या विकासामुळे चांगले जीवन जगण्याच्या गोष्टींवर चर्चा करून विकासाची संधी सर्वांसाठी खुली करण्याचे आश्वासन दिले जात आहे.

थोडक्यात, आधुनिक विचारसरणी काही बाबतीत आरोग्याच्या हिताचा विचार करीत असल्याचे दिसून येते. वैज्ञानिकतेमुळे पारंपरिकतेमधील अज्ञान, अंधश्रद्धेसारख्या गोष्टी मागे पडत आहेत. आधुनिक विचारसरणीचा प्रभाव हळूहळू वाढत आहे आणि हे व्यक्तीच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरते.

 

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...