(Dr Jarandikar N. A.)
Preparation for England - M. K Gandhi
Class: BA II
Subject: English Compulsory
Semester: IV
·
Gandhiji
passed the matriculation exam in 1887. He was living in Rajkot.
·
For the
matriculation exam, Gandhiji had selected the centre at Ahemdabad.
·
After
matriculation, Gandhiji went to the Samldas College at Bhavnagar.
·
At the Samldas
College, Gandhiji found teaching very difficult, and so he returned home.
·
Mavji Dave was
the family advisor of Gandhiji. He advised the Gandhi family to send Gandhiji
to England to become a barrister. After that Gandhiji would become a Diwan
easily.
·
The Gandhi
family used to address Mavji Dave as Joshiji.
·
Gandhiji had a
desire to become a doctor. But his elder brother claimed that it was against
the Shastras. Besides their father wanted Gandhiji to become a lawyer.
·
According to
Mavji Dave, Shastras are not against the medical profession. But the medical degree
will not make Gandhiji a Diwan.
·
So Gandhiji
decided to go to England to become a barrister.
·
At first, Gandhiji
went to Porbandar to meet Mr. Lely. Mr. Lely is the administrator of the
Porbandar State.
·
Mr. Lely had
respect for the Gandhi family. So according to Gandhiji’s elder brother, Mr
Lely may help him to go to England.
·
Gandhiji’s
uncle at Porbandar did not like Gandhiji’s idea to go to England. According to
him, it was against religion.
·
Mr Lely asked
Gandhiji to pass his BA at first, and then he will help him to go to England.
·
Gandhiji was
firm on his decision to go to England. He was ready to sell his wife’s
ornaments and raise the money.
·
Gandhiji’s
elder brother promised him that he will manage the money.
·
Gandhiji’s
mother was, however was not willing to send him to England. She feared that he
will get lost in England or he will start to drink liquor.
·
Gandhiji
promised the mother he will not touch liquor or will do any irreligious act.
·
The mother
thought to consult the Becharji Swami, the Jain monk.
·
Becharji Swami
was originally a Modh Bania, and like Mavji Dave was the family advisor.
·
He told
Gandhiji that if he takes three oaths, he will be permitted to go to England: “Not
to touch wine, woman and meat.
·
Gandhiji took
the oath that in England he will not touch wine, woman and meat. Satisfied
mother gave permission to Gandhiji to go to England.
·
The high
school gave send off to Gandhiji, and he started his journey to Bombay. From Bombay,
he was going to England. This was Gandhiji’s first journey to Bombay.
* * * * *
·
१८८७ साली गांधीजी मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी ते राजकोट येथे
राहत होते. मॅट्रीकच्या परीक्षेसाठी गांधीजीनी अहमदाबाद हे सेंटर निवडले होते. मॅट्रीक
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गांधीजीनी भावनगर येथील शामलदास कॉलेजमध्ये प्रवेश
घेतला. परंतु तेथील शिकवणे त्यांना कठीण वाटल्याने ते आपल्या गावी पुन्हा परत आले.
·
मावजी दवे नावाचे एक गृहस्थ गांधी परिवाराचे सल्लागार होते. सर्वजण त्यांना
जोशीजी म्हणून ओळखत. त्यांनी गांधीजींना इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी पाठवण्याचा
सल्ला दिला. त्यांच्या मते बॅरिस्टर म्हणून परत आल्यानंतर गांधीजींना सहजी दिवाण
बनता येणार होते.
·
गांधीजींना खरेतर मनातून डॉक्टर व्हावे असे वाटत होते. पण त्यांच्या ज्येष्ठ
बंधूंच्या मते असले शिक्षण हे शास्त्राला धरून नव्हते. शिवाय गांधीजीनी वकील
व्हावे अशी त्यांच्या वडलांची इच्छा होती.
·
मावजी दवेंच्या मते डॉक्टर होणे शास्त्राला धरून असले तरी त्यामुळे गांधीजी हे
काही दिवाण बनू शकणार नाहीत. त्यामुळे शेवटी गांधीजींनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर
होण्याचा निर्णय घेतला.
·
इंग्लंडला जाण्याच्या तयारीसाठी गांधीजी प्रथम पोरबंदरला गेले. तेथे ते मिस्टर
लेली यांना भेटणार होते. मिस्टर लेली हे गांधी कुटुंबियाचे स्नेही होते आणि
पोरबंदर संस्थानचे प्रशासक होते.
·
पोरबंदरमध्ये गांधीजींचे काका रहात असत. त्यांनी गांधीजींच्या इंग्लंडला
जाण्याच्या निर्णयाला नापसंती दाखवली. त्यांच्यामते परदेश प्रवास म्हणजे धर्मबाह्य
कृत्य होते.
·
गांधीजी मिस्टर लेली यांना भेटले. पण त्यांनीही मदत करण्यास नकार दिला.
त्यांनी गांधीजींना प्रथम बीए पूर्ण करण्याचा सल्ला दिला.
·
पण इंग्लंडला जाण्याच्या निर्णयावर गांधीजी ठाम होते. प्रसंगी त्यांनी आपल्या
पत्नीचे दागिने विकण्याची तयारी केली. तथापि त्यांच्या मोठ्या भावांनी पैसे उभे
करण्याची जबाबदारी स्वीकारली.
·
आता गांधीजींच्या आईने इंग्लंडला जाण्यास हरकत घेतली. तिच्या मते लोक
इंग्लंडमध्ये हरवून जातात, मद्याच्या आहारी जातात. गांधीजींनी तिला मद्यास स्पर्श
न करण्याचे वा कोणतेही धर्मबाह्य कृत्य न करण्याचे आश्वासन दिले.
·
शेवटी आईने बेचारजी स्वामी या जैन साधूचा सल्ला घेण्याचे ठरवले. मावजी
दवेंप्रमाणे बेचारजी स्वामी हे गांधी कुटुंबाचे स्नेही होते. बेचारजी स्वामींनी
गांधीजींकडून तीन शपथा वदवून घेतल्या: मद्य, मांस आणि स्त्रीस स्पर्श न
करण्याच्या.
·
अशा प्रकारे आईची परवानगी मिळाल्यानंतर गांधीजींची इंग्लंडला जाण्याची तयारी
सुरु झाली. राजकोटहून गांधीजी बॉम्बे येथे आले. इथून ते आता इंग्लंडला जाणार होते.
बॉम्बेला येण्याची ही गांधीजींची पहिलीच वेळ होती.
* * * * *
सूचना: सोबत दिलेली
सराव प्रश्नपत्रिका सोडवा. ही प्रश्नपत्रिका आपली सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत
पुन्हापुन्हा सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून
गुगलमध्ये पेस्ट करा.
https://forms.gle/vJF3WnKh77qXtoi96
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.