(E-content developed by Dr N. A. Jarandikar)
The Orphan Girl
“The Orphan Girl” या कवितेमध्ये हेन्री डिरोझीओ यांनी एका अनाथ मुलीचे वर्णन
केलेले आहे. या मुलीचे वडील (sire) सैन्यात होते.
त्यांना युद्धामध्ये वीरमरण प्राप्त झाले आहे (gained a glorious grave). या मुलीच्या आईला एका
विधवेचं जिणं सहन न झाल्याने (could not endure a widow’s part) आपल्या मुलीला पोरकं करत तिनेही या जगाचा निरोप घेतलेला आहे.
या मुलीचा केशसंभार हा एखाद्या कावळ्याच्या (raven) रंगाप्रमाणे काळाभोर होता. तिच्या गालाचा रंग हा जणू ट्युलिपच्या/लिलीच्या
फुलांनी परिधान केलेल्या रंगाप्रमाणे होता. तिचा आवाज हा रात्री वाहणाऱ्या
वाऱ्याच्या झुळकीइतका तरल होता. आणि तिच्या भुवया (brow) या चंद्रकिरणांइतक्या (moonbeam) आखीवरेखीव होत्या. पण आई-वडलांच्या पश्चात या मुलीचे सगळे सौंदर्य नाहीसे
झाले आहे.
आता या मुलीच्या भविष्यात काय वाढून ठेवलं असेल? या अशा निस्तेज, निराश जगामध्ये (cold, bleak earth) या मुलीला जवळचं असं कोणीच
नाही जो कुणी तिला आसरा देऊ शकेल. आयुष्याच्या या भयाण वाळवंटाचा (life’s dreary desert) रस्ता आता तिला एकटीलाच
पार करावा लागेल. जे कमनशिबी असतात, त्यांना कोणीच आप्तेष्ट नसतात. (The wretched have never a
friend!) आणि जर यदाकदाचित तिचा
रस्ता जर भरकटला, तर जग तिच्यावर तुटून पडेल. जग तिला हिणवेल. मग दु:खाच्या
ओझ्याने आणि अपराध भावनेने लज्जित झालेले तिचे मन पिळवटून निघेल. पण ज्या जखमेतून
सातत्याने रक्त वाहताना दिसते आहे, अशा जखमेची मलमपट्टी न करणे हे क्रूरपणाचे
ठरणार नाही का? एखादी स्त्री जिच्या दु;खाकडे जगाने डोळेझाक केलेली आहे, अशा
स्त्रीसाठी झरणाऱ्या डोळ्यातील एखाद्याच्या आसवांव्यतिरिक्त अन्य कुठले तेजस्वी
अश्रू असूच शकत नाहीत. आणि त्यामुळेच जो कोणी या अनाथ मुलीला दु:ख आणि लज्जा
यापासून बचाव करण्यासाठी सहारा देईल त्याचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल.
Question Bank
1. The poem “The Orphan Girl” is written by _____.
a) Jibanananda Das b)
Rabindranath Tagore
c) A. P. J. Abdul Kalam d) Henry Derozio
2. The orphan girl’s hair was as black as _____.
a) raven’s wings b) peacock’s
wings
c) sparrow’s wings d)
squirrel’s tail
3. The orphan girl’s father joined _____.
a) politics b) war c) civil
service d) navy
4. The orphan girl’s mother could not endure _____ part.
a) woman’s b) wife’s c) daughter’s d)
widow’s
5. “The wretched have never a _____”.
a) company b) friend c) supporter d) caretaker
6. The poet blesse a person who _____.
a) discards an orphan b)
feeds an orphan
c) shelters an orphan from sorrow and shame d) befriends an orphan
7. If the orphan girl strays from virtue’s way, the world
______.
a) will admire her b) will scorn her c)
will love her d) will appreciate her
8. According to the poet, the orphan girl has _____ on
this earth.
a) many friends b)
many relatives
c) many well-wishers d) no friend
9. The orphan girl’s voice was as soft as _____ sings.
a) the cuckoo b)
the nightingale c) the night wind d) the bulbul
10. According to the poet, through the life’s dreary
_____, the orphan girl must wend alone.
a) desert b) jungle c)
forest d) path
* * * * *
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.