(e-Content developed by Dr N. A. Jarandikar)
Module III (B)
After Twenty Years — O. Henry
·
ही गोष्ट न्यूयॉर्क (New York) या शहरामध्ये घडते. वेळ रात्रीची सुमारे दहा वाजताची.
·
एक पोलीस (cop) रस्त्यावरून गस्त
घालत आहे. त्यावेळी त्याचे लक्ष एका दुकानासमोर उभ्या असलेल्या गृहस्थाकडे जाते.
·
या गृहस्थाचे नाव बॉब (Bob) असल्याचा उलगडा गोष्टीमध्ये
नंतर होतो. बॉबच्या उजव्या डोळ्याजवळ एक व्रण (mark) आहे. त्याने टाय (necktie) परिधान केलेला आहे
आणि टायच्या नॉटपाशी एक मौल्यवान रत्न (large jewel) दिसून येत आहे. याच्याकडे एक उत्तम दर्जाचे घड्याळ (fine watch) आहे ज्यामध्ये हिरे
जडवलेले आहेत.
·
संशयास्पदरित्या उभ्या असणाऱ्या बॉबला पोलीस हटकतो. बॉब त्याला उत्तर देतो की
तो त्याच्या एका मित्राची वाट पहात आहे. ही भेट वीस वर्षापूर्वी ठरल्याचे तो पोलिसाला
सांगतो.
·
वीस वर्षापूर्वी बॉब आणि त्याचा मित्र जिमी वेल्स (Jimmy Wells) हे या शहरात राहत होते.
दोघांनी आपले नशीब अजमायचे ठरवले. त्यामुळे बॉब न्यूयॉर्क सोडून वेस्ट
प्रांतामध्ये (the west) गेला. तर जिमीने इथेच राहणे पसंद केले. ते दोघे शेवटचे ज्यावेळी भेटले
त्यावेळी त्यांनी ठरवले की २० वर्षानंतर पुन्हा इथेच आपण भेटूयात. दोघांची शेवटची
भेट ही बिग जो ब्रॅडी (Big Joe Brady’s Restaurant) या रेस्टॉरंटमध्ये झाली होती.
·
आज वीस वर्षानंतर बॉब वेस्ट प्रांतामधून जिमीला भेटण्यासाठी पुन्हा एकदा त्याच
ठिकाणी आलेला आहे.
·
पोलीस त्याची गोष्ट ऐकून निघून जातो. थोड्या वेळाने जिमी तिथे येतो. जिमीला
भेटून बॉबला खूप आनंद होतो. परंतु जिमी त्याला थोडासा अनोळखी वाटू लागतो.
·
बॉब जिमीला तसे स्पष्टपणे सांगतो. आणि मग तो जिमी नसून एक पोलीस असल्याचे
स्पष्ट होते. तो पोलीस बॉबला जिमीने लिहिलेले पत्र देतो.
·
पत्रावरून हे स्पष्ट होते की जिमीदेखील आता एक पोलीस झालेला आहे. वेस्ट
प्रांतातून परत आलेला बॉब हा एक मोठा गुन्हेगार आहे. वेस्टमध्ये जाऊन अवैध धंदे
करून बॉब श्रीमंत झालेला आहे आणि पोलीस त्याच्या पाळतीवर आहेत.
·
आज बॉब न्यूयॉर्कमध्ये येणार असल्याचा सुगावा पोलिसांना लागलेला आहे. आणि
त्याला अटक करण्याची जबाबदारी जिमीवर आलेली आहे.
· २० वर्षापूर्वी ठरल्याप्रमाणे जिमी बरोबर १०.०० वाजता ठरलेल्या जागेवर आलेला आहे. पण मित्राला अटक करण्याचे धाडस न झाल्याने त्याने ही जबाबदारी दुसऱ्या एका पोलिसावर सोपवलेली आहे आणि त्याच्याकडेच जिमीने आपले पत्र दिलेले आहे.
Question Bank
1. Jimmy Wells is a _____. (police officer)
2. When Jimmy Wells was moving along the street at
New York, it was _____ at night. (about ten)
3. _____ had a large jewel in his necktie. (Bob)
4. According to Bob, _____ was as true as any man
in the world. (Jimmy)
5. “It sometimes changes a good man into a bad one”,
said the tall man. The statement is applicable to _____. (Bob)
6. The story “After Twenty Years” takes place in
_____ city. (New York)
7. Bob and Jimmy met for the last time in _____
restaurant. (Big Joe Brady’s)
8. _____ sent a little piece of paper to Bob. (Jimmy)
9. To find a job and make a great success, Bob
went to _____. (the West)
10. Bob had _____ in his necktie. (a large jewel)
11. Twenty years ago, at _____, Bob and Jimmy said
good bye to each other. (ten o’clock)
12. In the story “After Twenty Years”, the name of
the waiting man is _____. (Bob)
* * * * *
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.