(e-Content developed by Dr N. A. Jarandikar)
The Lottery
— Shirley Jackson
·
ही एक अमेरिकेतील छोट्या गावात घडणारी गोष्ट आहे. त्या भागात प्रचलित असणाऱ्या
वार्षिक लॉटरीबद्दल भाष्य करणारी ही गोष्ट आहे.
·
लॉटरीद्वारे दरवर्षी एक व्यक्ती निवडून तिचा बळी देण्याच्या प्रथेबद्दलची ही
गोष्ट आहे. अर्थात लॉटरी काढून त्याचे पुढे काय केले जाते याचा पूर्ण गोष्टीमध्ये
सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे. बळी देण्याच्या पद्धतीचा खुलासा हा गोष्टीच्या
शेवटीच होतो.
·
गोष्टीतल्या गावामध्ये दरवर्षी २७ जून रोजी लॉटरी काढण्याची पद्धत आहे.
·
या गावामध्ये ३०० हून अधिक लोक रहात आहेत.
·
लॉटरी काढण्याची जबाबदारी ही मिस्टर समर्स (Mr Summers) यांची आहे.
·
एका लाकडी काळ्या बॉक्समध्ये कोऱ्या चिठ्या ठेवल्या जात. पैकी एका चिठ्ठीवर एक
काळा ठिपका (black spot) काढलेला असे. ही चिठ्ठी ज्याला मिळेल त्याच्यावर गावकरी
दगडांचा वर्षाव करत.
·
लॉटरीसाठी सर्व गावकरी जमलेले आहेत. यामध्ये वॉर्नर (Warner) नावाचे सर्वात
वयोवृद्ध गृहस्थ आहेत. ते ७७ व्यांदा या लॉटरीमध्ये सहभागी होत आहेत.
·
मिस्टर मार्टिन (Mr. Martin) आणि त्यांचा मुलगा बॅक्सटर (Baxter) यांनी
लॉटरीचा पेटारा आणून ठेवला आहे, तर मिस्टर ग्रेव्हज (Mr. Graves) जे पोस्टमास्तर
आहेत, त्यांनी पेटारा ठेवण्यासाठी स्टूल आणले आहे.
·
क्लाइड डनबर (Clyde Dunbar) यांचा पाय
मोडलेला असल्याने ते लॉटरीसाठी गैरहजर आहेत. त्यांच्या ऐवजी त्यांची पत्नी (Mrs
Dunbar) हीच लॉटरी उचलणार आहे.
·
नंतर मिस्टर समर्स हे एकेकाचे नाव पुकारतात. प्रत्येकजण पेटाऱ्यातून लॉटरी
घेऊन जातो.
·
शेवटी मिस्टर समर्स सर्वांना पेपर उघडण्यास सांगतात.
·
black spot असणारी चिठ्ठी बिल हचिन्सन (Bill Hutchinson) यांच्याकडे सापडते.
परंतु बिलची पत्नी मिसेस टेसी हचिन्सन (Mrs Tessie Hutchinson) याला आक्षेप घेतात.
बिल यांना चिठ्ठी उचलताना पुरेसा वेळ न मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
·
मिस्टर समर्स यातून एक तोडगा काढतात. बिल, टेसी आणि त्यांची तीन मुले (बिल ज्युनियर,
नॅन्सी आणि डेव्ह) यांना त्यांच्या चिठ्या पेटाऱ्यात टाकण्यास सांगतात आणि पुन्हा
एकदा चिठ्ठी निवडण्यास सांगतात.
·
यावेळी black spot असणारी चिठ्ठी मिसेस टेसी हचिन्सन यांच्याकडे सापडते.
·
मिसेस टेसी हचिन्सन “It isn’t fair, it isn’t right” म्हणत आक्रोश करू लागतात
आणि सर्व गावकरी त्यांच्यावर दगड-धोंडे घेऊन तुटून पडतात.
* * * * *
Question Bank
1.
_____ was the oldest man in the town. (Old Man Warner)
2.
The name of Mr Martin’s son was _____. (Baxter)
3.
_____ was absent for lottery. (Dunbar)
4.
_____ represented Mr Dunbar. (Janey)
5.
_____ stood at the centre at the end. (Tessie)
6.
The lottery was held on _____. (27th June)
7.
_____ conducted the event of lottery. (Mr Summers)
8.
_____ carried a three legged stool to the square. (Mr Graves)
9.
Mr Graves was _____. (a postmaster)
10.
Mr Warner was participating in the lottery for _____. (seventy seventh time)
11.
The whole lottery ritual took only _____. (about two hours)
12.
Mr Summers ran _____. (a coal business)
13.
Before slips of papers _____ was used for lottery. (chips of wood)
14.
The name of Dunbar’s son is _____. (Horace)
15.
Dunbar’s son is not allowed to participate in the lottery because _____. (he
was not yet sixteen years old)
16.
Watson is drawing a lottery for him and _____. (his mother)
17.
“Some places have already quit lotteries”, says _____. (Mrs Adams)
18.
The story “The Lottery” is written by _____. (Shirley Jackson)
* * * * *
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.